मुंबई: भाजपाचे नेते आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (Rajya Sabha Speaker Venkaiah Naidu) आता शिवसेनेच्या मदतीला धावले (will come to the aid of Shiv Sena) आहेत. दोन खासदारांना पक्षशिस्त चा भंग केल्याप्रकरणी नायडू यांनी अपात्र ठरवले होते (A decision of Venkaiah Naidu). नायडू यांचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने हाच न्याय आता राज्यातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला लावण्यात येण्याची शक्यता आहे.
काय होता निर्णय?सभागृहातच नव्हे तर सभागृहाच्या बाहेर सुद्धा आमदार अथवा खासदारांनी केलेल्या पक्षविरोधी कारवाया, त्यांच्या अपात्रते साठी कारणीभूत ठरू शकतात, हा राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बिहार जनता दल युनायटेडचे दोन खासदार शरद यादव आणि अन्वर अन्सारी यांचे राज्यसभा सदस्य पद रद्द करताना दिला होता. हाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला आहे. त्यामुळे आता पक्षांतर बंदी कायदा हा सभागृहाच्या बाहेर केलेल्या पक्षविरोधी कारवायाना सुद्धा लागू शकतो, हे स्पष्ट झाले आहे.