मुंबई - शिवसेना तसेच शिंदे गटांमध्ये आता दावे-प्रतिदाव्यांचे युद्ध सुरू झाले आहे. शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या सोबत जावून परत आलेले आमदार नितीन देशमुख ( Shiv Sena MLA Nitin Deshmukh ) यांनी आपल्याला जबरदस्ती नेण्यात आल्याचा आरोप केला आहे. सुरत येथे माझा घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला असा दावा देखील त्यांनी केला. गोहाटीमधून आपण शिंदे गटाला चकवा देऊन पळून आल्याचे त्यांनी सांगितले.
देशमुख यांचा दावा खोटा -मात्र, आमदार अनिल देशमुख हे खोटे बोलत असून त्यांना शिंदे गटाने खाजगी विमानाने परत पाठवल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. दरम्यान, मुंबईत नितीन देशमुख यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, निलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी आपल्यासोबत झालेला घटनाक्रम सांगितला. त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदे यांनी त्यांना कश्याप्रकारे बैठकीला बोलवले.