महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Monsoon Session पावसाळी अधिवेशनाचा तिसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा आक्रमक होणार - Maharashtra legislative Assembly

Maharashtra Monsoon Session पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून आजही विरोधक सत्ताधारी पक्षावर आक्रमक होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले होते. Maharashtra legislative Assembly त्याच प्रकारे आजही विरोधक आक्रमक होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा देऊन खेळाडू कोठ्यातून 5 टक्के आरक्षणात नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Monsoon Session
Maharashtra Monsoon Session

By

Published : Aug 22, 2022, 8:40 AM IST

Updated : Aug 22, 2022, 9:23 AM IST

मुंबईपावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून आजही विरोधक सत्ताधारी पक्षावर आक्रमक होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले होते. त्याच प्रकारे आजही विरोधक आक्रमक होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा देऊन खेळाडू कोठ्यातून 5 टक्के आरक्षणात नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. Maharashtra legislative Assembly मात्र, हा निर्णय कोणतेही निकष न लावता घेतला गेला आहे. त्यामुळे या विरोधात आपण सरकारला जाब विचारणार आहोत असा इशारा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर आज सभागृहात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच विरोधकांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करण्यात आली होती. यासोबतच राज्यभरात रस्त्याची राज्यभरात झालेली दुरवस्था या मुद्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची पंचाईतपालघर जिल्ह्यामध्ये हत्तीरोगाचा प्रसार होण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या बाबत मंत्र्यांनी याबद्दल ठोस माहिती द्यावी, अशी मागणी केली गेली. विरोधकांच्या प्रश्नांवर तानाजी सावंत उत्तर देताना नाकीनऊ झाले होते. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले . कारण आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना याबद्दलचे ठोस उत्तर देता आले नाही. त्यामुळे या प्रश्नाला तात्पुरता बाजूला ठेवावे लागले . या घटनेनंतर बीड जिल्ह्यामधील स्त्री भृण हत्या या समस्यावर विरोधकांनी भारती लव्हेकर यांना लक्ष केलं. स्त्री भ्रूण हत्येसाठी बीड जिल्हा प्रसिद्ध असल्याचं विधान आमदार भारतीय लवेकर यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांना विरोधकांना सामोर जावं लागलं.

तसेच बीड जिल्ह्यातील अबेकायदा धंद्याच्या संदर्भात पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपती पदाची निवड झाल्याबद्दल अभिनंदन याचा ठराव मांडला तसेच जगदीप धनगर यांचेही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल अभिनंदन याचा ठराव मांडला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच अभिनंदन केलं . तसेच पावसाळी अधिवेशनाच्या प्रथम दिवशी २५ हजार ८२६ कोटीं रुपयांच्च्याया पुरवणी मागण्या शासनाच्या वतीने सादर करण्यात आल्या आहेत.

शिंदे फडणवीस शासनाचं पहिलं पावसाळी अधिवेशनराज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा देखील शासनाने केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हे शासन प्रति हेक्टर १३ हजार ६० ० रुपये मदत करणार असल्याची घोषणा देखील विधिमंडळ अधिवेशनात केली गेली. शेतकऱ्यांना ही मदत कधी मिळणार याबद्दल तसेच शेतकऱ्यांच्या इतर समस्यांवर सार्वजनिक रस्त्यांची दुरावस्था आणि जनतेच्या इतर मुलभूत विषयांवर विरोधक सरकारला अडचणीत आणू शकतात. शिंदे फडणवीस शासनाचं पहिलं पावसाळी अधिवेशन हे 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे.

आज सभागृहात चर्चाअधिवेशनाच्या गेल्या दोन दिवसात राज्यातील विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली जात नाही असा आरोप सातत्याने विरोधकांकडून दोन्ही सभागृहात करण्यात येत आहे. तसेच रायगड मधील हरिहरीश्वर येथील समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या बोटीत एके 47 रायफल सापडल्या. पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाच्या प्रादुर्भावावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना उत्तर देता आले नव्हते. Maharashtra legislative Assembly त्यामुळे याबाबत राज्य सरकारकडून आज माहिती सभागृहात ठेवण्यात येईल. बीड जिल्ह्यात सुरू असलेली स्त्री भ्रूण हत्या प्रकरणावरील आज सभागृहात चर्चा होईल. गेल्या दोन दिवस सभागृहात विरोधक या मुद्द्यावर आक्रमक होत आहेत. त्यामुळे आजही हे मुद्दे घेऊन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

पंन्नास खोके...एकदम ओके, विरोधकांची घोषणाबाजीराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांंडत सरकार विरोधी घोषणाबाजी केली. Maharashtra Monsoon Session शेतकरी, कायदा सुव्यवस्था बरोबरच विरोधकांच्या निशाण्यावर होता, Shinde government शिंदे गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. 39 आमदारांना फोडून सुरत व्हाया गुवाहाटी गाठले. दरम्यान, आमदारांना 50 कोटी रुपये दिल्याची जोरदार चर्चा रंगली. विरोधकांनी हाच धागा पकडून शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.

पूरस्थिती भागातील शेतकऱ्यांना सरकारची मदतअधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारच्या कार्यपध्दतीचा निषेध व्यक्त केला. बंडखोर शिंदे गटावरही गद्दारांना भाजपची वाटी, चलो गुवाहाटी चलो गुवाहाटी, फिट्टी फिट्टी चलो गुवाहाटी अशा घोषणा दिल्या. तसेच दादागिरी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी, ईडी सरकार हाय हाय, लोकशाहीचा खून करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आदी घोषणा देण्यात आल्या. अतिवृष्टी, पूरस्थिती भागातील शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळायला हवी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गद्दार पडले, गद्दार पळाले -सकाळच्या सत्रातील विधीमंडळाच्या कामकाजाला आलेल्या बंडखोर शिंदे गटाचे आमदारांची महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी टर उडवली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ, संजय गायकवाड, संदीपान भूमरे, गुलाबराव पाटील आदी नेते विधिमंडळात आले असता, गद्दार आले, गद्दार आले अशी घोषणा विरोधकांनी दिली. तर पायऱ्यांवरील आंदोलन पाहून मुख्यमंत्री गेटकडून सभागृह गाठणाऱ्या आमदारांना गद्दार पळाले, अशी जोरदार खिल्ली उडवली. तर यामिनी जाधव यांच्या प्रवेशावेळी ईडी, ईडीचे सूर लावून धरले.

हेही वाचाShiv Sena Plea शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज फैसला की पुन्हा लांबणीवर

Last Updated : Aug 22, 2022, 9:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details