नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Union Budget 2022 ) 31 जानेवरीपासून सुरू झाले आहे. आज विमानांच्या उड्डाणाबाबत सुरू झालेल्या कामकाजादरम्यान महाराष्ट्रातील काही खासदारांनी ( MH MPs in Parliament ) सभागृहात प्रश्न उपस्थित केले.
शिवसेना खासदार राहुल शिवाळे संसदेत प्रश्न विचारताना मुंबईतून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करा - मुंबई दक्षिण मध्यचे शिवसेना खासदार राहुल शिवाळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ( Rahul Shewale Shiv Sena MP in Parliament ) मुंबईतुन बंद झालेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना पुन्हा परवानगी द्यावी अशी मागणी केली ( Rahul Shewale Shiv Sena MP in Budget session ) आहे. सध्या मुंबईवरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेतलेले विमाने ही दिल्ली मार्गावरून जातात. पूर्वीप्रमाणे किंगफिशर, जेट एयरवेज यांना थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. यावेळी याला उत्तर देताना नागरी उड्डाण मंत्री ज्योतिराधित्य सिंधिया यांनी सांगितले की, यासाठी एनडीए सरकार पूर्णपणे कटीबद्ध आहे. येत्या काळात ही उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात येतील असे सांगितले.
खासदार इम्तियाज जलील यांचा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांचा प्रश्न - किती नवीन एयरलाईन्स देशात खुलणार आहेत?. जेट एयरलाईन्स कर्मचाऱ्यांच्याबाबत आपण काय योजना केल्या आहेत?, असा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विचारला होता. यावर उत्तर देतांना नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, देशात दोन नवीन एयरलाईन्स खुलणार आहेत. नव जेट एअरवेज, आकाशा अश्या दोन एयरलाईन्स आहेत. उड्डाण योजनेंतर्गत 11 एयरलाईन्स सुरू करण्यात आल्या आहेत. जेट एयरवेजच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा एनएलसीपी आधीन आहे. त्यांच्या माध्यतातूनच याचे उत्तर देण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे.
भाजपा खासदार गोपाल शेट्टी प्रश्न विचारताना इलेक्टॉनिक वाहनांची बॅटरी - भाजपा खासदार गोपाल शेट्टी यांनी इलेक्टॉनिक वाहनांची बॅटरी ही लांब पल्ल्याच्या प्रवासात ही बाईकमोठ्या प्रमाणात चालले मात्र ड्रायव्हरची अशी तक्रार आहे की, लघु पल्ल्याच्या प्रवासात या वाहनांची बॅटरी ही लवकर संपते. त्यामुळे या वाहनांना आपण दुसरी बॅटरी किंवा अन्य काही सुविधा करणार आहात का असा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली की, इलेक्टॉनिक वाहनांना मोठ्या प्रमाणात नागरिकांची पसंती मिळत आहे. विविध प्रकाराच्या बॅटरी बनत आहेत. आम्ही काही बॅटरी सजेस्ट केलेल्या आहेत. तसेच सदस्यांनी ज्या वाहनांबाबत तक्रार केलेली आहे त्याबद्दल माहिती घेऊन चौकशी केली जाईल अशी माहिती दिली.
शिवसेना खासदार विनायक राऊत प्रश्न विचारताना शिवसेना खासदार विनायक राऊत - ड्रोन निर्मितीसाठी आता नवीन कंपनीस मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी नवीन संस्थाही उघडत आहेत असा प्रश्न रत्नागिरी सिंध्दुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी विचारला आहे. यावर उत्तर देताना ज्योतिराधित्य सिंधिया म्हणाले की, आमचा प्रयत्न आहे की, ड्रोन लायसन हे डीजीसीजीसे देण्यात येणार नाही, ते संस्थेच्या माध्यमातून देण्यात येईल. तसेच नवीन संस्था आणि ड्रोन निर्मितीवर सरकारने योग्य प्रकारे नियंत्रण असेल असे उत्तर ज्योतिराधित्य सिंधिया यांनी दिले आहे.
गजानन किर्तीकर संसदेत बोलताना कब्बडी, खो-खोच्या निधीत वाढ करावी - ग्रामीण भागात कब्बडी आणि खो-खो यांना मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात त्यामुळे या खेळांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात यावा अशी मागणी शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी केली आहे.
हेही वाचा -Pariksha Pe Charcha 2022 : विद्यार्थ्याने बनवले दूरवरून शरीराचे तापमान मोजायचे अनोखे उपकरण; पंतप्रधांनानी बोलवले चर्चेसाठी