महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : 'आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना आणि शिवसैनिक', एकनाथ शिंदेंचे ट्विट - महाराष्ट्र लाईव्ह अपडेट

एकनाथ शिंदे लाईव्ह अपडेट
Maharashtra political crisis

By

Published : Jun 23, 2022, 6:28 AM IST

Updated : Jun 23, 2022, 10:47 PM IST

22:43 June 23

12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

21:56 June 23

संजय राठोड, दादाजी भुसे यांच्यासह शिवसेनेचे ३७ हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत

संजय राठोड, दादाजी भुसे यांच्यासह शिवसेनेचे ३७ हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये उपस्थित आहेत.

21:55 June 23

विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी

शिवसेनेचे नवनियुक्त विधिमंडळ पक्षनेते अजय चौधरी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींना पत्र लिहून विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

21:35 June 23

शिवसेनेचे दादा भुसे, संजय राठोड गुवाहाटीत दाखल

19:54 June 23

  • आमदार परत येतील याची आम्हाला खात्री - शरद पवार
  • आमदरांना महाराष्ट्रात यावं लागले

19:20 June 23

  • आपल्या निर्णयाला भाजपाचा पाठिंबा, एकनाथ शिंदेचा व्हिडिओ व्हायरल

18:50 June 23

अजित पवार यांची पत्रकार परिषद

  • सर्व पक्षाला समान निधी दिला
  • राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा
  • सर्वांनी मिळून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं
  • संजय राऊतांच्या वक्तव्याबाबत त्यांच्याशी चर्चा करू

18:45 June 23

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत शिवसेनेला साथ देईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

18:38 June 23

  • राज्यातील राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपली

18:28 June 23

सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजप शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. या संकटातून कसा मार्ग काढायचा याचा विचार आम्ही करत आहोत. महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे पूर्ण करेल. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. काँग्रेस एमव्हीएच्या पाठीशी आहे, अशी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

18:18 June 23

संजय राठो़ड आणि रविंद्र फाठक गुवाहाटीला; शिंदेंची करणार मनधरणी

संजय राठो़ड आणि रविंद्र फाठक गुवाहाटीला दाखल झाले आहेत. ते दोघेही शिंदेंची मनधरणी करणार आहे.

17:40 June 23

राज्यातील राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक

  • शरद पवार बैठकीला उपस्थित
  • हसन मुश्रीफ, राजेश टोपे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पोहचले आहेत
  • मंत्री दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, आदिती तटकरे, प्रफुल्ल पटेल, रोहित पवार ही महत्त्वाचे नेते मंडळी बैठकीसाठी पोहचली आहेत.

17:25 June 23

  • जर शिवसेनेला एमव्हीएमधून बाहेर पडायचे असेल तर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलले पाहिजे. त्यांना कोणीही रोखू शकत नाही, प्रत्येक पक्ष त्यांच्या मार्गावर जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

17:03 June 23

माझा पक्ष महाविकास आघाडीसोबत उभा राहणार असून आम्हाला एकत्र काम करायचे आहे. सध्याचे महाराष्ट्र सरकार राज्यात विकासाची कामे करत आहे. भाजप महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी यापूर्वीही कर्नाटक, खासदार, गोवा येथे असेच केले होते, असा आरोपा मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

16:46 June 23

चंद्रभागा आजींनी दिला उद्धव ठाकरे यांना पाठिंबा

  • व्हायरल 'झुकेगा नाही' चंद्रभागा आजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर
  • मी मुख्यमंत्र्यांना भेटले त्यांना सांगितलं साहेब तुम्ही काळजी करू नका आम्ही शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहोत आणि नेहमी तुमच्यासोबत राहू
  • जो पळाला तो एक रिक्षावाला होता त्याला शिवसेनेने मोठं केलं
  • आम्ही शिवसैनिक नेहमीच तुमच्या सोबत आहोत आणि राहू हेच सांगायला मी मातोश्रीवर आले
  • काल उद्धव ठाकरे जेव्हा वर्षा वरून मातोश्रीवर आले तेव्हा ते सर्व टीव्हीवर बघून मी रडले
  • जे पाळलेत ते जर खरच शिवसैनिक असतील तर माफी मागायला उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर येतील
  • ते जर खरंच कट्टर शिवसैनिक असतील तर परत येतील आणि जर नाही आले तर त्यांना थारा नाही
  • चंद्रभागा आजिंनी दिला उद्धव ठाकरे यांना पाठिंबा

