मुंबई -सध्या राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिकांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. ( Maharashtra monsoon rains Updates ) तसेच लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात पावसानं हाहाकार घातला आहे. काही जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोराचा पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
गडचिरोली जिल्ह्याला पुराचा फटका- गडचिरोली जिल्ह्यातील शेजारच्या तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक घर पाण्याखाली गेले आहेत. पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक भागात वीजपुरवठा ठप्प झाला आहे. विद्युत् पुरवठा करणाऱ्या तारांवर मोठ्या प्रमाणात कचरा अडकून पडला होता ( Maharashtra monsoon rains Updates ) आणि त्यात पुराचे पाणी ओसरत असले, तरी काही भागात अजून ही पाणी असल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून जीवघेणा प्रवास करत आहेत.
लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस -लातूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. जिल्ह्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. लातूर उदगीर मार्गाचे काम सध्या सुरु आहे. यामुळे काही ठिकाणी पर्यायी पूल बांधण्यात आले होते. कालपासून पडत असलेल्या पावसामुळे चांभरगा गावाजवळ लहान ओढ्यात पाणी आल्याने सिमेंटचे मोठे पाईप टाकून बांधण्यात आलेला पर्यायी पुल देखील वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात तुरळक पाऊस -बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसाने तुरळक हजेरी लावली होती. मात्र अकोला, अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसाने आणि जलाशयात होत असलेल्या विसर्गामुळे जिल्ह्यात पूर्णा नदीला आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील नांदुरा, जळगाव, जामोद दरम्यान असलेल्या येरळी पूल अजून देखील 10 फूट पाण्याखाली गेला आहे. ( Maharashtra monsoon rains Updates ) यामुळे गेल्या 3 दिवसांपासून नांदुरा- जळगाव जामोद- बुऱ्हाणपूर हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद होता.
औरंगाबाद शहरात जोराचा पाऊस - खुलताबाद तालुक्यात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. खुलताबाद तालुक्यात कसाबखेडा गाव आणि परीसरात झालेल्या पावसाने गावाजवळील पूल वाहून गेल्याने तब्बल 6 गावांचा संपर्क तुटला आहे. कसाबखेडा गावाशी माटेगाव,चांभारवाडी, देभेगाव, देवळाणा, पिंपळगाव या गावातील लोकांचा दैनदीन व्यवहार असल्यानं दररोजचा संपर्क आहे. कसाबखेडा परीसरातील अनेक शेतकरी शेतात वास्तव्यास आहेत. ( Maharashtra monsoon rains Updates ) गावात शाळा, बँक, दवाखाने आणि मोठी बाजारपेठ आहे. ( Maharashtra Monsoon updates ) कसाबखेडा परीसरातील शेतकरी आणि माटेगाव, चांभारवाडी, विटखेडा,देभेगाव ,देवळाना पिंपळगाव या गावातील लोकांची वर्दळ गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पुलावरुन होत असते. मात्र, मुसळधार पावसामुळं नळकांडी पूल वाहून गेला आहे.
वर्धा नदी आणि उपनद्यांना पूर - चंद्रपूर शहरात सिस्टर कॉलनी, रहेमतनगर सारख्या इरई नदीकाठच्या भागात पुन्हा पुराचे पाणी शिरले आहे. पाऊस नसताना वर्धा नदी आणि तिच्या उपनद्यांना पूर आला आहे. वर्धा- यवतमाळ जिल्ह्यात धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने वर्धा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. वरोरा तालुक्यातील सोईट ते गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा या गावापर्यंत पुराची स्थिती आहे.
हेही वाचा -MH Cabinet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी रद्द; नैसर्गिक आपत्तीचे संकट असतानाही मंत्रिमंडळाचा पेच कायम
हेही वाचा -Pune Indira Gandhi Market : पुणेकरांची गटारी फुल्ल जोशात; आखाडा निमित्त वनराज कोंबड्याची मार्केटमध्ये मागणी