मुंबई -भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी राज्य सरकारला 3 मे चा अल्टिमेटम दिला आहे. तर राज्यातली कायदा व सुव्यवस्था यामुळे बिघडू नये. यासाठी राज्य सरकार हरकतीत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ( HM Dilip walase Patil ) याबाबतची बैठक घेतली. राज्यात धार्मिक वक्तव्य करून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले ( Political Leaders Religiouse Statements ) आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या धार्मिक वक्तव्यामुळे राज्यामध्ये तणाव निर्माण झाला, आहे असे म्हटले तर वावगं होणार नाही. मशिदीवरील भोंगे लावण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला आहे. तर तिथे जेम्स लेन ( James Lane ) यांनी आपल्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत ( Chhatrapati Shivaji Maharaj ) आक्षेपार्ह लिखाण केलं असल्याचा मुद्दाही पुन्हा एकदा चर्चेला जातोय. तर तेथेच राजकीय नेत्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेमुळे राजकीय वातावरण तापलेल्या पाहायला मिळतेय. यासोबतच "छेडेंगे तो छोडेंगे नही" अशी प्रक्षोभक वक्तव्य देखील काही लोकांकडून केली जात आहेत. त्यामुळे एकूणच या सर्व गोष्टींचा महाराष्ट्रावर प्रभाव पडत असून, राज्यात तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मशिदीवरील लाऊड स्पीकर समोर हनुमान चालीसाचा भोंगा -राज ठाकरे यांनी 2 एप्रिलला घेतलेल्या गुढीपाडवा मेळाव्यादरम्यान आपल्या भाषणातून अजानसाठी मशिदीवर लावण्यात येणाऱ्या लाऊड स्पीकरचा मुद्दा उपस्थित केला होता. कायद्यानुसार लाऊड स्पीकर लावण्याला मनाई असताना देखील मशिदीवर लाऊड स्पीकर कसे लावले जातात. त्यावर अजान केली जाते. त्यामुळे बेकायदेशीर मशिदीवर लावण्यात आलेले लाऊडस्पीकर काढण्यात यावेत, अशी मागणी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केली. तसेच, ठाण्यामध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी राज्य सरकारला तीन मेपर्यंत बेकायदेशीरपणे मशिदीवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकर काढण्याचा अल्टिमेटम दिला आहे. लाऊड स्पीकर न काढल्यास हनुमान चालीसा लावण्याचा आदेश त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्यातील मेळाव्याच्या भाषणानंतर अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लाऊड स्पीकर वर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न केला. दादर मध्ये तर थेट शिवसेना भवनाच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यात आली होती. बेकायदेशीर लाऊड स्पीकरचा वापर केल्यामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
Political Leader Religiouse Statements : राजकीय नेत्यांच्या धार्मिक वक्तव्यामुळे राज्यात अशांतता निर्माण होते का? - राज ठाकरे अयोध्या दौरा
मागील काही दिवसांपासून नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. तर, राज्यात धार्मिक वक्तव्य करून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले ( Political Leaders Religiouse Statements ) आहे.
हनुमान जयंतीचा अभूतपूर्व जल्लोष -16 एप्रिलला हनुमान जयंती राज्यभरातच नाही तर देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, यावेळी महाराष्ट्रात हनुमान जयंतीच्या उत्सवाला राजकीय झालर पाहायला मिळाली. राज ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह काही नेत्यांनी थेट बजरंग बलीच्या मंदिरात जाऊन महाआरती करत हनुमान जयंती साजरी केली. दरवर्षी हनुमान जयंती उत्सवात साजरी होते. मात्र, सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय चढाओढीत यावर्षीच्या हनुमान जयंतीला वेगळे वलय प्राप्त झाले होते. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांकडून हनुमान जयंती उत्सवात साजरी करत असताना एकमेकांना राजकीय उपदेश देण्याचे प्रयत्न झालेले पाहायला मिळाले.
हेही वाचा -Exclusive : कायद्यानुसार सरकारने राज्य चालवावे.. भोग्यांवर गोपीचंद पडळकर यांची भूमिका