- काही (बंडखोर आमदार) दबाव आणि भीतीपोटी गेलेत. अनेक आमदारांना परत यायचे आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.
Maharashtra Political Crisis : प्रिय शिवसैनिकांनो, मविआचा खेळ ओळखा, एकनाथ शिंदेंची शिवसैनिकांना साद
22:47 June 25
21:39 June 25
- महाविकास आघाडी सरकारच्या खेळ ओळखा, या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
21:25 June 25
- एकनाथ शिंदे गटाने गुवाहाटीमधील हॉटेल बुकिंग आणखी दोन दिवस वाढवले आहे. यापूर्वी ही बुकिंग 28 जूनपर्यंत होती, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
20:51 June 25
आदित्य ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- मुंबई महापालिकेवर भाजपाचा डोळा, आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका
- उद्धव ठाकरे हे शब्दाला जागणारे
20:16 June 25
- मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही, असे ट्वीट रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी केले आहे.
19:53 June 25
एकनाथ शिंदे गटाचे परंडा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट इशारा दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणारा काळात जशास तसे उत्तर दिले जाईल, माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत रहावं, असा इशारा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिला आहे.
17:43 June 25
- बैठकीत काय चर्चा झाली हे तुम्हाला आधीच माहीत आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केलेला विश्वासघात आम्ही विसरणार नाही. आम्ही (शिवसेना) नक्की जिंकू, राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
17:07 June 25
ठाण्यात एकनाथ शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
ठाण्यात एकनाथ शिंदेंचे शक्तिप्रदर्शन.
17:02 June 25
बंडखोर आमदारांनी केलेला विश्वासघात आम्ही विसरणार नाही, आम्ही नक्कीच जिंकू - आदित्य ठाकरे
बैठकीत काय चर्चा झाली हे तुम्हाला आधीच माहीत आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केलेला विश्वासघात आम्ही विसरणार नाही. आम्ही (शिवसेना) नक्की जिंकू, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
16:59 June 25
आमचा खर्च कोणताही पक्ष उचलत नाहीये, या सर्वांच्या मागे भाजप नाही - दीपक केसरकर
आमचा खर्च (हॉटेल निवासाचा) कोणताही पक्ष उचलत नाहीये, आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी आम्हाला बोलावले आणि आम्ही येथे (गुवाहाटी हॉटेल) येऊन राहिलो, खर्च देऊ. या सर्वांच्या मागे भाजप नाही, असे दीपक केसरकर म्हणाले.
16:49 June 25
आमच्या गटाला मान्यता न दिल्यास न्यायालयात जाऊ, संख्या सिंद्ध करू - दीपक केसरकर
आमच्या गटाला मान्यता द्यावी, ती दिली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊन आमचे अस्तित्व आणि संख्या सिद्ध करू. आमच्याकडे संख्या आहे, पण आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदर करतो, आम्ही त्यांच्याविरोधात बोलणार नाही. ज्या मार्गावर आम्ही विधानसभा निवडणूक लढवली त्या मार्गावर चालले पाहिजे, असे बंडखोर आमदार दीपक केसरकर म्हणाले.
16:48 June 25
विलीनीकरणाची गरज नाही - दीपक केसरकर
विलीनीकरणाची गरज नाही, आमच्या गटाला वेगळी ओळख दिली जाईल आणि आम्ही इतर कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही, असे दीपक केसरकर म्हणाले.
16:46 June 25
आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत, आम्ही पक्ष सोडला असा गैरसमज आहे - दीपक केसरकर
आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत, आम्ही पक्ष सोडला असा गैरसमज आहे. आम्ही नुकतेच आमचा गट वेगळा केला. आम्हाला पाहिजे असलेल्या मार्गावर जाण्यासाठी आमच्याकडे दोन तृतियांश बहुमत आहे. आमचा नवा नेता बहुमताने निवडला. त्यांच्याकडे 16-17 पेक्षा जास्त आमदार नव्हते, अशी माहिती शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
16:23 June 25
शिंदे गट कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही, राजकीय परिस्थिती ठीक झाल्यावर येऊ - दीपक केसरकर
काँग्रेस, राष्ट्रवादीला आमचा पाठिंबा नाही. शिवसेनेला आम्ही हायजॅक केलेले नाही. शिवसैनिकांनी मोडतोड बंद करावी, कायद्याचे पालन करावे. राज्यातील परिस्थिती बदलल्यावर मुंबईत येऊ. नोटिसा म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, नोटीसला रितसर उत्तर देऊ. विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार, शिंदे गट कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही, अशी माहिती शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी दिली.
