मुंबई -तुम्ही एका बापाचे असाल तर आमदारकीचे राजीनामे द्यावे, अशा बोचऱ्या शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोरांना आव्हान दिले आहे. हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, त्यांच्या हातात भगवा झेंडा आहे. वेळ पडल्यास शिवसैनिक झेंडा खिशात ठेवतील आणि त्याचा दांडा वापरतील असा सज्जड इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
बंडखोरांना इशारा - आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेने स्थानिक पातळीवर शिवसैनिकांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेना बंडखोरांना इशारा दिला. शिवसेनेला बंड नवीन नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेने असे अनेक बंड पचवले असल्याचे सांगितले.
हेही वाचा -Meeting On Silver Oak : सरकार टिकवण्यासाठी कायदेशीर लढाई; सिल्वर ओकवर बैठक