महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra SSC HSC Exams 2022 : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, 'या' आहेत तारखा

राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर ( Maharashtra SSC HSC Exam 2022 Schedule ) झाल्या आहेत. बारावीच्या लेखी परीक्षा ४ मार्चपासून ७ एप्रिल, तर दहावीच्या १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहेत. राज्य शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad ) यांनी याबाबत माहिती दिली.

Students
विद्यार्थी

By

Published : Dec 16, 2021, 7:18 PM IST

Updated : Dec 17, 2021, 12:33 PM IST

मुंबई - राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर ( Maharashtra SSC HSC Exam 2022 Schedule ) झाल्या आहेत. बारावीच्या लेखी परीक्षा ४ मार्चपासून ७ एप्रिल, तर दहावीच्या १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहेत. राज्य शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad ) यांनी याबाबत माहिती दिली.

माहिती देताना राज्य शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

हेही वाचा -BEST Super Saver Scheme : बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांसाठी सुपर सेवर योजना

कोविडच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ मध्ये राज्यातील शाळा / कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाले आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इयत्ता बारावी ) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इयत्ता दहावी ) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मुल्यमापन, तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

इयत्ता बारावी परीक्षा माहिती

वेळापत्रकानुसार, इयत्ता बारावीच्या ( Maharashtra HSC Exam 2022 ) प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी / अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर, माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी / तोंडी व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ३१ मार्च ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.

इयत्ता दहावी परीक्षा माहिती

इयत्ता दहावीच्या ( Maharashtra SSC Exam 2022 ) प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी / अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी / तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ५ एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील.

इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जुलै २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. तसेच, परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कोविड - १९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने, तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.

हेही वाचा -Indrani Mukherjee letter To CBI : शीना बोरा जिवंत... इंद्राणी मुखर्जीचं CBI ला पत्र

Last Updated : Dec 17, 2021, 12:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details