16:17 June 25
गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बंडखोर आमदारांची बैठक सुरू
गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बंडखोर आमदारांची बैठक सुरू.
16:12 June 25
पक्ष सोडून गेलेल्यांवर काय कारवाई होणार, हे सायंकाळपर्यंत कळेल - संजय राऊत
पक्ष सोडून गेलेल्यांवर काय कारवाई होणार, हे सायंकाळपर्यंत जनतेला कळेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व निवडणुका लढवू, शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया.
16:10 June 25
शिवसेना सोडून गेलेल्यांनी आपल्या बापाच्या नावाने मते मागावीत - संजय राऊत
शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागू नयेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तुमच्या वडिलांच्या नावाने मते मागा. महाविकास आघाडी एकत्र आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
16:02 June 25
शिवसेनेच्या कार्यकारिणीत 6 ठराव मंजूर, बंडखोरांवर कठोर कारवाई करणार - संजय राऊत
आम्ही 6 ठराव मंजूर केले आहेत आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्व विचारसरणीचे पालन करेल. अखंड महाराष्ट्राच्या विचारधारेशी तडजोड करणार नाही. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार. जे सोडून गेले त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार मुख्यमंत्री ठाकरे यांना आहे. ज्यांनी स्वकेंद्रित राजकारणासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर केला त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू. जे सोडून गेले आहेत ते आमच्या गुरूंचे नाव वापरू शकत नाहीत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
15:55 June 25
16 आमदारांना 27 जूनपर्यंत त्यांचे लेखी उत्तर दाखल करायचे आहे
याशिवाय, ज्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांनी सोमवार, 27 जूनपर्यंत त्यांचे लेखी उत्तर दाखल करायचे आहे.
15:50 June 25
बंडखोरांवर कारवाई.. विधानसभा उपाध्यक्षांनी 16 शिवसेना आमदारांना बजावली अपात्रतेची नोटीस
आसाममधील गुवाहाटी येथे राहणाऱ्या एकनाथ शिंदे गटातील 16 बंडखोर शिवसेना आमदारांना महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस बजावली आहे.
15:17 June 25
बाळासाहेबांचे नाव कोणीही वापरू नये, उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांना इशारा
काही लोक मला काहीतरी बोलायला सांगत आहेत. पण मी आधीच सांगितले आहे की त्यांना (बंडखोर आमदार) जे करायचे ते करू शकतात, मी त्यांच्या बाबतीत हस्तक्षेप करणार नाही. ते स्वत: निर्णय घेऊ शकतात, परंतु बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कोणीही वापरू नये: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
15:05 June 25
दुपारी 4 वाजता एकनाथ शिंदे गटाची पत्रकार परिषद
दुपारी 4 वाजता एकनाथ शिंदे गटाची पत्रकार परिषद.
14:54 June 25
आता बंड केल्यास कारवाईचे पूर्ण अधिकार शिवसेना पक्ष प्रमुखांकडे, कार्यकारिणीत ठराव
शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून मान्यता. एकूण पाच ठराव मंजूर. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरता येणार नाही, याबाबतही चर्चा झाली. भविष्यात कुणी बंड केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार पक्ष प्रमुखांकडे राहील. शिवसेनेच्या बैठकीत पहिला ठराव मंजूर. खासदार संजय राऊत यांनी मांडला प्रस्ताव. आणखी प्रस्तावांवर होणार चर्चा. आता पक्ष श्रेष्ठी म्हणून उद्धव ठाकरे कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष.
14:51 June 25
गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे गटाची बैठक, पुढील कार्यवाहीबाबत झाली चर्चा
आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे गटाची बैठक सुरू आहे. या बैठकीत पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली.
14:42 June 25
एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक
उल्हासनगरमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक झाल्याची सुत्रांची माहिती.
14:36 June 25
16 बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई, सूत्रांची माहिती
16 बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई, सूत्रांची माहिती.
14:31 June 25
नवी मुंबईत बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना कार्यकर्त्यांचे निदर्शन, पक्ष कार्यालयाबाहेर पुतळे जाळले
शिवसेना कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात निदर्शने करत खारघरमधील पक्ष कार्यालयाबाहेर पुतळे जाळले.
