महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदार गोव्यात, 1 जुलैला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेण्याची शक्यता - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पत्र

Maharashtra political crisis
महाविकास आघाडी संकट

By

Published : Jun 29, 2022, 6:26 AM IST

Updated : Jun 29, 2022, 11:10 PM IST

23:08 June 29

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी राजभवनाकडे रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी राजभवनाकडे रवाना झाले आहेत.

22:54 June 29

1 जुलैला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेण्याची शक्यता

मुंबई 1 जुलैला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथ विधी होणार आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत 10 मंत्री शपथ घेतील. यातील पाच ते सहा मंत्री भाजप तर इतर एकनाथ शिंदे गटातील असणार आहेत. अशी माहिती देण्यात येत आहे.

22:43 June 29

एक संवेदनशील, सभ्य मुख्यमंत्री आपण गमावला - संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत विनम्रपणे राजीनामा दिला. एक संवेदनशील, सभ्य मुख्यमंत्री आपण गमावला आहे. इतिहास साक्षी आहे की फसवणूक शेवट नीट संपत नाही. ठाकरे जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाणार, जाणार तुरुंगात टाका, पण बाळासाहेब तेच शिवसेना धगधगते! असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

22:25 June 29

बंडखोर आमदार गोव्यात दाखल, चोख पोलीस बंदोबस्त तैनात

शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यात दाखल झालेले आहेत. गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती या सर्व बंडखोरांचा आगमन झालेले आहेत. थोड्याच वेळात ते हॉटेल ताज कामेंशन सेंटर दिशेने मार्गस्थ होतील. गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती चूक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे हॉटेल ताज कन्व्हेन्शन परिसरातही पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. प्रत्येक वाहनाची चौकशी होते काही वाहन एमएच पासिंगची वाहन आतमध्ये घुसण्याची प्रयत्न करत होती. अशा वाहनाने पोलिसांनी माघारी पाठवलेला आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनाची कसून चौकशी होते. प्रत्येक संशयित वाहन पोलीस चेक करत आहेत. थोड्याच वेळात हे बंडखोर आमदार पाच कन्व्हेन्शन सेंटर मध्ये दाखल होतील.

22:23 June 29

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा नेत्यांची ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक

माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पक्षाचे इतर नेते मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये विधिमंडळाच्या बैठकीसाठी आले होते.

21:40 June 29

तळागाळातील शिवसैनिक माझ्यासोबत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्यास तयार होते. जे सोबत होते ते सोडून गेले, पण ज्यांना गद्दार बोलले जात होते ते आज सोबत आहेत - उद्धव ठाकरे

21:36 June 29

21:29 June 29

अनिल परब राजभवनाकडे रवाना, काही क्षणात मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद

अनिल परब राजभवनाकडे रवाना झाले आहेत. तर काही क्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत.

21:01 June 29

भाजप असो वा एमव्हीए - जे कुबड्यांवर चालत आहेत - आमदार अबू असीम आझमी

औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय आज उद्धव ठाकरे सरकारने घेतला. भाजप असो वा एमव्हीए - जे कुबड्यांवर चालत आहेत त्यांना मुस्लिमांना बाजूला करायचे आहे, समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

20:31 June 29

फ्लोअर टेस्टला स्थगिती देण्याच्या शिवसेनेच्या मुख्य व्हीपच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय रात्री 9 वाजता

राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र विधानसभेतील उद्याच्या फ्लोअर टेस्टला स्थगिती देण्याच्या शिवसेनेच्या मुख्य व्हीपच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज रात्री 9 वाजता आदेश देणार आहे.

19:33 June 29

मुख्यमंत्र्यानी भविष्यातही आमच्याकडून अशाच सहकार्याची अपेक्षा केली - सुनील केदार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते सुनील केदार यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांना यापूर्वी कोणताही प्रशासकीय अनुभव नव्हता - त्यांनी कोरोनाचा सामना केला. त्याच्यावर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आली. मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर महिन्याभरात कोणी काम करण्यास सुरुवात केली आहे? मला एक नाव द्या. या माणसाने ते केले. पंतप्रधानांनीही त्यांना सांगितले की त्यांनी ताकद दाखवली, असे सुनील केदार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आम्ही त्यांना चांगले सहकार्य केले आणि भविष्यातही आमच्याकडून अशाच सहकार्याची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते आमच्याशीही असेच वागतील, असेही सुनील केदार म्हणाले.

18:26 June 29

औरंगाबाद शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास मान्यता

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

औरंगाबाद शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास मान्यता.

