महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 31, 2022, 6:38 AM IST

Updated : Jul 31, 2022, 3:27 PM IST

ETV Bharat / city

Maharashtra Breaking News : संजय राऊत यांना अटक करण्यासाठी भाजपचे प्रयत्न - उद्धव ठाकरे

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

15:25 July 31

संजय राऊत यांना अटक करण्यासाठी भाजपचे प्रयत्न - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

अनेकांना मातोश्रीचे नाते

गोष्टीचा अभिमान आहे. शेफारलेली माणसे तिकडे गेली

काहीही जबाबदारी द्या, मी पार पाडेन शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही

दमदाटी, लोभापायी जात आहेत.

कोश्यारी विरोधात पत्रकार परिषद

पदाचा मान राखायला हवा

काल पासून सुरुवात झाली आहे. संजय राऊतांच्या घरी ईडीचे पाऊणे बसले आहेत

महाराष्ट्रावरील कारस्थान संपवण्यासाठी भाजपचे प्रयत्न

ठाकरे पासून नाते तुटत नाही. शिवसेना आणि ठाकरे नाते तुटले तर त्यांना गोठ्यात बांधण्याचा प्रयत्न भाजपचा प्रयत्न

संजय राऊत यांना अटक करायचे सुरु आहे

दडपशाही सुरु झाली आहे. हिंदुत्व शब्द उच्चारण्यासाठी मर्द होता.

जिवाला जीव देणारे शिवसैनिक बाळासाहेबांसोबत होते.

आज हिंदूत्वाचा पुळका आला आहे. महाराष्ट्राच्या मूळावर येणाऱ्याला सोडणार नाही.

महाराष्ट्राचा अपमान खपवून घेणार नाही.

बाळासाहेब, आनंद दिघे असे नव्हते.

लोकशाहीचा खून होणार असेल, हत्या होणार असेल. मित्र पक्षासोबत ही लढणार

हिंदू, शिवसेनेचा गळा घोटण्याचा प्रकार,

कारस्थान मिटवून टाकायला हवा

अर्जून खोतकर यांनी मान्य केले.

दडपणाला घाबरणारा बाळासाहेब, दिघे साहेबांचा शिवसैनिक असणार नाही

मेलो तरी बेहत्तर शिवसेना सोडणार नाही, असे दिघे होते.

अनेक वर्षे जेलमध्ये होते. घाबरलेले नाहीत.

महाराष्ट्राच्या मातीचे शौर्य वीराला जन्म देण्याचे

या लढ्यात विरोधात लढत राहू

गरज पडल्यास रस्त्यावरही उतरू

13:24 July 31

ईडीच्या कारवाईला घाबरून कुणीही आमच्याकडे किंवा भाजपकडे येऊ नका-एकनाथ शिंदे

ईडी ची चौकशी होऊ द्या..

संजय राऊत हे घाबरत नाही म्हणतात मग काय अडचण आहे

ईडीच्या कारवाईला घाबरून कुणीही आमच्याकडे किंवा भाजपकडे येऊ नका

13:20 July 31

मोदी आणि शाह यांनी निधी कमी पडू देणार नाही-एकनाथ शिंदे

मोदी आणि शाह यांनी निधी कमी पडू देणार नाही- असे आश्वासन दिले आहे

रेल्वेचे प्रश्न मांडले गेले...भूसंपादनाचे प्रश्न सोडविणार...

