मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांचे सुपुत्र अमित ठाकरे ( Amit Thackeray ) सध्या पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी राजकीय दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विद्यमान अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही आज मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधून ( Local train Mumbai ) प्रवास केला. मीरा रोड, वसई, विरार, पालघर या भागांना भेटी दिल्या. अमित ठाकरे आज अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूरला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. दादर ( Dadar ) ते अंबरनाथ या लोकल ट्रेनच्या प्रवासात त्यांच्यासोबत मनसे कार्यकर्त्यांचाही मोठा जमाव उपस्थित होता. आज त्यांच्या उपस्थितीत अनेक विद्यार्थी नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश करणार ( Amit Thackeray In Local Train ) आहेत.
BMC वर झेंडा कुणाचा?येत्या काही दिवसांत मुंबईतील बीएमसी,( BMC Election 2022 ) जिल्हा पंचायतीसह राज्यातील अनेक नगरपालिकांच्या निवडणुका ( Municipal elections ) आहेत. अशा स्थितीत पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी खुद्द अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत. राजकीय पक्षांच्या माध्यमातून ते आपल्या पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एका बाजूला माजी पर्यावरण मंत्रीआदित्य ठाकरे देखील पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी 'निष्ठायात्रा' काढत आहेत. तर, दुसरीकडे 'राज'पुत्र अमित ठाकरे देखील दौऱ्यावर आहेत.