मुंबई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा Shivsena ढासळलेला बुरुज पुन्हा उभा करण्याचे मिशन हाती घेतले असून निष्ठावंतांवर मुख्य जबाबदारी सोपवली जात आहे. आज शिवसेनेच्या नेते पदी अरविंद सावंत Shiv Sena leader Arvind Sawant आणि भास्कर जाधव Bhaskar Jadhav तर शिवसेना सचिवपदी लीलाधर डाके Leeladhar Dake Shiv Sena Secretary यांच्या मुलाची वर्णी लावली आहे. बंडखोरीमुळे रिक्त झालेल्या पदांवर नव्या नियुक्त्या केल्या असून राज्यभरात ही नव्या पदाधिकाऱ्यांची खांदेपालट केली जात आहे.
भास्कर जाधव आणि अरविंद सावंत यांची निवड शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेचे बालेकिल्ला ढासळू लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी Shiv Sena chief Uddhav Thackeray पुन्हा एकदा शिवसेनेची तगडी फळी उभी करण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेचे फायरब्रॅंड संजय राऊत तुरुंगात गेल्यानंतर ही जबाबदारी सेनेच्या आक्रमक नेत्यांवर सोपवण्यात येत आहे. राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात Monsoon session सत्ताधाऱ्यांना जेरीस आणणाऱ्या आणि आक्रमकपणे शिवसेनेची बाजू लावून धरणाऱ्या भास्कर जाधव तर संसदेत शिवसेनेचा किल्ला लढवणाऱ्या अरविंद सावंत यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय लीलाधर डाके यांचा मुलगा पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.