रस्त्याचे विषय आले. त्याचाही विचार केला जात आहे

मुंबईतील खड्डे सापडणार नाहीत ...६०० किमी रस्ते सात हजार कोटी रुपये लागणार

मार्चमध्ये उर्वरित ४२३ किमी रस्ते करणार

३२५ कोटी रुपये लागण्याची शक्यता..आम्ही अधिक देण्याचा प्रयत्न करू

अंमलबजावणी करणार

13:15 July 31

पश्चिमी वहिनी नद्या पाणी वळवण्याचा प्रयत्न करणार आहोत

पश्चिमी वहिनी नद्या पाणी वळवण्याचा प्रयत्न करणार आहोत

पाण्याची उपलब्धता पाहून काम करणार

मोठ्या प्रमाणात जमीन ओलिताखाली येऊ शकते

सर्व घटकांना आमचे सरकार मदत करणार

13:13 July 31

संकेत सलगर या खेळाडूला ३० लाख रुपयांचे पारितोषिक देणार

मुंडे स्मारकाचा विषय आहे त्यालाही चालना देणार

संकेत सलगर या खेळाडूला ३० लाख रुपयांचे पारितोषिक देणार

पश्चिमी वहिनी नद्या पाणी वळवण्याचा प्रयत्न करणार आहोत

13:10 July 31

मुंडे यांच्या स्मारक करण्यासाठीच्या अडचणी दूर करू-एकनाथ शिंदे

जिल्हा सामान्य रुग्णालय लातूर मोफत जमीन अडचण दूर करू

हिंगोली कुरुंदा गावाचे पाणी आणि पुनर्वसन करण्याचा निर्णय

बाळासाहेब ठाकरे उद्यान आढावा घेतलाय

त्याला चालना देण्यासाठी सूचना दिल्या आहेत

13:10 July 31

नांदेड जालना समृद्धी महामार्ग करण्यात येणार

वेरूळ घृष्णेश्वर विकासाची मागणी आलीय.

परभणी समांतर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार

नांदेड जालना समृद्धी महामार्ग करत आहोत

13:09 July 31

शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी काळजी घेणार

१०० कोटी रुपये निधी लागणार्या रस्त्याचे कामहोईल

शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी काळजी घेणार

आत्महत्या होऊ नये यासाठी बँका आणि संबंधित यांच्याशी चर्चा करून आराखडा करण्याच्या सूचना दिल्या

आत्महत्या कमी करण्यासाठी निर्णय घेण्यात आलाय

13:09 July 31

क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार

१०० कोटी रुपये निधी लागणार्या रस्त्याचे काम.होईल

शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी काळजी घेणार

आत्महत्या होऊ नये यासाठी बँका आणि संबंधित यांच्याशी चर्चा करून आराखडा करण्याच्या सूचना दिल्या

क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार

13:07 July 31

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद, वाचा, काय म्हणाले...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतलाय

काही लोकांचे मृत्यू झाले...शेती पिक नुकसान याचा आढावा घेतलाय

नुकसानी बाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल

औरंगाबादला एक दिवसाआड पाणी मिळू शकेल

संभाजीनगर पाणी प्रश्ना वर चर्चा केली

पाईप बदलण्यासाठी २०० कोटी रुपये निधी दिला जात आहे

लोकांना यामुळे पाणी मिळेल

12:29 July 31

स्वप्ना पाटकर यांनी पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात संजय राऊत यांच्यावर व्यक्त केला संशय

संजय राऊत यांच्या या प्रकरणात देखील अडचणी वाढण्याची शक्यता पोलिसांनी घेतली कोर्टात धाव

पत्राचाल संदर्भात स्वप्ना पाटकर यांना आलेल्या धमकी प्रकरणात चौकशीची परवानगी करिता वाकोला पोलीसां तर्फे बांद्रा महानगर दंडाधिकारी कोर्टात धाव


या प्रकरणात चौकशी करण्याची परवानगी मिळविण्यासाठी पोलिसांनी केलाय अर्ज

स्वप्ना पाटकर यांना काही दिवसापूर्वी धमकीचे आले होते पत्र

या विरोधात त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांना केली होती तक्रार

या प्रकरणी वाकोला पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात NC दाखल केली होती

मात्र स्वप्ना पाटकर यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रार पत्रात संजय राऊत या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याचा केला होता संशय

मात्र शनिवारी स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाले होते

या क्लिपमध्ये एका महिलेला अतिशय अश्लील भाषेत शिवीगाळ करताना आहे

12:05 July 31

अॅक्सेलला अखेरची श्रद्धांजली

दहशतवादी मोहिमेत गोळी लागल्याने प्राण गमावलेल्या भारतीय लष्कराच्या श्वानाच्या अॅक्सेलला अखेरची श्रद्धांजली वाहण्यात आली.

11:55 July 31

'राष्ट्रपती' न म्हणता 'द्रौपदी मुर्मू' म्हटले, स्मृती इराणी यांनी माफी मागावी-अधीर रंजन चौधरी

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी 'राष्ट्रपती' न म्हणता 'द्रौपदी मुर्मू' हे म्हटल्याबद्दल "बिनशर्त माफी मागावी" अशी मागणी केली आहे.

11:18 July 31

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पाटणा साहिब गुरुद्वारामध्ये केली प्रार्थना

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांच्या राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यात पाटणा साहिब गुरुद्वारामध्ये प्रार्थना केली.