(सामान्य प्रशासन विभाग)

उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव" नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.

(नगर विकास विभाग)

राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषि विभाग)

कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार

(विधि व न्याय विभाग)

अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार

(परिवहन विभाग)

ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.

(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.

(नियोजन विभाग)

निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय

( सामान्य प्रशासन विभाग)

18:18 June 29

पुणे शहराचे नाव जिजाऊनगर करावे - काँग्रेसची मागणी

पुणे शहराचे नाव जिजाऊनगर करावे

काँग्रेस मंत्र्यांची कॅबिनेटमध्ये मागणी

18:16 June 29

मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबईतील मंत्रालयात पोहोचले

आज संध्याकाळी 5 वाजता मंत्रीमंडळाची बैठक आहे. या मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह इतर मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबईतील मंत्रालयाला पोहोचले आहेत.

18:01 June 29

अॅड सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू

अॅड सिंघवी म्हणतात - हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर निकालाच्या प्रतीक्षेत असताना, नुकतेच कोविडमधून बरे झालेले राज्यपाल, विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी फ्लोअर टेस्टची मागणी कशी करू शकतात?

17:50 June 29

उद्या मुंबईत पोहचणार - एकनाथ शिंदे

उद्या मुंबईत पोहोचून विश्वासदर्शक ठरावात सहभागी होऊ. त्यानंतर विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यानंतर पुढील कृती ठरवली जाईल -- एकनाथ शिंदे

17:36 June 29

गुरुवारी मुंबईत पोहोचून फ्लोअर टेस्टमध्ये सहभागी होणार - एकनाथ शिंदे

गुवाहाटी विमानतळावरुन एकनाथ शिंदे हे गोव्याकडे रवाना झाले आहेत. दरम्यान त्यांनी उद्या मुंबईत पोहोचून फ्लोअर टेस्टमध्ये सहभागी होऊ. त्यानंतर विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यानंतर पुढील कृती ठरवली जाईल असे त्यांनी सांगितली.

16:51 June 29

मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे रवाना

आज संध्याकाळी 5 वाजता मंत्रीमंडळाची बैठक आहे. या मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते मातोश्रीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यमंत्री आदित्य ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीसाठी त्यांच्या निवासस्थानातून निघाले आहेत.

16:40 June 29

महाविकास आघाडीच्या याचिकेवर 5 वाजता सुनावणी

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पुन्हा पोहोचला आहे. राज्यपाल यांनी 30 जून रोजी विशेष अधिवेशन बोलून महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. याविरोधात शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सायंकाळी 5 वाजता सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ( Supreme Court On Maha Vikas Aghadi Petition )

16:29 June 29

आसाम येथील कामाख्या मंदिराला महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांनी भेट दिली. तेथून ते गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये परतले.

16:07 June 29

मनसेने फ्लोअर टेस्टसाठी दिला भाजपाला पाठिंबा

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि उद्या होणाऱ्या फ्लोअर टेस्टसाठी मदत मागितली. ठाकरे यांनी मान्य करत पक्षाला मतदान करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र विधानसभेत मनसेचा एक आमदार आहे.

14:46 June 29

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार मंत्रीमंडळाची बैठक

आज संध्याकाळी 5 वाजता मंत्रीमंडळाची बैठक आहे. या मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.

14:17 June 29

संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत बंडखोर आमदार गोव्यात होणार दाखल

शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आज संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत एका विशेष विमानाने गोव्यात दाखल होणार आहेत. गोव्यात दाखल झाल्यानंतर पणजी येथील ताज रिसॉर्ट अँड कन्वेंशन सेंटर या हॉटेललात या सर्व बंडखोर आमदारांचे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यानिमित्ताने हॉटेल परिसरात खडक पर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस तसेच हॉटेल प्रशासन प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करत आहेत.

13:31 June 29

बहुमतात आमचाच विजय होणार - एकनाथ शिंदे

सर्व आमदारांनी आनंदाने दर्शन घेतले. कोणत्याही आमदाराला जबरदस्तीने आणललेले नाही. आमच्याकडे ५४ आमदार आहेत. छत्रपती शिवराय आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करणार आहे. बहुमत चाचणीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करणार आहोत. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर यांच्या विचारांना पुढे नेणारी शिवसेना आहे.

13:21 June 29

बहुमत चाचणीला उपस्थित राहण्याची परवानगी द्या- नवाब मलिक यांच्यासह अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. महाविकास आघाडीची उद्या बहुमत चाचणी आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील फ्लोर टेस्टला उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती दोन्ही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करणार आहे.