16:42 June 23

महाराष्ट्रात स्थिर सरकार अस्थिर करून राज्यात स्वतःचे सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आणि केंद्र पूर्णपणे जबाबदार आहेत. राष्ट्रपती निवडणुकीसाठीही ते हे करत आहेत, असा आरोपमल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

16:00 June 23

महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी स्थापन केलेले सरकार आहे. आम्ही शेवटपर्यंत उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू," असे ट्विट राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केले.

15:42 June 23

  • शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना बळजबरीने सुरतला नेण्यात आल्याच्या आरोपानंतर एकनाथ शिंदे गटाने नितीन देशमुखांचे इतर आमदारांसोबतचे फोटो जारी केले आहे.

14:51 June 23

  • शिवसेना महाविकास आघाडीबाहेर पडण्यास तयार
  • 24 तासात मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंसोबत बोलण्याची विनंती

14:00 June 23

बंडखोर आमदारांचा व्हिडिओ आला.. हॉटेलमध्ये 42 आमदार, 35 शिवसेना आणि 7 अपक्षांचा समावेश

महाराष्ट्रातील 42 बंडखोर आमदार - 35 शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आमदार - गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकत्र दिसले.

13:35 June 23

वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक, चंद्रकांत खैरे यांची माहिती

वर्षा बंगल्यावर आमची बैठक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाण्यास सांगितले, अशी माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.

13:21 June 23

विरोधकांना मुख्यमंत्र्यांशी भेटण्याची संधी मिळत असे, आम्हाला नाही, शिवसेना आमदाराने पत्रात सांगितले

आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू शकलो नसताना, आमचे 'खरे विरोधी' काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना त्यांना भेटण्याची संधी मिळत असे आणि त्यांना त्यांच्या मतदारसंघातील कामासाठी निधीही दिला जात असे, शिवसेना आमदाराने पत्रात सांगितले.

13:18 June 23

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यास संघर्षाची तयारी ठेवा - शरद पवार

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यास संघर्षाची तयारी ठेवा. आणि मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घ्यायला हवी, शरद पवार यांची प्रतिक्रिया.

13:11 June 23

या सर्व गोष्टींना कंटाळून एकनाथ शिंदेंना हे पाऊल उचलण्यासाठी राजी केले, आमदाराने पत्रातून व्यक्त केली खदखद

मुख्यमंत्री कधीच सचिवालयात नसत, तर ते मातोश्रीवर असायचे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूच्या लोकांना फोन करायचो, पण ते कधीही आमचे कॉल अटेंड करत नसत. या सर्व गोष्टींना कंटाळून एकनाथ शिंदे यांना हे पाऊल उचलण्यासाठी राजी केले, असे शिवसेना आमदाराच्या पत्रात लिहिले आहे.

13:06 June 23

शिवसेनेचा मुख्यमंत्री तरी भेट देण्याची संधी मिळाली नाही.. आमदाराने पत्रातून व्यक्त केली खदखद

राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असूनही पक्षाच्या आमदारांना वर्षा बंगल्यावर (मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान) भेट देण्याची संधी मिळाली नाही. मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूचे लोक भेटू द्यायचे की नाही हे ठरवायचे. आम्हाला आमचा अपमान झाल्यासारखे वाटले असे एकनाथ शिंदे यांनी शेअर केलेल्या बंडखोर आमदाराच्या पत्रात लिहिले आहे.

12:50 June 23

सरकार राहिल्यास सत्तेत राहू, सरकार गेल्यास विरोधी पक्षात बसू - जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

सरकार राहिल्यास आम्ही सत्तेत राहू, सरकार गेल्यास विरोधी पक्षात बसू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी राजकीय अस्थिरतेवर दिली.