11:11 July 31

मन की बात: 'आझादी का अमृत महोत्सव' एक जनआंदोलन झाल्याचे पाहून आनंद-पंतप्रधान नरेंद्र मोदी

31 जुलै रोजी आपण शहीद उधम सिंह जी यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. 'आझादी का अमृत महोत्सव' एक जनआंदोलन झाल्याचे पाहून मला आनंद झाला, असे मत पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात' दरम्यान केले. आझादी का अमृत महोत्सवांतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ आंदोलन होणार आहे. तुम्ही या चळवळीचा एक भाग व्हा आणि तुमच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवा, आवाहन पंतप्रधानांनी 'मन की बात'मध्ये केले.

11:04 July 31

इतरांवर बिनबुडाचे आरोप करण्याची काँग्रेस पक्षाला सवय- केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा

स्वत:च्या चुका गालिच्याखाली झाकण्यासाठी इतरांवर बिनबुडाचे आरोप करण्याची काँग्रेस पक्षाला सवय आहे. त्यांनी (काँग्रेस आमदारांनी) कारमधून जप्त केलेली सर्व रोकड कोठून आली हे स्पष्ट करावे, असा टोला केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा झारखंडच्या काँग्रेस नेत्यांना लगावला.

11:01 July 31

जस्टीस हिदायतुल्ला यांच्याप्रमाणे केसेस घ्याव्यात-सरन्यायाधीश

छत्तीसगडमधील हिदायतुल्ला लॉ युनिव्हर्सिटी, रायपूर येथे 5 व्या दीक्षांत समारंभात सरन्यायाधीश सी.व्ही. रमण यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, की

तुम्हा सर्वांना विनंती करतो की, जस्टीस हिदायतुल्ला यांनी तरुण बॅरिस्टर प्रमाणेच शक्य तितक्या प्रो-बोनो केसेस घ्याव्यात.

10:45 July 31

24 तासांत 19,673 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासांत 19,673 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण 1,43,676 रुग्ण आहेत.

10:44 July 31

पेपर लीक प्रकरणी डझनभर आरोपींना अटक

कुमाऊं विभागात गेल्या २४ तासांत UKSSSC पेपर लीक प्रकरणी डझनभर आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये उत्तराखंडचे पोलीस हवालदार अमरीश गोस्वामी यांचा समावेश आहे. स्पेशल टास्क फोर्सने एकूण 35.89 लाख रुपये वसूल केले आहेत.

10:43 July 31

नेपाळमध्ये ६ रिश्टर क्षमतेच्या भूंकपाचा धक्का

नेपाळमध्ये ६ रिश्टर क्षमतेच्या भूंकपाचा धक्का जाणवला आहे.

10:42 July 31

राज्यपालांच्या विधानाशी सहमत नाही-देवेंद्र फडणीस

मी राज्यपालांच्या विधानाशी सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासात मराठी माणसांचे योगदान आहे. या विकास प्रवासात इतर अनेक लोक सामील आहेत. पण मराठी माणसाचे महत्त्व कमी करू शकत नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

10:20 July 31

उद्धव ठाकरे आजारी असल्याने अजित पवारांना रान मोकळे मिळाले-रामदास कदम

संजय राऊत यांच्या घरावार ईडीचा छाप पडल्याबाबत माजी मंत्री रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की संजय राऊत हे कोणाला घाबरत नाहीत. मग गुन्हा नसेल तर घाबरता कोणाला?

शिवसेना फोडण्याचे श्रेय रावतांचे आहे.

या कारवाईच्या समर्थन करण्यापेक्षा मी दाव्याने सांगतो. संजय राऊत घाबरणार नाही ते सामोरे जातील

आजारी असल्याने ठाकरेंना दोष देणार नाही

उद्धव ठाकरे आजारी असल्याने अजित पवारांना रान मोकळे मिळाले,

09:57 July 31

एकनाथ खडसे यांची चौकशी करण्यास आमची कोणतीही हरकत नाही- अंजली दमानिया

एकनाथ खडसे यांची भोसरी भूखंड प्रकरणी चौकशी करण्यास,आमची कुठलीही हरकत नाही,याचिकाकर्त्या अंजली दमानिया यांच्या न्यायालयात अर्ज केल्याची माहिती वकिल असीम सरोदे यांनी दिली आहे.