13:19 June 29

उद्या सकाळी सर्व आमदारांना विधानभवनात उपस्थित राहण्याची विधीमंडळ सचिवांची सूचना

राज्यपालांच्या निर्देशाप्रमाणे उद्या बहुमत चाचणी घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी सर्व आमदारांना विधानभवनात ११ वाजता उपस्थित राहण्याची सूचना विधीमंडळ सचिवांनी केली आहे.

13:13 June 29

सरकार वाचवण्यासाठी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर खलबतं, शिवसेनेचे नेते का राहिले अनुपस्थित?

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी आपल्या निवासस्थानी महाविकास आघाड च्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीला शिवसेनेकडून कोण उपस्थित नसल्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र राज्यपालांनी उद्या महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यासाठी शिवसेनेचे नेते कायदेशीर बाबींची पूर्तता करत असल्याने या बैठकीत उपस्थित राहू शकत नसल्याची माहिती खात्रीला सूत्रांकडून मिळाली आहे.

12:20 June 29

आसाममध्ये अतिवृष्टीचा इशारा, बंडखोर आमदार आज गोव्यात पोहोचणार

हवामान विभागाने आसाममध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बंडखोर आमदार आज गोव्यात पोहोचणार आहेत.

12:13 June 29

शिवसेनेच्या आमदारांना व्हिप लागू होईल - नाना पटोले

11 जुलैला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. गटनेत्यांचा पेच निर्माण झालेला आहे. शिवसेनेच्या आमदारांना व्हिप लागू होणार आहे. भाजपला किती घाई झाली हे पहा, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.

11:55 June 29

बहुमत चाचणीपूर्वी तयारी सुरू, विश्वास नांगरे पाटील विधान भवनात...

महाविकास आघाडीची उद्या बहुमताची चाचणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाची पाहणी करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील विधानभवनात दाखल झाले आहेत.

11:48 June 29

गुवाहाटीमधून बंडखोर आमदार गोव्याला रवाना होण्याची शक्यता

गुवाहाटीमधील हॉटेलमधील तळ ठोकून राहिलेले बंडखोर आमदार आज गोव्याला रवाना होण्याची शक्यता आहे.

11:44 June 29

रस्त्यावर आणून मारू... मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी

मुंबई - मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आले आहे. पत्रात अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच किशोरी पेडणेकर व आदित्य ठाकरे यांना रस्त्यावर आणून मारू अशी धमकी देण्यात आली आहे. विजेंद्र म्हात्रे असे पत्र पाठवणाऱ्याचे नाव असून जय महाराष्ट्र सायबर कॅफे, उरण रायगड येथून पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. याआधीही पेडणेकर यांना धमकी देण्यात आली होती.

11:33 June 29

बंडखोर शिंदे गटाची आसामला ५१ लाखांची मदत

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे की, "शिवसेनेच्या आमदारांनी आणि मित्रपक्षांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीमध्ये 51 लाख रुपयांचे योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या काही दिवसांपासून शिंदे इतर आमदारांसह गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत.

11:23 June 29

राज्यपालांची सध्याची भूमिका संशयास्पद- घटनातज्ज्ञ उल्हास बापट

राज्यपालांनी 30 जून रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे. यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपल मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की बंड आमदारांचा प्रश्न न्यायालयात असताना आणि न्यायालयाने आहे तीच परिस्थिती ठेवावी, असे सांगितले असताना राज्यपाल बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलवू शकत नाहीत.

11:18 June 29

देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपची बैठक सुरू

भाजप नेते गिरीश महाजन आणि श्रीकांत भारतीय यांच्यासह भाजप नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले.

11:16 June 29

सामान्य माणूसही समजतो की ही भाजपची खेळी आहे - बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात



राज्यातील सत्तांतर नाट्याचा अंतिम अंक सुरू झाला आहे. या संपूर्ण नाट्यमय घडामोडी मागे भाजपची खेळी असल्याचा आरोप काँग्रेस नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

11:14 June 29

मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेत्यांबरोबर बैठक सुरू

बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर शिवसेना नेते व आमदारांची बैठक घेत आहेत.

11:02 June 29

गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदारांची बैठक, गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला टोला

गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदारांची बैठक झाली आहे. पानटपरीवाला चुना कसे लावतात, हे संजय राऊत यांना माहित नाही, असा टोला शिवसेना नेता गुलाबराव पाटील यांनी बैठकीत लगावला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा, मातोश्री सोडली. आम्हालाही सोडले. मात्र, ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत, अशी टीकाही गुलाबराव पाटील यांनी केली.

