महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

#coronavirus : आज राज्यात तब्बल 162 कोरोनाबाधितांची नोंद; एकूण आकडा 1297 वर - कोरोना रुग्ण

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग आता वेगाने होताना दिसत आहे. मंगळवारीच राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हजारच्या पार गेला होता. त्यात आता सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

corona
कोरोना

By

Published : Apr 9, 2020, 11:46 AM IST

मुंबई - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सातत्याने वाढतच आहे. आज राज्यात एकूण 162 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 1297 झाला आहे. यात सर्वाधिक रुग्ण 143 हे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आढळले आहेत.

हेही वाचा...महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात आज 162 नवे कोरोनाबाधित रुग्ण

मुंबई - 143

पुणे - 3

यवतमाळ - 1

औरंगाबाद - 3

पिंपरी-चिंचवड - 2

ठाणे कार्पोरेशन - 1

नवी मुंबई - 1

कल्याण-डोंबिवली - 4

मीराभाईंदर -1

वसई विरार - 1

सिंधुदुर्ग - 1

एकूण - 162

ABOUT THE AUTHOR

...view details