14:28 June 25
शिवसेना आली त्यामुळेच आसामचा पूर अधोरेखित झाला - मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा
बाहेरून आलेल्या प्रत्येकाला सुरक्षितता, आरामदायी मुक्काम देणे हे आमचे काम आहे. उद्या काँग्रेस आली तर त्यांचेही स्वागत करेन. मी आभारी आहे की शिवसेना आली, त्यामुळेच आसामचा पूर अधोरेखित झाला, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले.
14:22 June 25
आसामधील पूरस्थिती सांगून पाहुण्यांना आम्ही काढून टाकायचे का? - मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा
गुवाहाटीमध्ये आमच्याकडे 200 हॉटेल्स आहेत आणि तिथे सर्व पाहुणे आहेत. पूरस्थिती सांगून पाहुण्यांना आम्ही काढून टाकायचे का? महाराष्ट्रात भाजप (बंडखोर शिवसेना आमदारांना) पाठिंबा देत आहे, मी यात सहभागी होणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली.
14:20 June 25
मुंबई पोलिसांनी शहरात कलम 144 लागू केले
मुंबई पोलिसांनी मुंबई शहरात कलम 144 लागू केले आहे.
14:18 June 25
एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ
ठाण्यातील बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ते सध्या राज्यातील इतर बंडखोर आमदारांसह आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.
14:08 June 25
10 जुलै पर्यंत मुंबईत जमावबंदी
10 जुलै पर्यंत मुंबईत जमावबंदी.
14:05 June 25
महाविकास आघाडी हिंसाचाराचे समर्थन करत नाही - अशोक चव्हाण
महाविकास आघाडी हिंसाचाराचे समर्थन करत नाही. निष्ठा बदललेल्या आमदारांवर संताप व्यक्त केलेल्या स्थानिक निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. ही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नाही. हे अगदी सामान्य आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली.
14:03 June 25
आघाडी सरकार अल्पमतात नाही, ती काम करत राहील - काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
आजच्या बैठकीत सद्यस्थितीवर चर्चा झाली. आमचे लोक परिस्थितीवर काम करत आहेत. आघाडी सरकार कार्यरत आहे आणि काम करत राहील. आमचे सरकार अल्पमतात नाही. आमच्या पक्षाची दिल्लीतील कायदेशीर टीमही आम्हाला मदत करत आहे: महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात
14:00 June 25
आघाडी सरकार अल्पमतात नाही, ती काम करत राही - काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
आजच्या बैठकीत सद्यस्थितीवर चर्चा झाली. आमचे लोक परिस्थितीवर काम करत आहेत. महाविकास आघाडी सरकार कार्यरत आहे आणि काम करत राहील. आमचे सरकार अल्पमतात नाही. आमच्या पक्षाची दिल्लीतील कायदेशीर टीमही आम्हाला मदत करत आहे, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.
13:54 June 25
मोठा निर्णय होणार? उद्धव ठाकरे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला हजर
उद्धव ठाकरे कार्यकारिणीच्या बैठकीला हजर.
13:53 June 25
आमदार यामिनी जाधव व शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांचे बॅनर काढले
मुंबई -भायखळा मतदारसंघाच्या आमदार यामिनी जाधव व शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांचे बॅनर काढले. काही बॅनरवरील दोघांचे फोटो फाडण्यात आले.
13:49 June 25
शिवसेनेचे आसाम राज्य प्रमुख राम नारायण सिंह यांनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेते परत येण्यासाठी लिहिले पत्र
शिवसेनेचे आसाम राज्य प्रमुख राम नारायण सिंह यांनी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत परत येण्यासाठी पत्र लिहिले आहे.
13:45 June 25
बंडखोर आमदार मुक्कामी असलेल्या गुवाहाटीतील हॉटेल बाहेर राष्ट्रवादी, शिवसेनेची निदर्शने
आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आसाम युनिटने निदर्शने केली. नंतर त्यांना घटनास्थळावरून हटवण्यात आले. महाराष्ट्राचे बंडखोर आमदार सध्या या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.
13:43 June 25
शिवसेना भवनात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, उद्धव ठाकरे बैठकीसाठी रवाना
शिवसेना भवनात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, उद्धव ठाकरे बैठकीसाठी रवाना.
13:40 June 25
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आदित्य ठाकरे शिवसेना भवनात
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे शिवसेना भवनात आगमन.