09:38 July 31

कारवाईला उत्तर देण्यासाठी संजय राऊत हे समर्थ-संजय शिरसाठ

संजय राऊत यांच्यावरील कारवाईला उत्तर देण्यासाठी संजय राऊत हे समर्थ आहेत. आता त्यांनी स्वतःची लेखणी चालवावी आणि स्वतःची सोडवणूक करून घ्यावी अशी प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाठ यांनी व्यक्त केली

09:38 July 31

ईडीच्या तीन पथकांमार्फत मुंबईत कारवाई सुरू

एक पथक संजय राऊत यांच्या घरी

या पथकामध्ये दहा ते बारा अधिकारी आहेत

अजून दोन पथके मीडिएटर असलेल्या दोन जणांवर कारवाई करणार असल्याचे समजते

मात्र ही दोन पथके कुठे असणार याबाबत मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांकडून गुप्तता पाळण्यात आली आहे

09:30 July 31

गेल्या दोन तासापासून ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी अधिकाऱ्यांकडून सुरू

गेल्या दोन तासापासून ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी अधिकाऱ्यांकडून सुरू

घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमायला सुरुवात

घराच्या बाहेर भाजपच्या विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी

09:05 July 31

पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग

पुणे - पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग करण्याची घटना नगर रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी नवनाथ संभाजी गिरी (वय १९, रा. चंदननगर, खराडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी महापालिका भवन बसथांब्यावरुन नगर रस्त्याकडे जात होती.

प्रवासात आरोपी गिरीने तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने आरडाओरडा केला. तेव्हा त्याने बसमध्ये तरुणीला धक्काबुक्की केली. नगर रस्त्यावर बस थांब्यावर बस थांबविण्यात आली. गिरी पसार झाला असून पोलीस उपनिरीक्षक मदे तपास करत आहेत

09:04 July 31

संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिक झाले गोळा

पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने छापा टाकल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते पक्षनेते संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर जमले.

07:43 July 31

संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल

मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता

पहाटे ईडीचे पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचले

संजय राऊत यांना अटकेची शक्यता

07:12 July 31

दोन दहशतवाद्यांना जम्मू पोलिसांकडून अटक, दोन पिस्तुलासह ११ जिवंत काडतुसे जप्त

तारिक अह वानी आणि इशफाक अह वानी नावाच्या दोन दहशतवाद्यांना जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. हदीपोरा रफियााबाद येथील चेकिंग पॉइंटवरून पळून गेल्यानंतर सोपोर पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पिस्तूल, दोन पिस्तुल मॅगझिन आणि 11 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

06:44 July 31

निवृत्त होणाऱ्या आईला मुलाने घडवून आणली हेलिकॉप्टरची सफर

अजमेरमध्ये एका मुलाने आईला हेलिकॉप्टर राईड भेट दिली. माझी आई शिक्षिका म्हणून निवृत्त झाली. मला तिच्यासाठी काहीतरी खास करायचं होतं आणि तिला घरी पोहोचण्यासाठी एक संस्मरणीय हेलिकॉप्टर राईड बुक करायचं ठरवलं. गर्दीची अपेक्षा नव्हती, पण छान वाटते, असे मुलगा योगेश चौहान यांनी सांगितले.

06:42 July 31

इंदिरा गांधी प्राणिसंग्रहालयात व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या ५ तरुणांना अटक

विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी प्राणिसंग्रहालयातील वन्य डुकरांच्या गोठ्यात व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड करणे 5 तरुणांना अंगलट आले आहे. 29 जुलै रोजी पोलिसांनी 5 तरुणांच्या गटाला अटक केली आहे.

06:39 July 31

सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत बारामुल्ला येथे दहशतवादी ठार

सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत बारामुल्ला येथे एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे . शस्त्रास्त्र आणि दारूगोळा यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटली आहे. बारामुल्ला येथील इर्शाद अहमद भट असे या दहशतवाद्याचे नाव आहे. हा दहशतवादी २०२२ पासून दहशतवादी संघटना एलईटीशी संबंधित आहे. एके रायफल, 2 मॅगझिन आणि 30 राऊंड जप्त केल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.

06:21 July 31

Maharashtra Breaking News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद, वाचा, काय म्हणाले...

मुंबई -राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, ते दिल्लीमध्ये मुख्यमंत्री भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. याबाबत भाजप नेते किरीट सोमैया यांची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही असे वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे.

Last Updated : Jul 31, 2022, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details