मुंबई -महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कारवाई करुन, प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी आणलेल्या शक्ती विधेयकाला विधानपरिषदेत एकमताने मंजुरी ( Shakti Law Passed Maharashtra council ) मिळाली. विधेयकाला मंजुरी मिळाली असली तरी राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या संमतीनंतर त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती उपसभापती नीलम गोऱ्हे ( Deputy Chairman Maharashtra Council Nilam Gorhe ) यांनी दिली.
... तरच अंमलबजावणी
गेल्या काही काळापासून चर्चेत असणारे शक्ती विधेयक गुरुवारी विधानसभेत ( Shakti Law Passed Maharashtra Assembly ) एकमताने मंजूर झाले. त्यानंतर शुक्रवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी विधानपरिषदेत ते विधेयक मांडले. त्यास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Opposition Leader Pravin Darekar ) यांनी त्यातील त्रुटी दाखवत सुधारणा दर्शविल्या. गृहमंत्र्यांनी त्या स्वीकारल्या. परंतु, हे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होणार नाही, याची जाणीव उपसभापती नीलम गोऱ्हे ( Deputy Chairman Maharashtra Council Nilam Gorhe ) यांनी करून दिली.