महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात आज तब्बल 120 नवीन कोरोनाग्रस्त तर 7 रुग्णांचा मृत्यू; राज्यातील एकूण रुग्ण संख्या 868 वर - लॉकडाऊन

maharashtra live news CoronaVirus Lockdown Live Update
maharashtra live news CoronaVirus Lockdown Live Update

By

Published : Apr 6, 2020, 10:46 AM IST

Updated : Apr 6, 2020, 8:45 PM IST

20:18 April 06

राज्यात आज तब्बल 120 नवीन कोरोनाग्रस्त तर 7 रुग्णांचा मृत्यू; राज्यातील एकूण रुग्ण संख्या 868 वर

मुंबई - राज्यात आजपर्यंत एकूण 66 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज (सोमवार दि. 6 एप्रिल) 120 नवी रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. तसेच 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 868 झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 52 झाली आहे.

दिनांक 6 एप्रिल 2020 : राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई 526 34
2 पुणे (शहर आणि ग्रामीण भाग) 141 5
3 सांगली 25 0
4 मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा आणि जिल्हे 85 9
5 अहमदनगर 23 0
6 नागपूर 17 0
7 औरंगाबाद 10 1
8 लातूर 8 0
9 बुलडाणा, सातारा प्रत्येकी 5 1(बुलडाणा)
10 यवतमाळ 4 0
11 उस्मानाबाद 3 0
12 कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, नाशिक प्रत्येकी 2 1(जळगाव)
13 सिंधुदुर्ग, गोंदिया, वाशिम, अमरावती, हिंगोली, जालना प्रत्येकी 1 1(अमरावती)
14 इतर राज्य 2 0
  एकूण 868 52

19:46 April 06

राज्यात आज तब्बल 120 नवीन कोरोनाग्रस्त ; एकूण रुग्ण संख्या 868 वर

मुंबई - राज्यात आज एकूण 120 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 868 झाली आहे.

राज्यात पुढील ठिकाणी आढळले कोरोना रुग्ण :

पुणे - 41, मुंबई - 68, सातारा - 2, अहमदनगर - 2, जालना - 1, औरंगाबाद  - 3, वसई-विरार - 2, नाशिक  - 1.... एकूण 120

18:26 April 06

मुंबईत 24 तासात कोरोनाचे 57 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू

मुंबई -शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 57 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आता कोरोनाचे एकूण 490 रुग्ण झाले आहेत. तर 34 जणांचा मृत्यू झाला आहे.

17:28 April 06

कोल्हापूरमध्ये 786 जणांचे संस्थात्मक अलगीकरण ; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

कोल्हापूर - जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 209 तर परराज्यातील 577 नागरिक. एकूण 786 जणांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तसेच राज्यात आणखीन 8 निवारागृहे तयार करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.

17:28 April 06

खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे डब्यांचे रूपांतर आयसोलेशन सेंटर

पुणे -बाहेरील देशातील परिस्थिती पाहता कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी रुग्णालये अपुरी पडत आहेत. भारतातही अशीच परिस्थिती निर्माण झाली तर रुग्णांची हेळसांड होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे डब्याचे रूपांतर आयसोलेशन सेंटरमध्ये करण्यात आले आहे. पुणे विभागात रेल्वेच्या 50 डब्ब्यांमध्ये आयसोलेशन सेंटर तयार करण्यात येणार आहेत. पुणे रेल्वे विभागाच्या घोरपडी यार्डात हे काम सुरू आहे.

16:03 April 06

कोल्हापूर शहरातील एका महिलेला कोरोना विषाणूची लागण

कोल्हापूर -जिल्ह्यात आणखी एका रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोल्हापूर शहरातील महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे., त्यामुळे कोल्हापुरात आता तिघांना कोरोनाची लागण झाली आहे.

16:03 April 06

सांगलीत आणखी एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

सांगली -  इस्लामपूर मध्ये आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. इस्लामपूर मधील कोरोना बाधित कुटूंबाच्या संपर्कात आल्याने या महिलेला मागील काही दिवसापासून प्रशासनाने होम क्वारंटाईन केले होते. या महिलेची कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने सांगलीचा कोरोनाबाधितांचा आकडा झाला 22 झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.

13:00 April 06

'ते' पत्र खोटे असल्याचा केईएम रुग्णालय प्रशासनाचा दावा

मुंबई - महापालिकेच्या केईएम रुग्णालयात सेफ्टी किट नसल्याने रुग्णालयाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन एका पत्राद्वारे करण्यात आले. मात्र, हे पत्र खोटे असून असे कोणतेही आवाहन पालिकेने केले नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

13:00 April 06

राजीवडा खाडी किनारी क्षेत्रात मासेमारी केल्याबद्दल सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी - कोरोना रुग्ण सापडलेल्या राजीवडा भागातील आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंटेंटमेंट आणि बफर झोन जाहीर केलेल्या राजीवडा खाडी किनारी क्षेत्रात मासेमारी केल्याबद्दल नौका चालकासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल.

11:07 April 06

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला ; एकूण रुग्णसंख्या 781

पुणे -19, मुंबई - 11, सातारा, वसई आणि अहमदनगर प्रत्येकी एक 1 कोरोनाबाधित रुग्ण. एकूण 33 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 781 वर पोहचली आहे.

10:56 April 06

नाशिकमध्ये सफाई कर्मचारी पत्नीला कामावर घेऊन जातांना 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

नाशिक - शहरात सफाई कर्मचारी पत्नीला कामावर घेऊन जातांना 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. पोलीस बेरिकेटिंगच्या दोरखंडाला अपघात झाल्याने सफाई कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. किशोर चव्हाण असे माजी सफाई कर्मचाऱ्याचे नाव असून पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज पहाटे 5 वाजता पंचवटी फुलेनगर येथील शनी मंदिराजवळ हा अपघात घडला आहे.

10:52 April 06

औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयातील एक पुरुष परिचारकचा कोरोना चाचणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह

औरंगाबाद : शासकीय रुग्णालयातील एक पुरुष परिचारक याचा कोरोना चाचणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. अपघातात विभागात कार्यरत असलेल्या या पुरुष परिचारकाला कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी मिनी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची डीन डॉ. कानन येळीकर यांची माहिती.

10:24 April 06

चित्रपट निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजा ईरानीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

मुंबई - चित्रपट निर्माते करीम मोरानीची मुलगी शजा ईरानी हीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह. नानावटी रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल. कुटुंबातील इतर लोकांचीही तपासणी कली जाणार आहे.

10:22 April 06

राज्यात आजपर्यंत एकूण 66 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज (सोमवार) 120 120 कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 868 वर गेला आहे.

मुंबई - एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे केंद्रासोबतच विविध राज्यांच्या चिंतेत भर पडली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने परिस्थिती काळजी करण्यासारखी बनली आहे. त्यामळे कदाचीत १४ एप्रिलनंतरही राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

Last Updated : Apr 6, 2020, 8:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details