12:40 June 23

ही आहे आमदारांची भावाना.. एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले पत्र

ही आहे आमदारांची भावाना.. एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले पत्र

12:31 June 23

पक्ष सोडणारे बाळासाहेबांचे भक्त नाहीत - संजय राऊत

फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा तेव्हा सर्वांना दिसेल, पक्ष सोडणारे बाळासाहेबांचे भक्त नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.

12:31 June 23

देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भाजप नेते पोहोचले

देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भाजप नेते पोहोचले.

12:25 June 23

सरकार टिकून राहण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याच्या पवारांच्या सूचना - जयंत पाटील

शरद पवार यांच्या निवासस्थानी आमची बैठक झाली. गेल्या 3-4 दिवसांतील घटनांचे मुल्यमापन करण्यात आले. पवार साहेबांनी सांगितले की, सरकार टिकून राहण्यासाठी जे काही करावे लागेल ते आपण केले पाहिजे. सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहू, असे जयंत पाटील म्हणाले.

12:07 June 23

उद्धव ठाकरेंना पाठिंबा होता, राहील, गेलेले आमदार परत येतील - जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

ठाकरे साहेबांच्या बरोबर राहावं आणि त्यांना सरकार करण्यासाठी प्रयत्न करावेत. ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले शिवसेनेचे आमदार परत येतील, असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्यामुळे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांना पूर्ण पाठिंबा राहील, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले. तसेच,
मला वाटत नाही की फ्लोर टेस्टचा टप्पा गाठला आहे. आम्ही कोणत्याही टप्प्यावर पोहोचलो तर त्याबाबत बोलू, असे महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले.

11:59 June 23

दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? दीपाली सय्यद यांचे ट्विट

सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू, असे ट्विटद्वारे दिपाली सय्यद यांनी सांगितले.

11:50 June 23

मुख्यमंत्री आज कोणतीही बैठक घेणार नाहीत - संजय राऊत

मुख्यमंत्री आज कोणतीही बैठक घेणार नाहीत, काही आमदार कार्यालयीन कामासाठी वर्षा बंगल्यावर जाणार आहेत. नितीन देशमुख ( जे काल सूरतहून नागपूरला आले आणि ज्यांनी अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता ) पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.

11:38 June 23

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बैठकीसाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बैठकीसाठी पक्षप्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले.

11:29 June 23

रेडिसन ब्लू हॉटेलबाहेर आंदोलन करणारे टीएमसी नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलबाहेर आंदोलन करणाऱ्या टीएमसी नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आसाममधील सुमारे 20 लाख लोक पुरामुळे त्रस्त आहेत, पण मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार पाडण्यात व्यस्त आहेत, अशी प्रतिक्रिया एक कार्यकर्त्याने दिली.

11:26 June 23

एकनाथ शिंदे आणि इतर आमदार वास्तव्यास असलेल्या गुवाहाटीतील हॉटेलसमोर टीएमसीचे आंदोलन

टीएमसीच्या आसाम युनिटचे सदस्य आणि कार्यकर्ते गुवाहाटीमधील रॅडिसन ब्लू हॉटेलच्या बाहेर आंदोलन करत आहेत. या हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदार वास्तव्यास आहेत. टीएमसी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा हे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

11:20 June 23

उद्धव ठाकरे राजीनामा देणार? मंत्रालयातील सर्व सचिवांना 12.30 वाजता संबोधन करणार

उद्धव ठाकरे राजीनामा देणार? मंत्रालयातील सर्व सचिवांना दुपारी 12.30 वाजता संबोधन करणार. ही बैठक ऑनलाई होणार आहे.

11:14 June 23

एकनाथ शिंदे वास्तव्यास असलेल्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आसामचे मंत्री अशोक सिंघल पोहचले

एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्राचे बंडखोर आमदार वास्तव्यास असलेल्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आसामचे मंत्री अशोक सिंघल पोहचले.

11:11 June 23

शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर गुवाहाटी येथे एकनाथ शिंदेंसोबत

शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर ज्यांनी काल रात्री मुंबई सोडल्याचे वृत्त आहे तेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आसाममधील गुवाहाटी येथे दिसले.