10:57 June 29

शिवसेनेची याचिका सर्वोच्च न्यायालयात सायंकाळी ५ वाजता सुनावणीला येणार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशाला शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर संध्याकाळी 5 वाजता सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय सहमत आहे.

10:46 June 29

बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वी बैठकांचे सत्र, आमदारांना मुंबईत आणण्याच्या हालचाली

उद्या महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. अशा स्थितीत शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. राजकीय पक्षांनी आमदारांना मुंबईत आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

10:29 June 29

महाराष्ट्राचा सत्ता संघर्षाचा चेंडू पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

बहुमत चाचणीच्या आदेशा विरोधात शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे. शिवसेनेने तातडीची सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.

10:20 June 29

मंत्रिमंडळाच्या बैठकीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून प्रश्नचिन्ह

मुंबई- आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. कदाचित ही बैठक ठाकरे सरकारची शेवटची बैठक असू शकते. परंतु या बैठकीविषयी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्यपालांनी आता विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. या कारणाने याचा स्पष्ट उद्देश असा आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बहुमत नसल्याने हे सरकार अल्पमतात आहे, अशा परिस्थितीत आज होणारी मंत्रिमंडळाची बैठकही होऊ शकते की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहे.

10:08 June 29

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठकीत सिल्व्हर ओकवर चर्चा

मुंबई -गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. शरद पवार आणि गृहमंत्री यांच्यामध्ये राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठकीत चर्चा झाली आहे. एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

09:48 June 29

राज्यपाल व भाजप मिळून घटनेचे उल्लंघन, बहुमत चाचणी विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार- संजय राऊत

राज्यपाल व भाजप मिळून घटनेचे उल्लंघन करत आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊन, न्यायाची मागणी करणार आहोत. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. राफेलपेक्षा हा वेग कमी होईल, अशा वेगाने निर्णय घेतल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

09:39 June 29

भाजपचे आमदार मुंबईत येण्यास सुरुवात

एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईला येणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी बहुमताला सामोरे जावे लागणार आहे. अशातच भाजपचे आमदार मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे.

08:48 June 29

बहुमत चाचणी संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्याच सिद्ध करावे लागणार बहुमत

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यातील सत्ता स्थापनेला वेग आला असून घडामोडी फार वेगाने होताना दिसत आहेत. काल विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल आहे.

08:41 June 29

कामाख्या देवीकडे महाराष्ट्राच्या सुख-समाधानासाठी प्रार्थना, उद्या मुंबईत परतणार- एकनाथ शिंदे

कामाख्या देवीकडे महाराष्ट्राच्या सुख-समाधानासाठी प्रार्थना केल्याचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच उद्या मुंबईत परतणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सभागृहात बहुमत सिद्ध करणार असल्याचे सांगितले.

08:38 June 29

बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई- बहुमत सिद्ध करा, असे पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

07:59 June 29

एकनाथ शिंदे हॉटेलमधून पडले बाहेर

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हॉटेलमधून बाहेर पडले आहेत. ते मुंबईकडे रवाना होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

07:43 June 29

आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही बहुमत सिद्ध करू-नीलम गोऱ्हे

नीलम गोऱ्हे

पुणे- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही बहुमत सिद्ध करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

07:03 June 29

देवेंद्र फडणवीस-राज्यपालांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे गटाची आज होणार बैठक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. त्यानंतर बदलणारी राजकीय समीकरणे पाहता एकनाथ शिंदे गटाची आज गुवाहाटीत बैठक होणार असल्याचे सूत्राने सांगितले.

07:01 June 29

आमदार राजन साळवी यांच्या भूमिकेचे सेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी केले स्वागत

रत्नागिरी- शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केलेली आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना शिवसेनेसोबत काही आमदार निष्ठेने उभे राहिले आहेत. त्यापैकीच एक राजापूरचे आमदार राजन साळवी आहेत. आमदार राजन साळवी यांनी शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना संघटनेसोबत कायम राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचे लांजा आणि राजापूर तालुक्यातील सेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले आहे.

06:55 June 29

ठाण्यात शिवसेना दक्षिण भारतीय विभागाने उभारला शिंदे यांचा बाहुबली स्वरूपातील बॅनर

बॅनर

ठाणे - एकनाथ शिंदे यांना समर्थन करण्यासाठी ठाण्यात शिंदे समर्थकाकडून शक्तिप्रदर्शन होत असताना दुसरीकडे शिवसेना दक्षिण भारतीय विभागाने एकनाथ शिंदे यांना थेट बाहुबली अशी उपाधी देत बाहुबलीच्या स्वरूपात त्यांचे मोठे बॅनर उभारले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे बाहुबली असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.आता हे बॅनर आता सर्वांचे लक्षं वेधून घेत आहेत.

