मुंबई- राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना आज घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे. यानंतर आज दिवसभरात अनेक घडामो़डी आणि बैठकांचा सपाटा सुरूच आहे.
UPDATES -
10.20 PM -अजित पवारांना विधीमंडळ नेतेपदावरुन काढणे अयोग्य - आशिष शेलार
10.15 PM -जयंत पाटलांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती अवैध - भाजप
10.00 PM -सत्तास्थापनेविरोधात उद्या साडेअकरा वाजता सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
9.45 PM- अजित पवार यांची विधीमंडळ गटनेते पद रद्द करण्यात आले - जयंत पाटील
- विधीमंडळ गटनेते पदाची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली आहे - पाटील
- 54 पैकी 49 आमदारांचा आज आमच्या निर्णयाला पाठिंबा - पाटील
- अजित पवारांवर पक्षाकडून कारवाई करण्याबाबत, कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय लवकरच घेऊ
- अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले- पाटील
- उद्यापर्यंत आम्ही 54 चा आकडा पूर्ण करू
- आमच्याकडे आमदारांच्या सह्या आहेत, आम्ही खोटे दावे करत नाहीत
- आमच्या तीनही पक्षांचे सर्व आमदार उद्या एकत्र येतील - पाटील
- आमदारांच्या सह्यांच्या सहा प्रति पैकी एक प्रत घेऊन त्याचा गैरवापर झाला- पाटील
- पक्षविरोधी कारवाई करण्यात कारवाई होणार, अजित पवारांनी पक्षाशी प्रतारणा केली.
- कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच त्यांच्यावर कारवाई करणार - पाटील
9.10 PM राष्ट्रवादीची बैठक संपली, आमदार पवईतील हॉटेल रेनीसन्समध्ये हलवणार
आमदार धनंजय मुंडेही बसमध्ये उपस्थित..
8.40 PM - राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक; धनंजय मुंडे उपस्थित
8.32 PM -बहुमताच्या चाचणीत भाजपला पराभूत करू - मलिक
8.30 PM -राष्ट्रवादीचे 40 आमदार बैठकीला हजर - नवाब मलिक