मुंबईराज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. एमपीएससी बोर्ड प्रक्रिया ही वेळकाढू असल्याने महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिस कमिशनद्वारे Maharashtra Medical Service Commission filled the Recruitment रिक्तपदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत Medical Education Minister Girish Mahajan केली. दहीहंडीच्या आरक्षणावरुन एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे. आता सरकारच्या नव्या निर्णयाने त्यांची डोकेदुखी पुन्हा वाढणार आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागात रिक्त पदे राज्य वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामार्फत सुरु झालेल्या महाविद्यालयात डॉक्टरांची पदे भरली जात State Department of Medical Education and Research not filled Recruitment नाहीत. वैद्यकिय शिक्षकांत तीव्र नाराजी Medical Teachers Aggressive आहे. औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमसीआय आणि एनएमसीच्या माध्यमातून डॉक्टरांची प्रतिनियुक्तीने पदभरती केली आहे. घाटीमध्येही अशाच प्रकारे रिक्त पदे भरली जात आहेत. सरकारने नव्याने होणाऱ्या महाविद्यालयात प्रतिनियुक्तीवर डॉक्टर न देता, सरळ सेवा भरती आस्थापना मंडळ आणि स्थानिक निवड मंडळामार्फत भरावी, अशी मागणी आमदार रमेश कराड यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला केली. आमदार नागोराव गाणार, चंद्रशेखर बावनकुळे, भाई गिरकर, निरंजन डावकरे, प्रवीण दटके, रमेश पाटील, प्रविण दरेकर, परिणय फुके आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही वैद्यकीय शिक्षण विभागातील कारभाराची पोलखोल केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देत, गोविंदांना पाच टक्के नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. एमपीएससी विद्यार्थ्यांची या निर्णयाविरोधात आंदोलने सुरु आहेत. विरोधकांनी याच निर्णयाचे दाखले देत, राज्य सरकारवर विधान परिषदेत जोरदार टीका केली. वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.