06:46 June 29

भाजपमध्ये सत्ता स्थापनेकरिता खलबतंं..

महाविकास आघाडीवर बहुमत करण्याची वेळ ठेपत असताना भाजपमध्ये खलबते सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आणि इतर पक्षाचे नेते यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झाली.

06:41 June 29

शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा यांनी का केली बंडखोरी, एकनाथ शिंदे यांनी ट्विट केला व्हिडिओ

विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा हे शिंदे गटात दाखल झाले आहेत. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ ट्विट केला आहे. हे ट्विट शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी रिट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की महाविकास आघाडी नको म्हणून आमचा हा निर्णय आहे. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही, नैसर्गिक युतीसाठी आमचा आग्रह आहे.

06:04 June 29

Maharashtra Political Crisis : पुणे शहराचे नाव जिजाऊनगर करावे; काँग्रेस मंत्र्यांची कॅबिनेटमध्ये मागणी

मुंबई-महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांच्या मागणीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण लक्ष लागलेले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे बंड शमलेले नाही. प्रत्यक्षात महाविकास आघाडीकडून बहुमत असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ येऊन ठेपल्याचे दिसत आहे. पाहू, राजकीय पटलावर काय घडत आहे...

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची घेतली भेट-महाविकास आघाडीला लवकरात लवकर बहुमत सिद्ध करायला सांगावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांनी राज्यपालांची मंगळवारी राजभवनावर भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी ही मागणी केली आहे.

हेही वाचा-Fadnavis Meet Governor : देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट, तातडीने फ्लोअर टेस्ट घेण्याची मागणी

सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला अभिमान आहे. आज बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांनी (उद्धव) आपल्या आमदारांना एक संवेदनशील आवाहन केले आहे. मी काही ज्योतिषी नाही, पण मला वाटतं की, कुटुंबातील कोणी निघून गेले असेल तर त्यांना परत आणण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने प्रयत्न करावेत, असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होते. ( Supriya Sule On Maharashtra Political Crisis )

हेही वाचा-Supriya Sule On Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे यांचा मला अभिमान, शिंदे यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही - सुप्रिया सुळे

महाविकासआघाडी जवळ अद्यापही बहुमत -महाविकास आघाडीमध्ये प्रमुख पक्ष असलेला शिवसेनेमध्ये पडलेले खिंडार ( Rebellion In Shivsena ) हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मात्र, महाविकास आघाडी म्हणून आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ गटनेते तथा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील वारंवार म्हटले आहे. मात्र, महाविकासआघाडी जवळ अद्यापही बहुमत आहे. जर बहुमत सादर करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिलेस तर आम्ही बहुमत चाचणी सुद्धा जिंकू, असा विश्वास राज्याचे राज्यमंत्री विश्वजीत कदम ( Viswajit Kadam) यांनी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधीने त्यांच्याशी साधलेल्या खास संवादात राज्यातील राजकारणावर देखील अनेक भाष्य केले आहे.

हेही वाचा-Kadam On Politics : महाविकास आघाडीजवळ बहुमत असल्याचा कदम यांचा दावा

आमदार स्वच्छेने गुवाहाटीला गेले-एकनाथ शिंदे-गुवाहाटी (आसाम) - "महाराष्ट्रातील बंडखोर आमदार स्वेच्छेने गुवाहाटीला आले होते. आम्ही लवकरच मुंबईत परतणार आहोत. आम्ही नेहमीच बाळसाहेब ठाकरे यांच्या हिंदू धर्माच्या विचारधारेसोबत आहोत आणि ती पुढे नेऊ." असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. गुवाहाटीत एकही आमदार दडपला जात नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा-Rebel MLA Eknath Shinde : आम्ही लवकरच मुंबईत परतणार - एकनाथ शिंदे

आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही-शिवसेनेचे बंडखोर आमदार ( ShivSena Rebel MLA ) आज जरी गुवाहटीमध्ये असले तरी 11 तारखेपर्यंत परत येतील आणि पुन्हा एकदा सर्व काही सुरळीत होईल असा विश्वास खासदार धैर्यशील माने ( MP Dhairyashil Mane ) यांनी व्यक्त केला आहे. आमदारांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा-Dhairyasheel Mane Reaction : अकरा तारखेपर्यंत आमदार परत येतील; खासदार मानेंना विश्वास

Last Updated : Jun 29, 2022, 11:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details