13:27 June 25
मुंबई भाजपची बैठक संपन्न, हा घेतला निर्णय
मुंबई- मुंबईकर जनतेने ११८ पेक्षा जास्त जागा जिंकून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महापालिकेत मुंबईकरांचा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल असा विश्वास भाजपा आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीशी भाजपाचा संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.
13:23 June 25
आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा पुरवण्याचा निर्णय - गृहमंत्री
एकाही आमदाराची सुरक्षा काढून घेण्यात आलेली नाही. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन गृह विभागाने आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
13:19 June 25
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे स्वतः आपापसातील वाद मिटवतील - रामदास आठवले
देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. शिवसेनेतील अंतर्गत वादाशी आमचा काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे स्वतः आपापसातील वाद मिटवतील, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही वाट पाहत आहोत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.
13:16 June 25
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे स्वतः आपापसातील वाद मिटवतील, भाजपच्या बैठकीनंतर आठवलेंची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. शिवसेनेतील अंतर्गत वादाशी आमचा काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे स्वतः आपापसातील वाद मिटवतील, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही वाट पाहत आहोत, असे रामदास आठवले म्हणाले.
12:57 June 25
बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ला होणार, कुणालाही सोडणार नाही - पुणे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे
आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याने तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणणाऱ्या सर्व बंडखोर आमदारांवर कारवाई होईल. त्यांच्या कार्यालयावरही हल्ला होणार, कुणालाही सोडणार नाही, अशी धमकी पुणे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे दिली.
12:55 June 25
पुण्यातील शिवसेना नेत्यांशी संबंधित कार्यालयांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या सूचना
राजकीय संकट आणि तानाजी सावंत यांच्या कार्यालयातील तोडफोड नंतर पुणे पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. शहरातील शिवसेना नेत्यांशी संबंधित कार्यालयांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना सांगितले.
12:51 June 25
मुंबई पोलिसांचा हाय अलर्ट, शहरातील सर्व राजकीय कार्यालयांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले
मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे आणि सर्व पोलीस ठाण्यांना शहरातील सर्व राजकीय कार्यालयांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. अधिकारी स्तरावरील पोलिसांना प्रत्येक राजकीय कार्यालयाला भेट देऊन त्यांच्या सुरक्षेची खात्री करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
12:45 June 25
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा - नवनीत राणा
मी अमित शहा यांना विनंती करते की, उद्धव ठाकरेंना सोडून जाणाऱ्या आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा द्यावी. उद्धव ठाकरेंची गुंडगिरी संपवली पाहिजे. मी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करते, अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली.
12:40 June 25
एकनाथ शिंदे यांनी आमदार महेश शिंदेंचा व्हिडिओ शेअर केला
शिवसेनेशी बंडखोरी करून आमदारांचा वेगळा गट निर्माण करणारे एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केला आहे. यात त्यांनी कोरेगाव, जिल्हा सातारा येथील शिवसेना आमदार महेश शिंदे यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. महेश शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेण्याचे कारण, असे लिहित त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.
12:38 June 25
बंडखोरांच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवली - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
बंडखोरांच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवली. आमदारांची सुरक्षा राज्यापुरती मर्यादित असते. पोलीस दल अलर्ट आहेत. बंडखोर आमदारांच्या संदर्भात विधानसभा उपाध्यक्ष यांना अधिकार आहेत. ते निर्णय घेतील, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
12:33 June 25
एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं! दिले 'हे' नाव
एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं! 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट' असे नाव दिल्याची सुत्रांची माहिती.
12:25 June 25
सत्ता स्थापनेसाठी खलबत? आठवले आणि इतर भाजप नेते फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि इतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले.
12:21 June 25
राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसची थोरात यांच्या निवासस्थानी होणार बैठक
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने आज दुपारी पक्षाचे नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॉयल स्टोन या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.
12:12 June 25
तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडल्यावर शिवसेनेने दिली प्रतिक्रिया
मुंबई- आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याने तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणणाऱ्या सर्व देशद्रोही आणि बंडखोर आमदारांवर कारवाई होईल. त्यांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही, असा इशारा पुणे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे दिला आहे.
12:07 June 25
संजय राऊत-शरद पवारांची भेट होण्याची शक्यता
मुंबई - शरद पवार सिल्वर ओक निवास्थानी गेले. तिथे संजय राऊत तिथे पोहचण्याची शक्यता आहे
11:56 June 25
पुण्यात शिवसैनिक आक्रमक, तानाजी सावंत यांचे फोडले कार्यालय
मुंबई- पुण्यातील कात्रज येथील बालाजी परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. सावंत हे राज्यातील बंडखोर आमदारांपैकी एक असून ते सध्या आसाममधील गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत.
