महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra State ST Corporation: राज्यासह राज्याच्या बाहेर एसटीचा पसारा, तरीही एसटी उपेक्षित! - कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तोट्याची झळ दुप्पट

राज्यातलं एसटी महामंडळ (Maharashtra State ST Corporation) हे महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हणून ओळखले जाते. गावागावात प्रवासासाठी असणारी एसटी ही महाराष्ट्रातल्या नागरिकांची प्रथम पसंती होती. तर महाराष्ट्रातली एसटी राज्याच्या बाहेरही सुसाट धावताना दिसते. मात्र काळाच्या ओघात एसटी महामंडळकडे जनतेने पाठ फिरवायला सुरुवात केली. एसटीच्या तुटपुंजा सुविधा आणि अनियमिततेमुळे इतर वाहनांकडे जनतेचा कल सुरू झाल्याने एसटी महामंडळ तोट्यात जायला सुरुवात झाली आहे.

Maharashtra State ST Corporation
एसटी महामंडळ

By

Published : Jul 18, 2022, 3:10 PM IST

मुंबई: मध्यप्रदेशातील धार येथे महाराष्ट्रातील एसटीचा (Maharashtra State ST Corporation) मोठा अपघात घडला असून, या अपघातात आतापर्यंत 13 प्रवाशांचा जीव गेला असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच आतापर्यंत या अपघातातून 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. जळगाव एसटी डेपो ची ही बस असून इंदूर शहराकडून पुणे शहराच्या दिशेने जाताना हा दुर्देवी अपघात झाला. ही बस सकाळी सात वाजता दरम्यान धार येथून अंमळनेरकडे निघाली होती. खलघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे.

महाराष्ट्राची रक्तवाहिनी :राज्यातलं एसटी महामंडळ (Maharashtra State ST Corporation) हे महाराष्ट्राची रक्तवाहिनी (Blood vessel of Maharashtra) म्हणून ओळखले जाते. गावागावात प्रवासासाठी असणारी एसटी ही महाराष्ट्रातल्या नागरिकांची प्रथम पसंती होती. तर महाराष्ट्रातली एसटी राज्याच्या बाहेरही सुसाट धावताना दिसते. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये एसटी आपली सेवा देते. यामध्ये मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये देखील आपली सेवा पुरवत असते. मात्र काळाच्या ओघात एसटी महामंडळकडे जनतेने पाठ फिरवायला सुरुवात केली. एसटीच्या तुटपुंजा सुविधा आणि अनियमिततेमुळे इतर वाहनांकडे जनतेचा कल सुरू झाल्याने एसटी महामंडळ तोट्यात जायला सुरुवात झाली. महाराष्ट्रात जवळपास 16,500 एस टी राज्यभरात धावतात. एसटी महामंडळाचे रोजचे उत्पन्न जवळपास 18 कोटी रुपये रोजचे आहे. कोविडच्या आधी हेच एसटी महामंडळाचे उत्पन्न जवळपास 21 ते 22 कोटी एवढे होते. मात्र कोविड च्या नंतर एसटी पूर्णक्षमतेने धावू लागल्यानंतर उत्पन्न 18 कोटीच्या आसपास आले आहे. त्यामुळे जवळपास रोजचा चार कोटींचा तोटा एसटी महामंडळाला होतोय. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने जुन्या एसटी ताफ्यातल्या बस सीएनजीवर सुरू करण्याचा प्रकल्प हाती घेतला. मात्र अद्याप हा प्रकल्प देखील प्रायोगिक तत्त्वा वरतीच राबवला जात आहे.


कोविडमुळे एसटी उत्पऩ्नात घट (Decline in ST income due to Covid) :कोविडमुळे 2020 ते मार्च 2021 या काळात एसटीचं 6 हजार कोटींचं उत्पन्न बुडलं. या काळात कर्मचाऱ्यांचे पगारही थकले होते. तर एसटीचा एकूण संचित तोटा 12,500 कोटी झाला आहे. या आर्थिक परिस्थितीमुळे एसटीला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी व गाड्यांच्या इंधनासाठी सरकारकडे मदत मागावी लागते.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तोट्याची झळ दुप्पट:एसटी महामंडळात एकूण 92 हजारच्या वर कर्मचारी कार्यरत आहेत. एसटी महामंडळाचे सरासरी वार्षिक उत्पन्न 6300 कोटी ते 6500 कोटी च्या दरम्यान आहे. यापैकी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर जवळपास 3500 ते 3600 कोटी एवढा खर्च होत असतो. तर तेथेच इंधनावरील खर्च हा जवळपास 2900 कोटीच्या आसपास आहे. आणि या सोबतच एसटी ची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचा खर्च जवळपास 800 कोटी रुपयापर्यंत आहे. एकूण एसटी बस पैकी 2000 बस या दुरुस्तीसाठी कार्यशाळेत उभे आहेत. तरी देखील अनेक वेळा एसटी बसची अवस्थाही अत्यंत वाईट स्वरूपाची असलेली पाहायला मिळते. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांनी आठ महिने केलेल्या संपामुळे (Due to the strike loss is doubled) एसटीची अवस्था अजूनच बिकट झाली आहे. अद्यापही पूर्वीसारखा उत्पन्न एसटीला मिळवता आलेलं नाही.




हेही वाचा: Nagpur Corona Update : पालकांची चिंता वाढली! नागपुरातील एकाच शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

ABOUT THE AUTHOR

...view details