महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde Live Updates : बंडखोर आमदार सुरत विमानतळावर पोचले चार्टर्ड विमानाने पुढचा प्रवास

उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे

By

Published : Jun 21, 2022, 10:18 AM IST

Updated : Jun 22, 2022, 2:39 AM IST

02:35 June 22

बंडखोर आमदार सुरत विमानतळावर पोचले चार्टर्ड विमानाने पुढचा प्रवास

दिवसभराच्या नाट्यमय घडामडी नंतर सर्व बंडखोर आमदारांना ट्रॅव्ह्ल्सच्या तीन बसच्या माध्यमातुन रात्री 2.15 च्या सुमारास सुरत विमानतळावर नेण्यात आले. तेथुन चार्टर्ड विमानाने गुवाहाटीला नेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांच्या माध्यमातुन समोर येत आहे

23:47 June 21

आमदारांना हाॅटेलवरुन हालवण्याच्या हालचाली; तीन ट्रॅव्हल्स पोचल्या

आमदारांना हाॅटेलवरुन हालवण्याच्या हालचाली वाढल्या आहेत हाॅटेल परिसरात तीन ट्रॅव्हल्स पोचल्या आहेत त्यातुन त्यांंना विमानतळावर नेले जाणार आहे

22:58 June 21

सूरतमधील शिवसेना आमदारांना गुवाहाटी घेऊन जाण्याची शक्यता

सूरतमधील शिवसेना आमदारांना गुवाहाटी घेऊन जाण्याची शक्यता आहे.

22:49 June 21

आमदार देशमुख यांच्या पत्नी व सेनेचे काही पदाधिकारी सुरतकडे रवाना

फोन नाही काहीच नाही आणि मला खूप काळजी वाटते. हे तिथे मंत्र्यांना निघता येत नाही. त्यामुळे मी स्वतः सुरतला निघत आहे. आता सुरतला जाण्यासाठी आणि मला जायचं आहे. सुरतला काही कोणी रोखले तरी मी जाणारच आहे, अशी प्रतिक्रिया आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी दिली आहे. काहीही परिस्थिती झाली तरी मी सुरतला जाईल, असं त्या म्हणाल्या. त्या आणि काही सेनेचे पदाधिकारी हे दुपारी सुरतसाठी रवाना झाले आहेत.

22:37 June 21

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत दाखल होण्याचे निर्देश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत दाखल होण्याचे निर्देश

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साधणार आमदारांची संवाद

वाय बी चव्हाण इथे साधणार संवाद

22:14 June 21

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेना फ्लॅशबॅक

मुंबई -भाजपसोबत जुळवून घेण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या एकनाथ शिंदे यांना, मागील पाच वर्षात भाजपने कमी त्रास दिला का? अशी आठवण मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांनी करून दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत आहे. तुम्ही घाबरू नका असा विश्वास ही ठाकरे यांनी शिंदे यांना दिल्याची माहिती मिळत आहे.

22:01 June 21

शिवसेनेला पुन्हा हिंदुत्वाची खीळ

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर त्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू असताना त्यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत आणि आम्हाला बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आहे असं सांगत शिवसेनेच्या सध्याच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

20:40 June 21

वर्षा बंगल्यावरची महाविकास आघाडीची बैठक संपली

वर्षा बंगल्यावरची महाविकास आघाडीची बैठक संपली

आता शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुरू

शरद पवार यांच्या घरी राष्ट्रवादी नेत्यांची बैठक होणार

20:30 June 21

अजय चौधरी यांची गटनेते पदी नियुक्ती

गटनेते पदी शिवसेनेकडून अजय चौधरी यांची निवड विधानभवन सचिवालय यांनी केली मान्य

शिवसेनेला पत्राद्वारे मान्यता दिली

एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी अजय चौधरी यांची गटनेते पदी नियुक्ती

19:43 June 21

उद्या कॅबिनेटची होणार बैठक; राजकीय घडामोडींना वेग

उद्या कॅबिनेटची बैठक होणार आहे. मंत्रालयात दुपारी १ वाजता ही बैठक होणार आहे. सरकार स्थिर असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे.

19:15 June 21

एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली - संजय राऊत

आमचे दोन लोक सुरतला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. ते आमचे जुने मित्र आहेत...आम्ही भाजप का सोडली हे सर्वांना माहीत आहे आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा त्याचे साक्षीदार आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

19:11 June 21

महाराष्ट्रातसुद्धा लोटस ऑपरेशन करून सरकार पाडण्याच भाजपचं कटू कारस्थान - एच के पाटील

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय भूकंपानंतर काँग्रेस आमदारांची बैठक घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी दाखल झाले.