11:07 June 23

गुवाहाटी येथे वास्तव्यास असेले बंडखोर आमदार शिवसेना नेते दीपक केसरकर यांना भेटले

गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये तळ ठोकून बसलेले महाराष्ट्राचे बंडखोर आमदार माजी गृह राज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांना भेटले.

11:00 June 23

एकनाथ शिंदेंबरोबर एकूण 42 आमदार, शिवसेनेचे 34 आणि 8 अपक्ष आमदारांचा समावेश

आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्राचे एकूण 42 आमदार उपस्थित. यामध्ये शिवसेनेच्या 34 आणि 8 अपक्ष आमदारांचा समावेश असल्याची सुत्रांची माहिती.

10:57 June 23

शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी ८ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात - सूत्र

मुंबई- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडले आहे. शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी ८ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सुत्राने सांगितले आहे.

10:46 June 23

मुख्यमंत्र्यांना सोडून अवघे मंत्रिमंडळ पक्षाच्या आमदारांसह फुटते ही जगातली एकांडी घटना - भातखळकर

मुख्यमंत्र्यांना सोडून अवघे मंत्रिमंडळ पक्षाच्या आमदारांसह फुटते ही जगातली एकांडी घटना असावी, असा टोला भाजप आमदार भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

10:38 June 23

ईडीच्या कारवाईला भिऊन पळालेले आमदार शिवसेनेचे आमदार नाहीत - संजय राऊत

ईडीच्या कारवाईला भिऊन आमदार पळाले. पळालेले आमदार शिवसैनिक नव्हे. अमित शहांना भिऊन आमदार पळाले. आमच्या संपर्कात 20 आमदार असल्याचा राऊत यांनी दावा केला आहे. तसेच, भाजपशासित राज्यात आमदारांना डांबून ठेवले, असल्याचा आरोप राऊत यांनी केला. ईडीच्या दबावात पक्ष सोडणारा बाळासाहेबांचा भक्त होऊ शकत नाही. माझ्यावरही दबाव आहे, पण आम्ही ठाकरे कुटुंबासोबत आहोत. फ्लोअर टेस्ट झाल्यावर सगळे कळेल. बंडखोर आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आवाहन राऊत यांनी केला.

10:27 June 23

कॅरम खेळण्यापुरते पण शिल्लक राहणार नाहीत असे दिसते.. शिवसेनेतील बंडावर निलेश राणेंचा टोला

काल मुख्यमंत्री म्हणाले ज्यांना जायचे त्यांनी जा, पटकन अजून 6 आमदार निघून गेले. कॅरम खेळण्या पुरते पण शिल्लक राहणार नाहीत असे दिसते. तसेच, 50 आमदार/मंत्री मूळ घर सोडून वेगळे झाले, कारण त्यांना काँग्रेस आणि पवार साहेब नको. 50 वर्षांच्या राजकारणात पवार साहेबांनी हे कमवले, अशी टीका निलेश राणे यांनी ट्विटरवरून केली आहे.

10:23 June 23

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थाना बाहेर कडक पोलीस बंदोबस्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थाना बाहेर कडक पोलीस बंदोबस्त.

10:13 June 23

शरद पवार यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची थोड्याच वेळात बैठक

शरद पवार यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची थोड्याच वेळात बैठक.

10:06 June 23

एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे 41 आमदार

एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे 41 आमदार.

10:01 June 23

शिंदे गटाशी काही संबंध नाही, मी उद्धव ठाकरेंसोबत, खासदार तुमाने यांचे स्पष्टीकरण

नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने हे शिंदे गटात सामील होणार अशा बातम्या येत असताना त्या सर्व बातम्या चुकीच्या असून, माझा शिंदे गटाशी काही संबध नसून मी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याची माहिती खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. तुमाने सध्या दिल्ली येथे असून आज ते दुपार नंतर मुंबई येथे जाणार आहेत.

