महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Rain Update : पुढच्या २४ तासांसाठी मुंबई अलर्टवर, हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा - मुंबई रेड अलर्ट

गेल्या आठवड्याभरात पडलेल्या पावसामुळे ( Heavy rain ) यंदाच्या पावसाळ्यात मुंबईमध्ये ( Mumbai ) सांताक्रूझ येथे १०० सेंटीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. तर कुलाब्याचा पाऊसही ( rain ) ९५ सेंटीमीटरपर्यंत पोहोचला आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याचा अंदाज जुलैमध्ये पडलेल्या पावसाने सिद्ध केला आहे.

हवामान खात्याकडून पावसाचा इशारा
हवामान खात्याकडून पावसाचा इशारा

By

Published : Jul 10, 2022, 11:38 AM IST

मुंबई - मुंबईत आठवडाभर मुसळधार पावसाने ( Heavy rain ) हजेरी लावल्यानंतर आज पावसाने विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळत आहे. पण सध्या थांबलेला हा पाऊस पुन्हा जोरदार कोसणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून ( weather department ) देण्यात आला आहे. आज दुपार पासून पुढच्या २४ तासांसाठी मुंबई अलर्ट ( Mumbai Alert ) देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या आठवड्याभरात पडलेल्या पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे १०० सेंटीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. तर कुलाब्याचा पाऊसही ९५ सेंटीमीटरपर्यंत पोहोचला आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याचा अंदाज जुलैमध्ये पडलेल्या पावसाने सिद्ध केला आहे.

मुंबईला रेड अलर्ट -सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरामध्ये येत्या पाच दिवसांमध्ये परिस्थिती अशीच असेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी दिली. शुक्रवारी पालघर, ठाण्यासह मुंबईलाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी अती तीव्र मुससळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही शुक्रवारी रेड अलर्ट आहे. पुणे, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाट भागात तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊस पडू शकेल.

विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता -5 ते 8 तारखेला कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, 5 ते 8 जुलै 2022 दरम्यान दक्षिण गुजरात प्रदेशात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 आणि 8 रोजी पश्चिम मध्य प्रदेश, 5, 8 आणि 9 रोजी विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागांत अती मुसळधार पावसाचे इशारे देण्यात आले आहे.

मुंबईत रोज पावसाची बॅटिंग -मुंबईतील दहिसर, बोरिवली मालाड, कांदिवली, जोगेश्वरी, अंधेरी वांद्रे, दादर या इतर भागात मुसळधार पाऊस झाला. सलग तीन दिवसांपासून मुंबईत पाऊस पडत आहे. रात्रभर पाऊस पडला, तर मुंबईच्या अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबले. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे.

मुंबईमध्ये सोमवारपासून मुसळधार -मुंबईमध्ये सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत ( Heavy Rain In Mumbai ) आहे. यामुळे काल अनेक सखल भागात पाणी साचले होते. काल मध्यरात्री पुन्हा मुसळधार पाऊस पडला. यामुळे पून्हा सखल भागात पाणी साचले. सकाळी पाऊसाने विश्रांती घेतली तसेच पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा निचरा होत आहे. याकारणाने मुंबईतील ट्रॅफिकवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. दुपारच्या दरम्यान मुंबईच्या रस्त्यावर कमी प्रमाणात वाहने दिसत आहेत.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा -या सर्वांबाबत हवामान विभागाचे अधिकारी जयंत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोराचे वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पुढचे काही दिवस पडेल. या मुसळधार पावसाचा फटका मुंबई तसेच उपनगरासह मुंबईच्या आजूबाजूच्या कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. तसेच याचा काहीसा परिणाम उर्वरित महाराष्ट्रात देखील थोड्या प्रमाणात दिसेल. त्यामुळे मुंबई हवामान विभागाकडून या परिसरात काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा." असं आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा -Mahapuja CM : मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा, पहा पूजेचा व्हिडिओ...

ABOUT THE AUTHOR

...view details