सुरत: एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. बंडखोर आमदारांचा गट मध्यरात्री सुरत येथुन गुवाहटीला गेले आहेत. ते काय करणार आणि राज्याच्या सरकारचे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच महाराष्ट्राचे आणखी तीन आमदार सुरतमध्ये दाखल झाले ( 3 MLAs reached at Surat ) आहेत. सुरतमध्ये दाखल झालेले हे महाराष्ट्राचे तीन आमदार एकनाथ शिंदे याच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या 37 झाली आहे.
सध्यामहाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड ढवळुन निघाले आहे. कोणत्या क्षणाला काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभुमीवर आयोजित केलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सरकार बरखास्तीवर चर्चा होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना. प्रत्यक्ष बैठकीत मात्र प्रचंड निरुत्साह पाहायला मिळाला. शिवसेनेचा एकमेव मंत्री बैठकीत उपस्थित होता. उदय सामंत, दादा भुसे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिले.
संपूर्ण आमदारांची यादी - यातील संपूर्ण 34 आमदारांची नावे पुढील प्रमाणे शंभूराजे देसाई , अब्दुल सत्तार, बच्चू कडू, संदिपान भुमरे, प्रताप सरनाईक, सुहास कांदे, तानाजी सावंत, भरत गोगावले, यामिनी जाधव, अनिल बाबर, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, प्रकाश आबिटकर, संजय शिरसाट, श्रीनिवास वनगा, महेश शिंदे, संजय रायमुलकर, विश्वनाथ भोईर, सिताराम मोरे, रमेश बोरणारे, चिमणराव पाटील, लहुजी बापू पाटील, महेंद्र दळवी, प्रदीप जैस्वाल, महेंद्र थोरवे, किशोर पाटील, ज्ञानराज चौगुले, बालाजी किणेकर, उदयसिंह राजपूत, राजकुमार पटेल, लता सोनवणे, नितीन देशमुख, संजय गायकवाड, नरेंद्र मांडेकर. यांची संख्या पाहता भाजप पुरस्कृत सरकार स्थापन्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचे दिसून येते.
नवीन सरकारचे गणित - राज्यात सध्या 287 एकूण आमदार आहेत. बहुमतासाठी 144 आमदारांची गरज आहे. राज्यात भाजपकडे एकूण 113 आमदार आहेत. त्यामध्ये भाजपचे 106 आमदार आणि इतर मिळून त्यांचे एकूण संख्याबळ 113 वर जाते. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या फोटोतील आमदारांचा समावेश केल्यास त्यातील एकूण 34 आमदार जोडले तर त्यांची संख्या 147 होते. अर्थातच भाजप या सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करु शकते. मात्र एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जर शिवसेनेचे 37 आमदार नसतील तर त्यांचे पक्षांतर बंदी कायद्यानुसार सदस्यत्व रद्द होऊ शकते.
हेही वाचा -Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र विधानसभेवर बरखास्तीची टांगती तलवार; उद्धव ठाकरे देऊ शकतात राजीनामा