मुंबईगणेशोत्सव जरा जपूनच साजरा करा. कारण, महाराष्ट्रात 1 जानेवारी ते 28 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचे 2,337 रुग्ण 2337 Swine Flu cases आढळले आहेत. तर 98 मृत्यू झाल्याची नोंद झाली 98 deaths due to Swaine flue आहे. ही माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 33 रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सोमवारी लोकांना गणेशोत्सवात भाग घेताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले.
पुण्यात सर्वाधिक 770 स्वाईन फ्लू रुग्ण Swine Flu cases and deaths in Pune आढळले आहेत. तर 33 रु्णांचे मृत्यू झाले आहेत.कोल्हापुरात 159 रुग्ण आणि 13 मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत 348 स्वाईन फ्लूचे रुग्ण, तीन मृत्यू झाले आहेत. तर शेजारच्या ठाण्यात ही संख्या अनुक्रमे 474 आणि 14 आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या कालावधीत वाढत्या स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर लोकांनी सण जपून साजरा केला पाहिजे, असे अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणे जाणे टाळावे. तर उच्च जोखीम असलेल्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कोविड योग्य वर्तनाचे पालन केले पाहिजे.