महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Shaheer Biopic ‘महाराष्ट्र शाहीर’ या शाहीर साबळेंवरील बायोपिकमध्ये पणती सना केदार शिंदे पत्नीच्या भूमिकेत

शाहीर साबळे (Shaheer Sable) यांचा नातू केदार शिंदे (Director kedar shinde) दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer Biopic) नावाचा जीवनपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहिर साबळे अर्थात कृष्णराव साबळे यांच्या आयुष्यावरील या जीवनपटामध्ये पणती सना केदार शिंदे (Granddaughter Sana Shinde) शाहिरांच्या पत्नी भानुमती (Wife Bhanumati) यांच्या भूमिकेत असणार आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ची निर्मीती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट (Everest entertainment) आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची (Kedar shinde productions)असून चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया (Sanjay Chhabria)आणि बेला केदार शिंदे. (Bela Shinde) या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत (Music by Ajay-Atul) आहे तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. चित्रपटात शाहिरांच्या इतर समकालीन आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार अशा प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने पुढे येतील.

Maharashtra Shaheer
महाराष्ट्र शाहीर

By

Published : Sep 4, 2022, 4:06 PM IST

मुंबईशाहीर साबळे (Shaheer Sable) यांचा नातू केदार शिंदे (Director kedar shinde) दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer Biopic) नावाचा जीवनपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहिर साबळे अर्थात कृष्णराव साबळे यांच्या आयुष्यावरील या जीवनपटामध्ये पणती सना केदार शिंदे (Granddaughter Sana Shinde) शाहिरांच्या पत्नी भानुमती (Wife Bhanumati) यांच्या भूमिकेत असणार आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ची निर्मीती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट (Everest entertainment) आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची (Kedar shinde productions)असून चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया (Sanjay Chhabria)आणि बेला केदार शिंदे. (Bela Shinde) या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत (Music by Ajay-Atul) आहे तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. चित्रपटात शाहिरांच्या इतर समकालीन आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार अशा प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने पुढे येतील.



महाराष्ट्र शाहीर पुढील वर्षी प्रदर्शित होणार(Maharashtra Shaheer release next year) 'जय जय महाराष्ट्र माझा...' या महाराष्ट्र गीतासह ‘महाराष्ट्र भूमी बहुगुणी...शोभते खणी, किती नरमणी...’, 'या गो दांड्यावरून....', 'जेजुरीच्या खंडेराया जागराला या या....' अशी दर्जेदार लोकगीते देणाऱ्या शाहिरांना आदरांजली म्हणुन बायोपिकची निर्मिती केली जातेय. 'महाराष्ट्राचे शाहीर’ अशी ज्यांची ख्याती होती त्या शाहीर साबळे यांच्या जीवनावरील चरित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ हा बायोपिक बनत आहे. प्रमुख भूमिकेत मराठीतील आघाडीचा नायक अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) आहे.

लहानपणापासूनच सामाजिक चळवळींशी जोडले गेलेल्या कृष्णराव अर्थात शाहीर साबळे यांनी १९४२ चं चले जाव, स्वातंत्र्यानंतरचा गोवा आणि हैद्राबाद मुक्तीसंग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्र अशा चळवळींमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. लोककलेच्या क्षेत्रातील (Areas of Folk Art) मोलाच्या योगदानबद्दल या महान कलावंताचा पद्मश्री, संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र गौरव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. सातारा येथील पसरणी येथे ३ सप्टेंबर १९२३ रोजी जन्मलेले शाहीर साबळे जेमतेम सातवीपर्यंत शिकले होते.

पणती सना केदार शिंदे शाहिरांच्या पत्नी भानुमती यांच्या भूमिकेत शाहीर साबळे यांचा नातू केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या शाहिरांच्या जीवनपटामध्ये आणखी एक दुर्मिळ आणि अभूतपूर्व असा योग जुळून आला आहे. नातवाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात शाहिरांच्या पत्नीची आणि प्रख्यात कवयित्री भानुमती (Wife Bhanumati) यांची भूमिका करतेय शाहिरांची पणती आणि केदार शिंदे यांची मुलगी सना केदार शिंदे. शाहिरांच्या यशामध्ये त्यांची पत्नी भानुमती यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी गायलेली अनेक लोकगीते भानुमती यांनी लिहिली होती. त्यांचीच महत्त्वाची भूमिका सना केदार शिंदे करत आहे. म्हणजे नातवाने आजोबांवर चित्रपट करण्याचा दुर्मिळ योग जसा या चित्रपटातून जुळून आला आहे, तसाच किंवा अधिक दुर्मिळ असा पणतीने पणजीची भूमिका करण्याचा योगही ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये जुळून आला आहे. ही चित्रपटसृष्टील कदाचित एकमेव घटना असावी.

चित्रपटाबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणाले, “माझे आजोबा म्हणजे शाहिर साबळेंच्या आयुष्यात आणि यशात त्यांची पत्नी माझी आजी भानुमती यांचे योगदान अद्वितीय असेच होते. शाहिरांच्या आयुष्यातील गोड गाणे म्हणजे भानुमती. त्यामुळे भानुमतीची भूमिका माझी मुलगी करत आहे, हे जाहीर करताना मला अतिशय आनंद होतोय, अभिमान वाटतोय. नातू म्हणून मला शाहीर मोठे वाटतातच, पण एक कलाकार म्हणूनही मला त्यांचे जीवन खूपच मोठे वाटते. शाहिरांचा जीवनपट या चित्रपटाने प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचे काम गेली अडीच वर्षे सुरू आहे. आपले कलाकार किती मोठे होते, आपल्या मातीतून हे कलाकार कसे घडले, त्यांनी यश कसे मिळवले, यश मिळवणे एवढे सोपे असते का, अशा अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे नव्या पिढीला या चित्रपटाच्या माध्यमातून मिळतील.”

ABOUT THE AUTHOR

...view details