18:23 June 21

गटनेते पदी अजय चौधरी; शिवसेनेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवल यांना पत्र

18:05 June 21

गुजरातमध्ये आमदारांच्या जीवाला धोका - संजय राऊत

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये गेलेल्या आमदारांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. आमदार नितीन देशमुख यांना यावेळी मारहाण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

18:00 June 21

महाविकास आघाडीची बैठक सुरू

आता संध्याकाळी ६ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी महा विकास आघाडीचे नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. बाळासाहेब थोरात बैठकीसाठी आले आहेत. अशोक चव्हाणही उपस्थित राहणार आहेत.

17:34 June 21

नारायण राणे यांची प्रतिक्रिया

शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.

17:11 June 21

शिवसेना नेत्यांची आणि आमदारांची पुन्हा बैठक

सायंकाळी शिवसेना नेत्यांची आणि आमदारांची पुन्हा बोलावली बैठक

सायंकाळी शिवसेना नेत्यांची आणि आमदारांची पुन्हा बोलावली बैठक

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री घेणार शिवसेना आमदारांची बैठक

मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत

या भेटीत झालेल्या चर्चेनंतर शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करणार

सायंकाळी बोलावलेल्या बैठकीला सर्व आमदारांना आणि नेत्यांना उपस्थित राहण्याचे आदेश

16:55 June 21

मिलिंद नार्वेकर शिंदेंच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये पोहचले

शिवसेना नेते रविंद्र फाटक स्वत: कार चालवत हॉटेलमध्ये पोहचले आहेत. तसेच त्यांना 100 मीटर अंतर कापण्यासाठी दहा मिनिट लागले आहेत.

16:38 June 21

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी होण्याची शक्यता

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी होण्याची शक्यता

उद्धव ठाकरे यांचे सर्व शिवसैनिकांना दादरला शिवसेना भवनात जमण्याचे आदेश

उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या मदतीने शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता

शिवसेना भवनाबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमायला सुरुवात

16:11 June 21

सर्व आमदार आमच्या संपर्कात - जयंत पाटील

एकनाथ शिंदे काही आमदारांसह सुरतमध्ये असल्याची माहिती आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विरोधात शिवसैनिक काही करेल असे वाटत नाही. मला विश्वास आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व आमदारांना एकत्र ठेवतील. सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत, मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया.

15:55 June 21

संजय राऊत प्रतिक्रिया

संजय राऊत प्रतिक्रिया

हे भारतीय जनता पक्षाचे षड्यंत्र आहे

ऑपरेशन लोटस हा प्रकार यांनी सुरू केला आहे

आमच्या आमदारांचे अपहरण करून गुजरात पोलिसांनी त्यांना गराडा घातला

यातून सुटका करून घेणाऱ्या आमदारांवर कोणी हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे

मात्र यातून शिवसेना बाहेर पडेल

कोणी कितीही म्हटलं तरी संघटनेला तडा गेलेला नाही

संध्याकाळी पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे

आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला

अजय चौधरी यांना गटनेते पद देण्यात आला आहे

15:37 June 21

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे बाहेर आहेत अश्यात आपल्या आमदारांची बैठक एकत्रित बोलावल्याची झाली तर गटनेता असावा म्हणून गटनेता शिवसेनेने बनवला असेल. सरकारला काहीही धोका नाही, असे छगन भुजबळ म्हणालेत. शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. एकनाथ शिंदे यांची मनधरणी होईल. तर सरकार अडीच अडीच वर्षे असेल असे राष्ट्रवादी आणि सेनेत ठरले नसल्याची माझी माहिती असल्याचे भुजबळ म्हणालेत

15:24 June 21

वर्षा निवासस्थानी शिवसेना नेत्यांची बैठक, बैठकीला 14 आमदार उपस्थित

शिवसेना मंत्री आणि नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या विरोधात पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी जवळपास 22 ते 25 आमदार सुरतमध्ये असल्याचा दावा केला जातोय. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा पवित्रा नंतर शिवसेनेकडून देखील बैठकीचे सत्र सुरू झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी शिवसेना नेत्यांची आणि आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला जवळपास शिवसेनेचे 33 ते 34 नेते, आमदार आणि खासदार उपस्थित आहेत. यामध्ये विधानसभेचे 14 आमदार अनुपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

14:56 June 21

एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले

एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले

शिवसेनेकडे शिंदे वर कारवाई

बैठकीत सर्व नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून घेतला निर्णय

सरकार जाणार नाही याचा विश्वास या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांना दिला

तसेच एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करणार

सर्वांना परत आणण्याबाबत हालचाली करणे

14:50 June 21

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही

14:50 June 21

14:44 June 21

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक; आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही - एकनाथ शिंदे

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही

14:34 June 21

राजकीय पेचातून मार्ग निघेल- शरद पवार

नवी दिल्ली - राजकीय पेचातून मार्ग निघेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे की नाही, हे माहित नसल्याचेही त्यांनी सांगितले.