11:18 June 25
बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले
मुंबई - गुवाहाटीला जाऊन बंडखोरी करणाऱ्या शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्याविरोधात शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसैनिकांनी त्यांचे कार्यालय फोडले आहे.
11:01 June 25
ठाणे जिल्हा प्रशासनाकडून राजकीय मिरवणुका आणि घोषणाबाजी करण्यास बंदी, जमावबंदी लागू
मुंबई- राज्यात सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने ३० जूनपर्यंत जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या राजकीय मिरवणुका, मेळावे किंवा घोषणाबाजी करण्यास बंदी घातली आहे. ठाणे पोलिसांनी सध्या ठाणे शहरात कलम 144 सीआरपीसी लागू केले आहे.
10:33 June 25
बंडखोर आमदारांचे काढण्यात आले संरक्षण, एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली टीका
मुंबई- राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.
10:25 June 25
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे सूचक ट्विट, म्हटले...
मुंबई-शिवसेनेत उभी फूट पडली असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले आहे. पैशाची, पदाची किंवा वैभवाची चिंता करण्यापासून सावध रहा. यापैकी कशाचीही पर्वा न करणारा माणूस तुम्हाला कधीतरी भेटेल. मग कळेल तुम्ही किती गरीब आहात
10:14 June 25
राजकीय उलथापालथ होत असताना देवेंद्र फडवणीसांनी केले हे ट्विट
मुंबई-राज्यात राजकीय उलथापालथ होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांनी आणीबाणी स्मरण करणारे ट्विट केले आहे. आपल्या राज्यघटनेच्या तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सर्व सेनेनींना शत शत नमन असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
09:56 June 25
नागपुरात एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ लागले बॅनर
नागपूर- शिवसेनेतील बंडाळीनंतर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष टोकाला असल्याचे चित्र असताना नागपुरातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले होते. मात्र, शुक्रवारी महालातील चितारोळ परिसरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ होर्डिंग लावण्यात आला. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून 400 मीटरच्या आत हा परिसर येतो. खरंतर नागपूर मध्ये शिवसेनेची ताकद नाही. अशातही एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनर लागल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत .
09:53 June 25
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज बोलाविली बैठक
मुंबई- शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे.
09:31 June 25
शिंदे गट महाविकास आघाडीचा काढणार पाठिंबा, राज्यपालांना पत्र देण्याची शक्यता
मुंबई - शिंदे गट महाविकास आघाडीचा काढणार पाठिंबा काढणार असल्याचे सूत्राने सांगितले. राज्यपालांना हा गट पत्र देण्याची शक्यता आहे.
09:20 June 25
शिंदे गट आज दुपारी घेणार पत्रकार परिषद, काय मांडणार भूमिका?
मुंबई- शिंदे गट आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. बंडखोर आमदारांवर कारवाई होणार असताना शिंदे गट काय मांडणार भूमिका, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
09:06 June 25
सत्तास्थापनेसाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू
मुंबई-सत्तास्थापनेसाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू आहेत. दादा भुसे, शंभूराज देसाई व भरत गोगावले यांची प्रवक्तेपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
08:30 June 25
शिवसेनेच्या कार्यकारिणीची आज होणार बैठक, पक्षाचे अस्तित्व आणि सत्ता टिकविण्याचे आव्हान
मुंबई- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार टिकविण्याकरिता शिवसेनेची धडपड सुरू आहे. अशा स्थितीत शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक ही शिवसेना भवनमध्ये आज दुपारी एक वाजता होणार आहे.
08:29 June 25
शिंदे गटाची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक - सूत्र
मुंबई- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक घेणार असल्याचे सूत्राने सांगितले.
08:21 June 25
ठाकरे सरकार घालविण्यासाठी गुवाहाटीतून योगराज, सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदेंसह भाजपवर जोरदार टीका
मुंबई- गुवाहाटीच्या योग शिबिरामुळे देशातला संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला आहे. गुवाहाटीमधील बाबा 'योगराज' हे ठाकरे सरकार घालविण्यासाठी ध्यानसाधना करीत आहेत. एनकेनप्रकारे सत्ता स्थापन करायचीच, माणसे फोडायची, विकत घ्यायची, आमदारांचा बाजार भरवायचा या प्रवृत्तीविरोधात देश एकवटत आहे. त्यातूनच नव्या लढ्याची तेजस्वी किरणे बाहेर पडतील. जग उगवत्या सूर्याला नमस्कार करते, पण गुवाहाटीच्या योग शिबिरात सर्वच बाबतीत अंधकार आहे, अशी टीका शिवसेनेने सामानातून केली आहे.