09:57 June 23

आसाममध्ये पूरस्थिती, मात्र पंतप्रधान महाराष्ट्र सरकार पाडण्यात व्यस्त, काँग्रेस खासदार गोगोई यांचा आरोप

भाजप सत्तेसाठी आंधळा झाला आहे. आसाममध्ये पूरस्थिती आहे, पंतप्रधानांनी राज्याचा दौरा करावा, विशेष पॅकेज जाहीर करावे, पण ते महाराष्ट्र सरकार पाडण्यात, किंवा गुजरात निवडणुकीत व्यस्त आहेत. भाजपसाठी फक्त सत्ताच सर्वस्व आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी दिली.

09:52 June 23

उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी फक्त 13 आमदारांचे संख्याबळ

शिवसेनेचे आक्रमक नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारल्यानंतर शिवसेनेच्या अनेक आमदारांनी त्यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना भावनिक आवाहन केले. मात्र त्यानंतरही 7 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणे पसंत केले आहे. त्यामुळे 55 आमदारापैकी आता उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी फक्त 13 आमदारांचे संख्याबळ उरले आहे.

09:41 June 23

रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल गुवाहाटीत दाखल, शिंदे गटात सामील

रामटेकचे शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल गुवाहाटीत दाखल झाले असून शिंदे गटात सामील झाले आहेत.

09:37 June 23

शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे माजी होऊ शकतील, 'सामना'तून इशारा

आमदारांना दहशतीच्या तलावारीखाली ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली आहे. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेला फरक पडत नाही. फरक भाजपच्या प्रलोभनांना आणि दबावाल बळी पडलेल्या आमदारांना पडणार. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे माजी होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो, वेळी सावध व्हा, शहाणे व्हा, असा इशारा सामन्यातून बंडखोर आमदारांना देण्यात आला आहे.

09:35 June 23

गुजरातमध्ये शिवसेनेचे एकून 6 बंडखोर आमदार

गुजरातमध्ये शिवसेनेचे एकून 6 बंडखोर आमदार.

09:26 June 23

शिंदेंना भाजपने अटक घातली का? प्रकाश आंबेडकर यांचा प्रश्न

एकनाथ खडसे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिये नंतर वंचित बहूजन आघाडीकडून या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटकरून एक प्रश्न मांडला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल, अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे? हा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

09:24 June 23

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी मुंबईत दाखल

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी मुंबईत दाखल. खासगी कामासाठी आल्याची सुत्रांची माहिती.

09:18 June 23

शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांची मात्रोश्रीवर, तर राष्ट्रवादीची वाय.बी सेंटरला होणार बैठक

शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांची आज सकाळी 11 वाजता मात्रोश्रीवर बैठक. तसेच राष्ट्रवादीची वाय.बी सेंटरला सकाळी 11 वाजता होणार बैठक.

09:05 June 23

शिवसेनेत गळती.. दीपक केसरकर गुवाहाटीत दाखल, शिंदे गटात सामील

शिवसेना नेते दीपक केसरकर गुवाहाटीत दाखल

08:55 June 23

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्याने राष्ट्रवादीत नाराजी

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या गोटात चलबिचल सुरू झाली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रणनीती आखण्यासाठी शरद पवारांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शासकीय निवासस्थान सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नाराजी असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे

08:37 June 23

एकनाथ शिंदे सोबत गेलेले आमदार नितीन देशमुख आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

मुंबई-बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आज मातोश्रीवर सकाळी 11.30 वाजता उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येत असल्याचे चित्र आहे.

08:22 June 23

शिवसेनेला धक्क्यांवर धक्के, आणखी तीन बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये पोहोचले

गुवाहाटी- महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आणखी तीन बंडखोर आमदार गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले.

08:12 June 23

शिवसेनेच्या आणखी सात आमदार नॉटरिचेबल, महाविकास आघाडी सरकार संकटात

मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या तीन दिवस सुरू असलेल्या राजकीय बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडले. शिवसेनेला हा हादरा असताना आता सहा आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह दीपक केसरकर, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दिलीप मामा लांडे, संजय राठोड या आमदारांचा समावेश आहे. हे सर्व आमदार गुजरात मार्गे गुवाहाटीला गेल्याचे समजते.

08:03 June 23

शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांची साडेदहा वाजता बैठक, काय घडणार?

