मुंबई - काल रात्रीपासून मुंबई ( Maharashtra rain update ) सह राज्यात बऱ्याच ठिकाणी ( Very heavy rain in Mumbai ) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र, घाट परिसरासह मराठवाड्यात सुद्धा मुसळधार पावसाला ( Very heavy rain Maharashtra ) सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरातून दक्षिण महाराष्ट्रातील ( red alert to vidarbha districts ) उत्तर किनारपट्टी लगतच्या हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय बदलांमुळे मुंबईसह ( mumbai rain update ) संपूर्ण राज्यात ठीक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद होत असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. पुढील तीन दिवस हीच ( mumbai rain news today ) परिस्थिती कायम राहणार असून आज पालघर, ठाणे, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
पुढील तीन दिवस राहणार पावसाचा जोर? -बंगालच्या उपसागराच्या उत्तर पश्चिम आणि लगतच्या पश्चिम मध्य भागावरील आणि दक्षिण ओरिसा व उत्तर आंध्रप्रदेशवर कमी दाबाचे क्षेत्र आहे. येत्या २४ तासांत ती जोर पकडेल. त्यामुळे, पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात व मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर जयंता सरकार यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या २४ तासांत कोकण मध्य महाराष्ट्र घाट परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर, काही ठिकाणी अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे.