महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Controversy : 'भोंग्यां, हिंदुत्वापेक्षा पोटा पाण्याचा प्रश्न महत्वाचा'; सर्वसामान्याचा सूर - महाराष्ट्र लाऊडस्पीकर प्रकरण

देशात राजकीय पक्षाकडून धार्मिकवादाचे राजकारण केले ( Maharashtra Political Controversy ) जात आहे. मात्र भोंग्यां, हिंदुत्वापेक्षा पोटा पाण्याचा प्रश्न महत्वाचा ( loudspeaker issue ) आहे. त्या मूळ प्रश्नाला बगल देऊन वाद वाढवण्यावर भर दिला जातो आहे. केंद्र असो किंवा राज्य सरकारने यापेक्षा लोकांना भेडसावणाऱ्या आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि वाढत्या महागाईकडे लक्ष द्यावे.

Maharashtra Political Controversy
धार्मिकवादाचे राजकारण

By

Published : May 3, 2022, 8:28 AM IST

मुंबई -देशात राजकीय पक्षाकडून धार्मिकवादाचे राजकारण केले ( Maharashtra Political Controversy ) जात आहे. मात्र भोंग्यां, हिंदुत्वापेक्षा पोटा पाण्याचा प्रश्न महत्वाचा ( loudspeaker issue ) आहे. त्या मूळ प्रश्नाला बगल देऊन वाद वाढवण्यावर भर दिला जातो आहे. केंद्र असो किंवा राज्य सरकारने यापेक्षा लोकांना भेडसावणाऱ्या आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि वाढत्या महागाईकडे लक्ष द्यावे. हिंदू मुस्लीम जातीय वाद ( Hindu Muslim caste disputes ) करून काही उपयोग होणार नाही. अशा संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. देशात सर्वच गोष्टींच्या महागाईचा आगडोंब झाला आहे. इंधन दरवाढ तर पाचवीलाच पूजल्या सारखे आहे. दिवसागणिक अव्वाच्या सव्वा किमती वाढत असल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. परंतु, महागाईच्या मुद्द्यांऐवजी राजकीय पक्षाकडून भोंगा, हिंदुत्वावर, हनुमान चालीसावर राजकारण केले जात आहे, असा सुर हा सर्वसामान्य जनतेमधून येत आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रिया

महागाईवर कोणताही राजकीय नेते बोलायला तयार नाहीत - महाराष्ट्र दिनी भाजप आणि मनसेच्या राजकीय सभा झाल्या. सभेतून मनसेने भोंगे, शरद पवारांवर भाष्य केले. तर भाजपने शिवसेनेला लक्ष्य करताना हिंदुत्वाच्या मुद्द्याचा आधार घेतला. सध्या राजकीय पक्षाकडून एकमेकांची उणीधुणी काढण्याचा सपाटा सुरू आहे. मात्र सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत बोलायला कोणी तयार नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेकडून राजकीय नेत्यांवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. भोंग्यांतून महागाईविरोधात आवाज उठवा, निवडणुका आल्या की मतांची झोळी भरण्यासाठी विकासाचे मुद्दे मानले जातात. मात्र निवडणुका झाला की कोणी लक्ष देत नाही. आताही, डिझेल, पेट्रोल, इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आम्ही संकटात आहोत. इंधन दरवाढीवर महागाई वाढते. सगळ्या गोष्टी महाग झाल्या तर खायचं काय? केंद्र आणि राज्य सरकार निवडून त्यावर तोडगा काढायला हवा. परंतु, महागाईवर कोणताही राजकीय नेते बोलायला तयार नाहीत, असे यावेळी नागरिकांनी सांगितले.

'हिंदुत्वाच्या मुद्द्यातून पोट भरणार नाही' -भोंगा आणि हिंदुत्व गौण मुद्दा आहे. त्यापेक्षा पोटापाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. मात्र या प्रश्नाला बगल देऊन वाद निर्माण केले जात आहेत. सगळ्या पक्षांनी महागाईच्या विरोधातील मुद्द्यांचा अजेंडा राबवायला हवा. तुमच्या भोंगा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यातून पोट भरणार नाही. राजकिय लोकांनी लोकहितांचे प्रश्न उचलून धरावे, त्यांना आशीर्वाद मिळतील, असे टॅक्सी चालक दत्तात्रय मोरे यांनी सांगितले.

'अडीअडचणीच्या वेळी कोणी येत नाही' -गरीब जनता भरडली जातेय कोरोना काळानंतर महागाई वाढली आहे. मुलांचे शिक्षण थांबले आहे. नोकऱ्या गेल्या आहेत. लोक बेघर झाली आहेत. राजकीय पक्षांना याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. खुर्ची वाचवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीपूर्वी दारात येणार, मत मागणार. आश्वासन देणार. मात्र अडीअडचणीच्या वेळी कोणी येत नाही. गरीब जनतेला कोणीच वाली नाही, सर्वसामान्य जनता यात भरडली जात आहे, असे गृहणी वैभवी यांनी सांगितले.

'देशाचा विकास कसा होणार' -तर मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग रोजगार झाले आहेत. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. मात्र नको त्या विषयावर भर दिला जातोय. असे व्हायला नको, अशी संतप्त प्रतिक्रिया निलेश गुरव यांनी व्यक्त केली. जातीयवादातून काही मिळणार नाही हिंदुत्वाचा मुद्दा पेक्षा शैक्षणिक आणि कामगार क्षेत्राकडे राजकीय पक्षांनी भर द्यावा. दिवसेंदिवस महागाई, जीवनावश्यक वस्तू महागत आहेत. तिकडे लक्ष द्यायला हवा. हिंदू मुस्लीम जातीय वाद करून याचा काहीही फायदा होणार नाही. शिक्षण घेतल नाही, तर पुढे कस जाणार. देशाचा विकास कसा होणार. आणि नोकऱ्या कशा मिळणार? अशा जातीयवादात अडकल्यास युवा वर्ग होण्याचा काही फायदा होणार नाही, असे तरुणी बरखा शर्मा हिने सांगितले.

आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षेच्या मुद्द्याकडे लक्ष द्यावे - तर हिंदू मुस्लिम अशा राजकारणाचा काही उपयोग नाही. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईकडे लक्ष द्यायला हवा. तसेच आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षेच्या मुद्द्याकडे बारकाईने बघणे जास्त महत्त्वाचे ठरेल, असे मंजू चौहान हिने सांगितले.

हेही वाचा -Uniform Civil Code : केवळ मुस्लिम द्वेषातून देशात समान नागरी कायद्याची भाषा- असदुद्दीन ओवैसी

ABOUT THE AUTHOR

...view details