07:59 June 25
दहा तासानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल, भाजपने बोलाविली कोअर कमिटीची बैठक
मुंबई- राजकीय उलथापालथ होत असताना दहा तासानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल झाले आहेत. भाजपने कोअर कमिटीची बैठक सकाळी ११ वाजता बोलाविली आहे. या बैठकीत भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत.
07:32 June 25
ईडी, सीबीआय इन्कमटॅक्स या सहकाऱ्यांच्या मदतीने महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव- नाना पटोले
मुंबई - ज्या शिवसेनेचे बोट धरून महाराष्ट्रात भाजपा वाढली त्याच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. संविधान आणि लोकशाही पायदळी तुडवून केंद्रातील मोदी सरकार कारभार करत असून ED, CBI, इन्कम टॅक्स या सहकाऱ्यांच्या मदतीने महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
06:51 June 25
शिवसेनेच्या आणखी ४ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याची उपसभापतींना विनंती- अरविंद सावंत
मुंबई-12 आमदारांना आणि आता आणखी 4 आमदारांना अपात्र ठरवण्याची विनंती आम्ही उपसभापतींना केली होती. आम्ही उपसभापतींशी पुन्हा बोलून कार्यवाही सुरू करण्याची विनंती केली आहे. उद्या किंवा परवा त्यांना अपात्रतेची नोटीस बजावली जाईल, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मुंब्यात ही माहिती दिली आहे.
06:24 June 25
Maharashtra political crisis : मुंबई भाजपची बैठक संपन्न, हा घेतला निर्णय
मुंबई-शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वर्चस्वासाठी चाललेली चुरस आता एका निर्णायक वळणावर येत असल्याचे दिसते. जर आकड्यांचा विचार केला तर सध्या शिवसेनेच्या गटाकडे एकूण 125 आमदार असल्याचे म्हणता येईल. शिवसेनेने दावा केल्यानुसार त्यांच्याकडे शिवसेनेचे 18 आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदार आहेत तसेच 10 अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. हा एकूण आकडा 125 वर जातो. दुसरीकडे शिंदे गटाचा विचार केला तर त्यांच्याकडे मॅजिक फिगर 37 आमदार असल्याचे मानले जाते. त्याचबरोबर त्यांना 9 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये भाजपचे 106 आमदार मिळवले तर त्यांची एकूण संख्या 142 होते.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी घेतलेल्या भमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. मात्र आता यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान मातोश्री येथे त्यांची भेट घेतली. सायंकाळी साडेसहा वाजता ही भेट झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंड कसे क्षमवता येईल यावर चर्चा झाली. तसेच एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठीची रणनीती यावेळी आखण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. ( Sharad Pawar and Uddhav Thackeray Meeting )
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या बैठकीत उपसभापती नरहरी झिरवाळ यांची हकालपट्टी करण्याचा ठराव घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बंडखोर गटाच्या ४६ आमदारांच्या सह्या घेऊन प्रस्तावाच्या तयारीसाठी कार्यवाही सुरू असल्याचीही माहिती आहे.
बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel MLA Eknath Shinde ) यांनी शिवसेनेच्या चिन्ह आणि पक्षावर दावा ठोकल्यानंतर शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे यांनी त्यांचा गट प्रहार किंवा भाजपमध्ये विलिन करावा, असे खडे बोल सुनावले. त्यांनी केलेल्या दाव्याची हवा काढून टाकली. शिवसेनेची एक राज्यघटना आहे, ती अशी बदलता येत नाही, असेही गोऱ्हे यावेळी म्हणाल्या. ( Nilam Gorhe On Eknath Shinde )
राज्यामध्ये एकीकडे राजकीय भूकंप मुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या परिस्थिती असतानाच ईडीकडून शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जून खोतकर यांचा साखर कारखान्याची जमीन कारखान्याची उभारणी आणि कारखान्याची यंत्रसामग्री जप्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेने विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांचा संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळाल्या आहेत.