मुंबई - सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. लातूरसह औरंगाबाद जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवस हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोराचा पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ( Maharashtra Monsoon Rains updates ) शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. तसेच लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस -लातूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. जिल्ह्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. लातूर उदगीर मार्गाचे काम सध्या सुरु आहे. यामुळे काही ठिकाणी पर्यायी पूल बांधण्यात आले होते. कालपासून पडत असलेल्या पावसामुळे चांभरगा गावाजवळ लहान ओढ्यात पाणी आल्याने सिमेंटचे मोठे पाईप टाकून बांधण्यात आलेला पर्यायी पुल देखील वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. नरसिंगवाडी पाटी येथील पर्यायी पूल पावसामुळे वाहून गेला आहे. ( Maharashtra Monsoon Rains updates ) यामुळे हा रस्ता बंद आहे. या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे उदगीरसह चामरगा, बावलगाव, जंगम वाडी, वेरूळसह अनेक गावाचा संपर्क तुटला आहे.