महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

#Coronavirus : राज्यात आज 117 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, तर 8 जणांचा मृत्यू; मृतांचा एकूण आकडा 72 - महाराष्ट्र कोरोना

#MAHARASHTRA CoronaVirus/Lockdown Live
#MAHARASHTRA CoronaVirus/Lockdown Live

By

Published : Apr 8, 2020, 10:19 AM IST

Updated : Apr 8, 2020, 8:37 PM IST

19:48 April 08

राज्यात आज 117 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तर 8 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा 72 वर

मुंबई - राज्यात आज 117 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या 117 नवीन रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1135 झाला आहे. तर आज राज्यात 8 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत व्यक्तींची संख्या 72 झाली आहे.

19:45 April 08

मुंबईत आज एकूण 106 नवीन कोरोनाबाधित तर 5 रुग्णांचा मृत्यू

मुंबई - शहरात आज नव्याने 106 नवीन कोरोना रुग्ण आढळल्याने शहरातील एकूण रुग्णांची संख्या 696 झाली आहे. तसेच आज 5 जणांचा मृत्यू  झाल्याने शहरातील एकूण मृतांची संख्या 45 झाली आहे.

19:44 April 08

गावबंदीसाठी लावलेले बॅरिकेट्स काढणाऱ्या पोलीस पाटलावर हल्ला; कोल्हापूरातील साळगावातील घटना

कोल्हापूर - गावबंदीसाठी रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स काढणाऱ्या पोलीस पाटलावर हल्ला. जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील साळगाव येथील घटना.  गावातीलच संभाजी गावडे यांनी पोलीस पाटील सूर्यकांत पाटील यांच्या डोक्यात घातला दगड.

18:02 April 08

पुण्यात कोरोनाचे 3 नवे बळी; शहरात दिवसभरात एकूण 8 जणांचा मृत्यू

पुणे -  शहरात आज आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील मृतांची संख्या 16 वर पोचली असून त्यापैकी आज 8 मृत्यूची नोंद झाली आहे.

17:37 April 08

औरंगाबादेत सर्व ठिकाणी आज सायंकाळपासून संचारबंदी

औरंगाबाद - शहरात आज सायंकाळपासून संचारबंदी लागू होणार. सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. या दरम्यान मेडिकल व्यतिरिक्त सर्व सेवा बंद राहणार आहे.

17:27 April 08

केईम रुग्णालयातील 50 वर्षीय महिला कर्मचारीला कोरोनाची लागण

मुंबई - महापालिकेच्या केईएम रुग्णालयामधील एका 50 वर्षीय महिला कर्मचारीला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला रुग्णालयात आया म्हणून काम करत होती. तसेच ती धारावी येथे वास्तव्यास होती.

16:12 April 08

मंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक, मास्क नसल्यास होणार अटक

मुंबई -शहरात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता गेल्यास अटक होणार असल्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

16:12 April 08

ठाणे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 114

ठाणे - जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 114 वर पोहचली आहे. तर ठाणे महापालिका हद्दीत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 24 वर पोहचली आहे.

13:30 April 08

8 विदेशी तबलिगींवर नागपूरात गुन्हे दाखल

नागपूर - परदेशातून आलेल्या आठ ताबलिगींवर नागपूरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्वजण म्यानमार येथून आले होते. शहरातील मोमीनपूरा भागातील लाल मस्जिद मधून त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे.

13:28 April 08

पुण्यात 24 तासात कोरोनाचे 5 नवे बळी, एकूण संख्या 13 वर

पुणे - जिल्ह्यात 24 तासात  कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या बळींची संख्या आता 13 झाली आहे. आज ससून रुग्णालयातील तिघांचा, नोबल हॉस्पिटलमधील एकाचा तर नायडू रुग्णालयातील एक रुग्णाचा, अशा पाच जणांचा मुत्यु झाला आहे.

12:38 April 08

अकोल्यात आढळला कोरोनाचा दुसरा रुग्ण

अकोला - जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आज 2 वर पोहोचली आहे. अकोट फाइल या परिसरात आज एक नवीन कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. प्रशासनाकडून हा परिसर सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

12:20 April 08

वांद्रे येथील भाभा रुग्णालयातील 15 कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाईन

मुंबई - वांद्रे जवळील भाभा रुग्णालयातील 15 कर्मचाऱ्यांचे क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

11:22 April 08

राज्यात अचानक 60 रुग्णांची वाढ, एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1078

मुंबई -  राज्यात पुणे 9, अहमदनगर 1, मुंबई 44, नागपूर 4, अकोला 1, बुलडाणा 1 मध्ये एकूण 60 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे नवीन 60 रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 1078 वर पोहचला आहे.

09:57 April 08

पुण्यात आणखी एक कोरोना बळी; शहरात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू

पुणे - शहरात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या आता 9 झाली आहे. पुण्यात 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये प्रथमच एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात आतापर्यंत 150 रुग्ण असून, नायडू हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या प्रवेशाची क्षमता संपली आहे.

09:45 April 08

जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात देखील करोनाबाधितांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढतच आहे.

मुंबई - जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढतच आहे. महाराष्ट्रात देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने परिस्थिती काळजी करण्यासारखी बनली आहे. त्यामळे कदाचीत १४ एप्रिलनंतरही राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

Last Updated : Apr 8, 2020, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details