मुंबई - देशभरात महिलांवर अन्याय अत्याचार होतात. या अत्याचारात उत्तरप्रदेश पहिल्या, बिहार दुसऱ्या, पश्चिम बंगाल तिसऱ्या तर पुरोगामी म्हणून ओळख असलेला महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे. तरीही 'नॅशनल क्राईम ब्युरो रिपोर्ट २०२०' च्या अहवालाचे आकडे चिंताजनक आहेत. महिलांवरील अत्याचाराबाबत सरकार गंभीर असल्याचे दाखवत असले तरी आता सरकारने ही बाब खरच गंभीरतेने घेण्याची गरज असल्याचे मत महिलांच्या समस्या आणि महिलांसाठी काम करणाऱ्या सद्भावना संघटनेच्या वर्षा विद्या विलास यांनी मांडले आहे.
- महाराष्ठ्र चौथ्या क्रमांकावर -
नॅशनल क्राईम रिपोर्टच्या अहवालानुसार देशभरात २०२० मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या ४ लाख घटनांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक अत्याचार हे उत्तर प्रदेशमध्ये ५१ हजार ९८३ नोंद झाले आहेत. त्यानंतर बिहारमध्ये ५१ हजार ११६, पश्चिम बंगालमध्ये ५० हजार २९ तर महाराष्ट्रात ३९ हजार १६२ अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात नोंद झालेल्या एकूण घटनांपैकी किडनॅपिंगच्या ८१०३, बलात्काराच्या २०६१, हत्येच्या २१६३, हुंडाबळीच्या १९७, भ्रूणहत्येच्या १२, खून करण्याचा प्रयत्न ३२५१, दुखापत करण्याच्या ७३१० आदी घटना नोंद झाल्या आहेत.
- महाराष्ट्रातील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट -
उत्तर प्रदेशमध्ये २०१८ मध्ये ६५ हजार, २०१९ मध्ये ५५ हजार ५१९ तर २०२० मध्ये ५१ हजार ९८३ घटनांची नोंद झाली. बिहारमध्ये २०१८ मध्ये ४४ हजार ४०७, २०१९ मध्ये ४५ हजार ४, २०२० मध्ये ५१ हजार ११६ घटनांची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये २०१८ मध्ये ४५ हजार ७०६, २०१९ मध्ये ४४ हजार ७४ तर २०२० मध्ये ३९ हजार १६२ घटनांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात २०१८ मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या ४५ हजार ७०६ घटना नोंद झाल्या होत्या. २०१९ मध्ये ४४ हजार ७४ घटनांची नोंद झाली. तर २०२० मध्ये या घटनांमध्ये घट होऊन ३९ हजार १६२ घटनांची नोंद झाली आहे.
- सरकारने गंभीरतेने घ्यावे -