मुंबईठाकरे सरकार घालवून शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्या आल्या Maharashtra State Chief Secretary report on Metro Carshed बुलेट ट्रेनच्या संदर्भात, तसेच मुंबई मेट्रो रेल्वेच्या aarey metro shed संदर्भात अनेक प्रकल्पांना जलद गतीने मंजुरी दिली. मात्र, आरे जंगलाच्या संदर्भात वादग्रस्त मुद्दे असताना शासनाने आरे जंगलातील metro car shed at aarey colony कारशेड होण्यासाठी विविध पातळीवर aarey colony metro project प्रशासकीय मंजुरी दिल्या, असा पर्यावरण aarey colony metro station अभ्यासकांचा दावा आहे. शिंदे फडणवीस सरकारने आरे जंगलातील कारशेडसाठी ज्या पद्धतीने कार्यवाही सुरू केली आणि जंगलतोड सुरू केली ती बेकायदा आहे. नियमाला धरून नाही. हे कृत्य पर्यावरण नष्ट करणारे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत आता राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल हाती लागला आहे. अहवालातून जंगलाची हाणी होईल असे समोर आले आहे.
हेही वाचाClean cheat to Sameer Wankhede शाहरूख खानच्या मुलाला अटक करणारे समीर वानखेडे मुस्लीम नाही
समितीचा अहवाल म्हणतो कारशेड कांजुरमार्गमध्येच करावामात्र महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची उच्च स्तरावरची समिती गठित करून आरे प्रकल्पाच्या संदर्भात ०६ जानेवारी २०२१ मध्ये अहवाल तयार केला गेला. या अहवालातून महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाने प्रत्यक्ष आरे जंगलात भेटी देऊन अभ्यासपूर्ण तयार केलेल्या या अहवालामध्ये 'मेट्रो रेल्वेचे टप्पा तीन कारशेड आरे मध्ये केल्यास जंगलाची हानी होईल, असा निष्कर्ष त्यात नोंदवला आहे. तसेच, १ हजार झाडे आरेमध्ये तोडावे लागतील. शिवाय आरे जंगलात कारशेड बनवल्यावर काही काळाने पुन्हा अतिरिक्त कारशेडसाठी जागा लागणार. त्यामुळे, पुन्हा वृक्षतोड होऊ शकते. त्यापेक्षा सर्वात उचित जागा कांजूरमार्गच आहे. म्हणून मेट्रो रेल्वेचे कार शेड कांजूरमार्ग येथे केल्यास अधिक संयुक्तिक होईल, अशा पद्धतीचा निष्कर्ष मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काढलेला आहे. 'ईटीव्ही भारत'ला हा अत्यंत महत्वपूर्ण अहवाल प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्र राज्यात मविआ सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुलाबा वांद्रे सिप्स या मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग टप्पा तीनचे कारशेड आरे कॉलनीमध्ये होणार, असे जाहीर केले. मात्र, त्यापूर्वीच्या उद्धव ठाकरे सरकारने आरे कॉलनीमध्ये होणारा हा प्रकल्प पर्यावरण पूरक नसल्याच्या आधारावर रद्द केला. मात्र, शिंदे फडणवीस सरकार यांनी आल्या आल्या प्रथम बैठकीमध्येच मागील सरकारचा निर्णय रद्द करून पुन्हा एकदा मुंबई मेट्रो रेल्वेचे टप्पा तीन कारशेड हे आरे जंगलातच होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार प्रकल्पाबाबत विविध स्तरांवर मंजुरी देखील दिल्या. या अहवालासंदर्भात भाजपचे जेष्ठ नेते व मंत्रिमंडळ सदस्य सुधीर मुनगंटीवार याना विचारले असता त्यांनी ईटीव्ही भारत सोबत बातचीत करताना मुद्दे मांडले.
उद्धवजींनी ५० हजार झाडे तोडण्याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्यवाही केलीआंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन शोध अभ्यास प्रसारित झालेला आहे की, झाडे कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात हे खरे आहे. मात्र, जुन्या झाडांची कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता कमी होते. २०२१ चा अहवाल तेव्हाच्या सरकारच्या दबावात केला किंवा नाही, मला देखील पुरेसे ठाऊक नाही. मात्र, एक हजार झाडे वाचवण्यासाठी किती कोटी रुपये आपण खर्च करावे. तर मविआ सरकार काळात उद्धवजींनी ५० हजार झाडे तोडण्याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्यवाही केली आहे. तेव्हा उद्धवजी वनमंत्री होते. त्या काळात वनजमिनीवरील पट्टे ताबोडतोब द्यावे म्हणत होते. त्यात नाही का झाडे तोड होत होती. समृद्धी महामार्गासाठी दि. बाळासाहेब ठाकरे महामार्ग नाव दिले. त्यात झाडे तोडले गेले की नाही. प्रशासनाच्या एका समितीचे म्हणणे आहे की, आरे मध्येच कारशेड करावे, अन्यथा कारण नसताना डिझेल जास्त लागेल. त्यामुळे, केवढा इंधन खर्च होईल. तेव्हा १ हजार झाडे वाचवून जर पाचशे कोटी अधिकचा खर्च होत असेल तर ते तर्कसंगत नाही. अर्थात मी काही मुख्य सचिव समितीचा अहवाल वाचलेला नाही. त्यावर सविस्तर अभ्यास करून बोलता येईल, असे मुनगंटीवार म्हणाले.