मुंबई -शाळांच्या वेळा, दिवाळी व उन्हाळी सुट्ट्या तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्याचे कोणतेही अधिकार नसतांना मंत्रालयातील अधिकारी सर्रास परिपत्रके काढतात. हे अधिकारी नियमबाह्य काम करीत असल्याचा आरोप भाजपा शिक्षण आघाडीने लावला ( Ministry Officer Interference Board Education ) आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकांना कसे थांबवणार? -
भाजपा शिक्षण आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे म्हणाले की, शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ, समाप्ती, दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्याबाबत राज्याचे शिक्षण संचालक दरवर्षी घोषणा करीत असतात. मात्र, शिक्षण उपसचिवांनी शाळांच्या वेळा व परीक्षांच्या बाबतीत दोन दिवसांपूर्वी परिपत्रक काढून राज्यभर गोंधळ व संभ्रम निर्माण केला आहे. स्थानिक परिस्थिती, पाण्याचा प्रश्न, लोडशेडिंग वाढत्या तापमानात एप्रिलमध्ये विद्यार्थी दिवसभर शाळेत बसतील कसे ? याचा साधा विचारही केलेला दिसत नाही. अनेक पालकांनी गावी जाण्यासाठी रेल्वे गाड्यांचे आरक्षण करून ठेवले असून, त्या पालकांना कसे थांबवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.