मुंबई - भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या (Indian Republic Day) औचित्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दलातील कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने (Maharashtra Police Achievement) ७ शौर्य पोलीस पदक, ४ विशिष्ठसेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक आणि ४० गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक पटकाविले आहेत. तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील सात अधिकाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. “...महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. अग्निशमन सेवेतील रक्षक बाळू देशमुख यांना शौर्यासाठी सर्वोच्च असा ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ मरणोत्तर जाहीर झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी कृतज्ज्ञता व्यक्त करून, दिवंगत देशमुख यांच्या स्मृतींना वंदन केले आहे.
Maharashtra Police Achievement : महाराष्ट्र पोलीस दलाला ५१ पदके; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक - महाराष्ट्र पोलीस दलाला ७ शौर्य
महाराष्ट्र पोलीस दलाने (Maharashtra Police Achievement) ७ शौर्य पोलीस पदक, ४ विशिष्ठसेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक आणि ४० गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक पटकाविले आहेत.
या शूरवीरांना मिळाले पदक
महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी गोपाळ उसेंडी, महेंद्र कुलेटी, संजय बकमवार, भारत नागरे, दिवाकर नरोटे, निलेश्वर पड, संतोष पोटावी यांना शौर्य पोलीस पदक तर अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगांवकर, एसआरपीएफचे कमांडट प्रल्हाद खाडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे, पोलीस उपनिरिक्षक अन्वरबेग मिर्झा यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस दलातील ४० अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक जाहीर झाले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पदक विजेत्यांचे केले कौतुक
महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील अग्निशमन रक्षक बाळू देशमुख यांना सर्वोच्च शौर्यासाठी मरणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. याशिवाय उत्कृष्ट सेवेसाठी मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, अग्निशमक सुरेश पाटील, संजय म्हामूणकर, चंद्रकांत आनंददास यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच सर्वांची कामगिरी महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यानी या सर्व पदक विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. त्यांच्या या कामगिरीसाठी पाठबळ देणाऱ्या कुटुंबियांप्रतिही आदर व्यक्त केला.
हेही वाचा -MPSC PSI STI Exam : एमपीएससी विरोधातील विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश.. मात्र, 'इतके' विद्यार्थीच बसणार परीक्षेला