मुंबई - राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर दुकाने, उपाहारगृहे, मॉलची वेळमर्यादा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या २२ ऑक्टोबरपासून सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचे स्वागत करताना अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे. सणासुदीच्या काळात दुकाने आणि उपाहारगृहांची वेळ वाढवून देण्याची मागणी व्यावसायिक संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानंतर आता याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
प्रतिक्रिया देताना हॉटेल व्यावसायिक हेही वाचा -नवं हिंदू म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोणाला डिवचले? हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापणार!
- वेळ वाढवण्याची होती मागणी -
मुख्यमंत्र्यांनी सोमवारी टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील उपाहारगृहे आणि दुकाने यांची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. तसेच २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरू केली जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपाहारगृहांची वेळ देखील वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
दुकानांची वेळ वाढवून देताना रात्री १२ नंतर कोणतेही दुकान सुरू राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबतचे वेळमर्यादा ठरवण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन देखील सरकारकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा -केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा रोखण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची रणनिती, पवार-ठाकरे बैठकीत खलबते..