महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिवसभरात नवीन रुग्णांपेक्षा डिस्चार्ज दुप्पट; 32 हजार रुग्ण कोरोनामुक्त - कोरोना लेटेस्ट न्यूज

राज्यात आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ३३ हजार १५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

corona
कोरोना

By

Published : Sep 21, 2020, 9:12 PM IST

मुंबई - राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. राज्यात आज कोरोनावाढीला थोडासा दिलासा मिळाला आहे. राज्यात १५ हजार ७३८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १२ लाख २४ हजार ३८० झाली आहे. राज्यात २ लाख ७४ हजार ६२३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आज राज्यात ३४४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ३३ हजार १५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज ३२ हजार ७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ८ लाख ८४ हजार ३४१ रुग्ण बरे झाले असून, राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८४ टक्के आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details