14:15 June 21

भाजपचे प्रयत्न हे लोकशाहीला घातक - नाना पटोले

मुंबई- केंद्रीय तपास यंत्रणा दुरुपयोग होत आहे. कर्नाटक आणि मध्या प्रदेश सरकार पाडले तसे महाराष्ट्र सरकार पाडण्याचा प्रयत्न आहे. भाजपचे प्रयत्न हे लोकशाहीला घातक आहेत. आम्ही प्रत्येक परीक्षेला सामोरे जाऊ, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

13:52 June 21

वर्षा बंगल्यावर हे १४ आमदार राहिले हजर

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक बोलाविली आहे. या बैठकीलाविधानसभेचे हे १४ आमदार वर्षावर हजर आहेत. आणखी काही आमदार प्रवासात आहे. ते आमदार वर्षावर पोहोचत आहेत.

१.वैभव नाईक

२. रविंद्र वायकर

३. गुलाबराव पाटील

४. दादा भुसे

५. संजय राठोड

६. मंगेश कुडाळकर

७. सुनिल प्रभू

८. आदित्य ठाकरे

९. प्रकाश फातर्पेकर

१०. अजय चौधरी

११. राहूल पाटील

१२. दिलीप लांडे

१३.उदय सामंत

१४. राजन साळवी

13:45 June 21

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये जे. पी. नड्डा यांची घेणार भेट

नवी दिल्ली - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.

13:38 June 21

मंत्रालयात अजित पवार यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू

मुंबई -मंत्रालयात अजित पवार यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे. जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी राष्ट्रवादी काँग्रेस नेते उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीबाबत चर्चा सुरू आहेत.

13:35 June 21

वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक सुरू

मुंबई - वर्षा बंगल्यावर ५४ पैकी १४ आमदारांसह ३३ नेते उपस्थित आहेत.

13:13 June 21

अपक्ष आमदार गीता जैन वर्षावर दाखल


मीरा भाईंदर- राज्यातील राजकिय घडामोडी पाहता शिवसेनेच्या एक गट फुटल्याने खळबळ माजली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे अनेक आमदार घेऊन काल रात्री सुरतला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या सोबत अपक्ष आमदार असल्याचं बोलले जात आहे. मात्र मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन ह्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला पोहचल्या आहेत.आ मदार गीता जैन यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली असून,त्यामध्ये त्यांनी लवकरचं कार्यकर्त्यांशी बोलून पुढील रणनीती ठरवण्यात येईल असे सांगितले आहे.

12:46 June 21

संजय राऊत यांच्या उद्दामपणामुळे लोक संतप्त - चंद्रकांत पाटील

मुंबई -शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या सर्व षडयंत्रा मागे भाजप असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांचे हे आरोप फेटाळत नाना पटोले यांना पराभवानंतर असे बोलण्याची सवयच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उद्दामपणामुळे अनेक लोक संतप्त असल्याचं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत ते बोलत होते.

12:28 June 21

शिवसेना आमदार सुरतला जाऊ नये, याकरिता खबरदारी घेण्यास सुरुवात

मुंबई - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नाराज झाल्यानंतर शिवसेनेने खबरदारी करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांना वर्षा बंगल्यावर नेण्यात येत आहे.

12:10 June 21

एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार जात आहेत, याचा अर्थ नाराजी आहे - गुलाबराव पाटील

मुंबई-एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या आमदारांची मागणी आहे, की भाजपसोबत जावs, बातम्यातून पाहिले. याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्याला माझा पाठिंबा असेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे मोठा नेता आहे, ते जाऊन चालणार नाही ते आम्हाला हवेत, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

11:56 June 21

एकनाथ शिंदे इतक्या आमदारांसोबत का गेले हे कळत नाही, ही त्यांची अंतर्गत बाब - चंद्रकांत पाटील