मुंबई-शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांची साडेदहा वाजता बैठक बोलाविली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक होणार आहे. राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा होणार आहे.

07:41 June 23

शिवसेनेचे ६ आमदार नॉट रिचेबल, शिवसेनेला पडले मोठे खिंडार

मुंबई- एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होत आहे. शिवसेनेचे ६ आमदार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

07:29 June 23

गुवाहाटीमध्ये पोहोचले आणखी ४ आमदार, पहा व्हिडिओ

गुवाहाटी- शिवसेना नेते एकनाथ शिंदे इतर आमदारांसह काल रात्री गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर आणखी ४ आमदार हॉटेलमध्ये पोहोचले.


07:08 June 23

होय संघर्ष करणार!संजय राऊत यांचे सूचक ट्विट

संजय राऊत

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या बंडामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीत अडचणीत आले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या फेसबुक लाईन मधून जनतेशी संवाद साधला. दरम्यान, संजय राऊत यांनी 'होय, संघर्ष करणार' असे ट्विट करत एकनाथ शिंदे सहित विरोधकांना सूचक संदेश दिला आहे.

06:59 June 23

शिवसेनेचे सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे गुजरातला रवाना- सुत्रांची माहिती

मुंबई - माहिमचे शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि कुर्ला मतदारसंघाचे मंगेश कुडाळकर हे नॉट रिचेबल आहेत. सुत्राच्या माहितीनुसार ते सुरतला रवाना झाले आहेत.

06:55 June 23

शरद पवार काय घेणार निर्णय? राष्ट्रवादीच्या आमदारांची आज होणार बैठक

मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे यांचे बंड ही अंतर्गत बाब असल्याची भूमिका घेतली आहे. असे असले तर महाविकास आघाडी सरकार वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

06:49 June 23

भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

मुंबई-भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मुंबईतील मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ऑनलाइन तक्रार बुधवारी दाखल केली आहे.

06:36 June 23

राजीनामा दिलेल्या किंवा अपात्र ठरलेल्या आमदारांना 5 वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यापासून रोखा- सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई- राजीनामा दिलेल्या किंवा अपात्र ठरलेल्या आमदारांना 5 वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यापासून रोखा, अशी विनंती करणारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

06:16 June 23

शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी ८ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात - सूत्र

मुंबई-राज्यात महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येत असताना मोठ्या घडामोडी घडत आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची गटनेतापदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपणच गटनेता असल्याचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी भावनिक आवाहन करुनही शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray) माघारी येण्यास तयार नाहीत. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडतावेळी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते. यावेळी कट्टर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या गगनभेदी घोषणा देऊन शिवसैनिक पक्षनेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं दाखवून दिले आहे. त्यांना याबाबत आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये पूर्वीच सुचना दिली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फेसबुक संवादनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट ( Eknath Shinde tweet ) केले आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे, शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे, अशा आशयाचे ट्विट एकनाथ शिंदेंनी केले आहे. शिवाय पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचेही शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे आता महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.

राज्यात राजकीय घडामोडीना वेग आला असताना एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी राज्यपाल यांना 35 आमदारांच्या सहीचे पत्र देत पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्या पत्रावर असलेली सही ही माझी नाही ( Nitin Deshmukh Signature Issue ), असे बाळापूरचे सेनेचे आमदार नितीन देशमुख ( MLA Nitin Deshmukh ) यांचे म्हणणे आहे. थोड्याच वेळात आपण अकोला येथे पत्रकार परिषद घेणार असून या संदर्भातही खुलासा करणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी दूरध्वनीवर बोलताना सांगितले.

गुवाहाटी (आसाम) - शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील हे गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहे. गुलाबराव पाटील यांच्यासोबत आणखी दोन शिवसेनेचे आमदार तिथे गेले आहेत. गुलाबराब पाटील यांच्यासह आमदार योगेश कदम, मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील हे आमदार ते पोहेचले आहेत. ( gulabrao patil in Guwahati with 3 Shiv Sena MLA )

Last Updated : Jun 23, 2022, 10:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details