मुंबई -'पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जयघोष करणार, त्याला या देशाचे नागरिकत्व मिळेल. त्यासोबतच पद्मश्रीसारख्या पुरस्कारानेही सन्मानित केले जाईल. हाच मोदींचा खरा चेहरा आहे. त्यामुळे गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देऊन भारतीयांचा अपमान करण्यात आला आहे' असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
हेही वाचा...ग्रॅमी अवार्ड्स २०२० : लेडी गागा, बेयॉन्से यांची पुरस्कारावर मोहोर; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
मुळ पाकिस्तानी गायक अदनान सामी यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत अनेक पक्षांकडून आणि नेत्यांकडून विरोध दर्शवला जात आहे. नरेंद्र मोदी आणि भाजप ज्यांचा विचार करते त्या पाकिस्तानी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळते आणि अशा व्यक्तीला पद्मश्रीने सन्मानित केले जाते. मात्र, आपण भारतीय असूनही आपल्याला भारतीय असल्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा... काँग्रेसने मोदींना पाठवले संविधान; पेमेंट ऑप्शन 'कॅश ऑन डिलीव्हरी'
'तुम्ही भाजप सरकारच्या विरोधात असाल तर तुमचा सन्मान नाही. तर तुम्हाला मारहाण केली जाईल. आता पाकिस्तानी कलाकाराला नागरिकत्व देवून पद्मश्री दिल्यानंतर मोदींचा खरा चेहरा समोर आला आहे' असेही नवाब मलिक यांनी सांगितलेआहे. तसेच अदनान सामी यांना दिलेला पद्मश्री पुरस्कार हा देशातील जनतेचा अपमान आहे, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.