मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरात 'चला अयोध्या'चे पोस्टर लावले ( MNS Chalo Ayodhya Poster in Mumbai ) आहे. लोकांना राज ठाकरे यांच्या जून महिन्यातील अयोध्या दौऱ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत मनसे पोस्टर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील भागात हे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर 'जय श्रीराम, धर्मांध नाही.... मी धर्माभिमानी...., चला अयोध्या!, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा. , ऐतिहासिक दिवस दिनांक 5 जून 2022 . असा मजकूर या पोस्टरवर दिसून येत आहे.
नागरिकांना आवाहन -मनसेने या बॅनर मध्ये म्हटलंय की, 'जय श्री राम, मी कट्टर नाही, मी धर्माभिमानी आहे' साहजिकच या संदेशाद्वारे मनसेला जनतेला सांगायचे आहे की, धर्माच्या नावाखाली ते कट्टर धर्मांध नसून त्यांना धर्माचा अभिमान आहे. ठाकरे यांची ही कृती हिंदुत्वाच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. ज्याद्वारे ते आपले राजकीय मैदान नव्याने शोधत आहेत.