मुंबई- जनतेला पैशापेक्षा आदराची गरज असल्याने आमदारांची नाराजी आहे आहे. एकनाथ शिंदे इतक्या आमदारांसोबत का गेले हे कळत नाही, ही त्यांची अंतर्गत बाब असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

11:24 June 21

एकनाथ शिंदेंबाबत वर्धापनदिनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे 'ते' सूचक वक्तव्य

मुंबई - शिवसेना 56 वर्ष पूर्ण करते आहे. नव्या दमाचे नव्या उमेदीचे शिवसैनिक दररोज येत आहेत. मात्र गद्दारांना शिवसेनेत जागा नाही, असे सूचक वक्तव्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. मंत्री एकनाथ शिंदे यांची यांच्या नाराजीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आधीपासूनच कुणकुण लागली होती. त्यामुळेच वर्धापन दिनाच्या भाषणात त्यांनी जोरदार फटकारे मारले हो

11:05 June 21

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा

मुंबई-शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक बोलावली आहे. शरद पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांचीदेखील चर्चा केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडी अडचणीत आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 29 आमदार आहेत. कट्टर शिवसैनिक गुलाबराव पाटील हेदेखील शिंदे सोबत असल्याची माहिती मिळत आहे.

11:02 June 21

देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना, राजकीय घडामोडींना वेग

मुंबई-एकनाथ शिंदे बाबत दिल्ली हाय कामांडशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

10:59 June 21

राज्य सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू, षडयंत्र यशस्वी होणार नाही- संजय राऊत

मुंबई- हा छातीवर नाही पाठीव घाव आहे. एकनाथ शिंदे हे कडवे शिवसैनिक आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही. दबाव आणण्याचे प्रकार आपल्याला माहित आहे.

10:51 June 21

कोल्हापूरातील आमदार प्रकाश आबिटकरसुद्धा नॉट रीचेबल

आमदार प्रकाश आबिटकर

कोल्हापूर - राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर हे सुद्धा सकाळपासून नॉटरिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असल्याने त्यांनी थेट गुजरात गाठले असल्याची माहिती सध्या मिळत आहे. अध्याप याबाबत स्पष्ट झाले नसले तरी शिवसेनेवर मात्र नाराज होते अशी मतदारसंघात चर्चा सुरू असून आता एव्हड्या मोठ्या प्रमाणात शिंदे समर्थक शिवसेनेचे आमदार नॉट रीचेबल असल्याने शिवसेना फुटीच्या मार्गावर आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

10:49 June 21

गृहराज्यमंत्र्यांसह कोरेगावचे आमदार एकनाथ शिंदेंच्या गोटात

सातार- विद्यमान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे नाराज मंत्री एकनाथ शिंदेसोबत जाणे, हा पाटण तालुक्यासाठी राजकीय भूकंप ठरला आहे. पाटण तालुका भूकंपप्रवण मानला जातो. लहान-मोठ्या भूकंपाचे हादरे नेहमीच बसतात. परंतु, आजच्या राजकीय भूकंपाची कंपने मुंबईपर्यंत जाणवत आहेत. पाटणचे आमदार तथा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे शिवसेनेचे दोन्ही आमदार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

10:32 June 21

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर हे आहेत १३ आमदार

मुंबई - विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी सायंकाळपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासोबत डझनभर आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का असून शिवसेना फुटीच्या मार्गावर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

1. शहाजी बापू पाटील

2. महेश शिंदे सातारा

3. भरत गोगावले

4. महेंद्र दळवी

5. महेश थोरवे

6. विश्वनाथ भोईर

7. संजय राठोड

8. संदीपान भुमरे

9. उदयसिंह राजपूत

10. संजय शिरसाठ

11. रमेश बोरणारे

12. प्रदीप जैस्वाल

13. अब्दुल सत्तार

10:25 June 21

एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

मुंबई- सुरतमध्ये पोहोचलेले एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत राज्य राखीव दलाची टीमदेखील एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे अन्य आमदारांसोबत गुजरातमध्ये आहेत. ठाण्यातील पोलिसांनादेखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि नगरसेवक हेदेखील नॉट रेचेबल आणि सर्व नेते पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असण्याची शक्यता आहे.

10:07 June 21

Maharashtra political Live Update :एकनाथ शिंदे म्हणाले, भाजपशी जुळवून घ्या; मुख्यमंत्री म्हणतात 'भाजपने कमी त्रास दिला नाही'

मुंबई-महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे हे सुरतमध्ये पोहोचले आहेत. येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ते थांबले असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे ११ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.

Last Updated : Jun 22, 2022, 2:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details