मुंबई - शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्याचा शालेय शिक्षण विभागाच्या (School Summer Vacation) निर्णयावरून बराच गदारोळ झाला होता. मात्र, ही चूक सुधारत 2022 ची उन्हाळी सुट्टी 2 मे पासून जाहीर करून नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा 13 जून 2022 पासून सुरू करण्यात यावी, अशी विनंती शिक्षण संचालनालयाने शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.
प्रधान सचिवांकडे विनंती- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. फक्त शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू होत्या. आता कोरोना नियंत्रणात आल्याने शाळा सुरळीत सुरू झाले आहे. मात्र, मुलांच्या अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे यंदा राज्याच्या शाळांतील पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग एप्रिल मध्ये पूर्ण वेळ सुरू ठेवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यभरात पालकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्रही चूक सुधारतो शिक्षण संचालनालयाने 2022 ची उन्हाळी सुट्टीत 2 मे पासून जाहीर करून नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा 13 जून 2022 पासून सुरू करण्यात यावी, अशी विनंती शिक्षण संचालनालयाने शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.
काय म्हटलं प्रस्तावात - संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी 2022 ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालनालयाकडून शालेय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. या प्रस्तावात 2 मे 2022 पासून उन्हाळी सुट्टी लागू करावी ही सुट्टी 12 जून 2022 पर्यंत राहील. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळेत जूनच्या दुसऱ्या सोमवारपासून तर विदर्भामध्ये जूनच्या चौथा सोमवार पासून सुरू करण्यात याव्यात. जूनच्या दुसऱ्या सोमवारी म्हणजेच 13 जून रोजी विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा सुरू होतील तर विदर्भातील जून मधील तापमान विचारात घेता, त्यातील शाळा चौथ्या सोमवारी म्हणजे 27 जून 2022 रोजी सुरू होतील अशा सूचना शिक्षण संचालकांकडून पाठवलेल्या प्रस्तावामध्ये मांडण्यात आलेले आहेत.