महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात दिवसभरात १६ हजार ४७६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ३९४ मृत्यू - कोरोना लेटेस्ट न्यूज

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ लाख ९२२ इतकी झाली आहे. राज्यात आज १६ हजार १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

corona
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 1, 2020, 9:54 PM IST

Updated : Oct 1, 2020, 10:03 PM IST

राज्यात दिवसभरात १६ हजार ४७६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ३९४ मृत्यू

मुंबई - गुरुवारी राज्यात कोरोनाच्या १६ हजार ४७६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ३९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ लाख ९२२ इतकी झाली आहे. राज्यात आज १६ हजार १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा -राहुल-प्रियांका दिल्लीला रवाना, पोलिसांनी सरकारी गाडीतून कालिंदी कुंज बॉर्डरवर सोडले

राज्यातील रुग्ण बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा ११ लाख ४ हजार ४२६ इतका झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.८४ टक्के एवढे आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६८ लाख ७५ हजार ४५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४ लाख ९२२ म्हणजेच २०.३८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१ लाख ७४ हजार ६५१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, २८ हजार ७२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण २ लाख ५९ हजार ६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Last Updated : Oct 1, 2020, 10:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details