मुंबई- राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालानुसार अर्थव्यवस्थेत ७.५ टक्के वाढ अपेक्षित आहे. मागील वर्षीदेखील ७.५ टक्केच अर्थव्यवस्था वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दरडोई उत्पनांत महाराष्ट्र राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे या अहवालातून पुढे आले आहे.
दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी; आर्थिक पाहणी अहवाल जाहीर
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला. मागील वर्षीदेखील ७.५ टक्केच अर्थव्यवस्था वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या अहवालानुसार अर्थव्यवस्थेत ७.५ टक्के वाढ अपेक्षित आहे.
या अहवालात कृषी आणि उद्योग दरात घट अपेक्षित आहे. तर कृषी दरात २.८ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. २०१८-१९ वर्षात कृषी दर ०.४ टक्के असण्याचा पुर्वानुमान आहे. २०१७-१८ साली हा दर ३.१ होता. उद्योग क्षेत्राचा दर ०.७ टक्क्यांनी घट अपेक्षित आहे. उद्योग क्षेत्राचा दरही २०१७-१८ ७.६ वरुन २०१८-१९ साठी ६.९ इतका घसरण्याचा पुर्वानुमान आहे. तर सेवा क्षेत्रात १.१ टक्के वाढ घट अपेक्षित आहे. सेवा क्षेत्राचा दर २०१७-१८ वरुन २०१८-१९ ला ९.२ इतकी वाढ होण्याचा पुर्वानुमान आहे. किती क्षेत्र सिंचनाखाली आहे, याची या आर्थिक पाहणी अहवालात माहिती देण्यात आलेली नाही.