मुंबई -एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या ( President Election 2022 ) उमेदवार द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांना बहुमताने निवडून देण्यासाठी भाजप पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरला आहे. त्यातच आता सध्या राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे गटाच्या ५० आमदारांच ( Shivsena Rebel MLA Group ) समर्थन भाजपला ( Bjp ) लाभले आहे. त्यामुळे भाजपच्या मत मूल्यात ८७५० ने वाढ होणार आहे. त्याचा मोठा फायदा या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना होणार आहे.
द्रोपदी मुर्मू यांना वाढता पाठिंबा? - १८ जुलैला राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे यूपीए कडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत एकनाथ शिंदे व भाजप यांच्याकडे १६५ आमदार आहेत. तसेच, शिवसेनेच्या काही खासदारांचे समर्थन सुद्धा भाजपला लागणार असल्याने १०,००० पेक्षा अधिक मत मूल्यांचा लाभ भाजपला होणार आहे.
शिवसेनेच्या १२ खासदारांचाही मिळणार पाठिंबा? - आदिवासी समाजातील सक्षम आणि कर्तृत्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे केली यांनी केली आहे. राहुल शेवाळे पाठोपाठ शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी सुद्धा अशा पद्धतीची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर शिवसेनेतील १२ खासदारांचा पाठिंबा भाजपला भेटणार असल्याची ही माहिती समोर आली आहे.