महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Omicron Variant : काळजी घ्या, मास्क वापरा! राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, ओमायक्रॉनच्या 85 रुग्णांची नोंद

राज्यात कोरोना बाधितांची संख्या आज 3 हजारांच्या पुढे गेल्याचे दिसून आले आहे. तर ओमायक्रॉनचे ( Omicron Coronavirus In Maharashtra ) 85 रुग्ण आढळून आल्याचा दावा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केला आहे.

Omicron Variant
ओमायक्रॉन

By

Published : Dec 30, 2021, 7:57 AM IST

मुंबई - राज्यात सध्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने सर्वांची डोकेदुःखी वाढवली असताना ओमायाक्रॉनचे रुग्ण वाढताना दिसून ( Coronavirus In Maharashtra ) येत आहेत. राज्यात कोरोना बाधितांची संख्या 3 हजारांच्या पुढे गेल्याचे दिसून आले आहे. तर बुधवारी ओमायाक्रॉनचे 85 रुग्ण ( Omicron Coronavirus In Maharashtra ) आढळून आल्याचा दावा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केला आहे.


14 हजार सक्रिय रुग्ण -


राज्यात बुधवारी 3 हजार 900 नवीन कोरोना बाधित आढळून आले. कोरोनाग्रस्तांचा आकडा यामुळे 66 लाख 65 हजार 386 पर्यंत पोहोचला आहे. दिवसभरात 20 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 1 हजार 306 रुग्णांना डिस्चार्ज दिला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 65 लाख 06 हजार 137 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.61 टक्के इतका आहे. तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका स्थिरस्थावर आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 86 लाख 68 हजार 760 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 09.69 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 22 हजार 90 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहे. 14 हजार 065 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.


या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई महापालिका - 2445
ठाणे पालिका - 47
ठाणे मनपा - 156
नवी मुंबई पालिका - 177
कल्याण डोबिवली पालिका - 52
वसई विरार पालिका - 81
नाशिक - 10
नाशिक पालिका - 58
अहमदनगर - 51
अहमदनगर पालिका - 9
पुणे - 84
पुणे पालिका - 239
पिंपरी चिंचवड पालिका - 83
नागपूर मनपा - 24

राज्यात ओमायक्रोनचा संसर्ग फैलावत आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि भारतीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात ओमायक्रॉनचे 85 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 47 राष्ट्रीय विषाणू संस्था तर आणि 38 भारतीय विषाणू संस्थेने पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल दिले आहेत. 47 रुग्णांपैकी 43 प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास तर 4 जण निकटवर्तीय आहेत. त्यापैकी 34 हे सर्वाधिक रुग्ण मुंबईतील तर नागपूर आणि पिंपरी चिंचवडमध्ये 3, नवी मुंबई आणि पुणे मनपा 2. कोल्हापूर, पनवेल आणि बुलढाणा येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तर 38 पैकी एकही रुग्णाचा आंतरराष्ट्रीय प्रवास नाही. मुंबईत 19, कल्याण 5, नवी मुंबई व पिंपरी चिंचवड 3, वसई - विरार व पुणे मनपा येथे 2, पुणे ग्रामीण, भिवंडी, पनवेल आणि ठाणे मनपा मध्ये प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. 19 रुग्णांची आरटीपीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले, असे आरोग्य विभागाचे म्हणणं आहे. त्यामुळे आजपर्यंत ओमायाक्रॉन रुग्णांची संख्या 252 वर पोहचली आहे.


आजपर्यंत 737 प्रवाशांची जनुकीय चाचणीसाठी नमुने -

1 डिसेंबरपासून आजपर्यंत 1 लाख 94 हजार 361 प्रवासी मुंबईत उतरले. एकूण 37 हजार 847 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 204 आणि इतर देशातील 82 अशा एकूण 286 जणांची आरटीपीसीआर तर आजपर्यंतच्या 879 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 176 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

हेही वाचा -Corona Update - राज्यात आज 3 हजार 900 तर, मुंबईत 2 हजार 510 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details