मुंबई - आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये खुलताबाद (जि.औरंगाबाद) येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट या संस्थेच्या ताब्यातील ४५ हेक्टर जागा राज्य मार्ग परिवहन मंहामंडळाकडे देण्याबाबत, तसेच अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरण करणे या योजने संबंधी निर्णयासह पुढील निर्णय घेण्यात आले आहेत.
हेही वाचा -ED Custody to Pravin Raut : प्रवीण राऊत यांना 9 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात
1)खुलताबाद (जि.औरंगाबाद) येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट या संस्थेच्या ताब्यातील ४५ हेक्टर जागा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे देण्यास मान्यता (महसूल विभाग).