महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Breaking News : धारावीत प्रसिद्ध कबड्डीपटूची डोक्यात स्टम्प घालून हत्या; तिघांना अटक - Maharashtra update news

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Jul 24, 2022, 6:43 AM IST

Updated : Jul 24, 2022, 6:25 PM IST

18:25 July 24

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक

कोल्हापूर :भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली (सातारा, आजरा) व त्यांचा परिवार आहे.

15:27 July 24

धारावीत प्रसिद्ध कबड्डीपटूची डोक्यात स्टम्प घालून हत्या; तिघांना अटक

धारावीतील कामराज नगर येथील कबड्डीपटूची शुक्रवारी सायंकाळी पूर्व वैमनस्यातून हत्या करण्यात आली. मृत विमलराज नाडर असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी मल्लेश चितकंडी (32) याला या हत्येप्रकरणी अटक केली आहे. धारावी पोलीस ठाण्याबाहेर शेकडो लोकांनी येऊन निदर्शने केली.

15:27 July 24

13:53 July 24

... पण एवढा मोठा घोडा होऊनही अजूनही कळत नाही ..अभिनेता शरद पोक्षे यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अभिनेता शरद पोंक्षे यांनी टीका केली आहे. शाळेतील मुलांना सावरकर कळतात. पण एवढा मोठा घोडा होऊनही अजूनही कळत नाही, अशी टीका अभिनेता शरद पोक्षे यांची राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

13:47 July 24

द्रौपदी मुर्मू जी, आरे वाचवा, आदिवासींची घरे वाचवा?

मुंबई - आरेतील मुंबई मेट्रो कारशेडवरची स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली. माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत अखेर आता पुन्हा आरेमध्ये कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला. तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानं कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. पण या कारशेडला पर्यावरण प्रेमींचा विरोध कायमच आहे. आरेतच मेट्रो कारशेड होणार, असं आता राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

13:47 July 24

येवल्यात युवासेनेला धक्का...50 पदाधिकारी शिंदे गटात प्रवेशासाठी रवाना

येवल्यात युवासेनेला धक्का...50 पदाधिकारी शिंदे गटात प्रवेशासाठी रवाना

येवला ( नाशिक ) -मुंबई बरोबर आता ग्रामीण भागातही शिंदे गटाचे वर्चस्व होत असल्याचे बघायला मिळत आहे. आज येवला तालुक्यातील युवा सेनेचे 50 ते 55 पदाधिकारी व कार्यकर्ते हे शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई येथे रवाना झाले आहे.

12:33 July 24

सैन्याने नेहमीच देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले-राजनाथ सिंह

देशसेवेसाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले त्यांना स्मरण राहील. आपल्या सैन्याने नेहमीच देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. 1999 च्या युद्धात आपल्या अनेक शूर सैनिकांनी आपले प्राण दिले, मी त्यांना नमन करतो, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मूमध्ये म्हटले आहे. कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी करण्यासाठी ते जम्मू दौऱ्यावर आले आहेत.

12:32 July 24

राष्ट्रपतींनी महात्मा गांधींना वाहिली आदरांजली

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 25 जुलै रोजी भारताच्या राष्ट्रपतीपदाचा पदभार सोडण्यापूर्वी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

12:30 July 24

अमित ठाकरे ठाण्यातील महासंपर्क दौऱ्यानिमित्त ठाण्यात दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे ठाण्यातील महासंपर्क दौऱ्यानिमित्त ठाण्यात दाखल

आज ठाण्यातील मनविसेच्या हजारो कार्यकर्त्यांसोबत संघटन बांधणीवर संबोधित करणार

12:00 July 24

अग्निवीर एअरफोर्स भरती परीक्षा कडेकोट बंदोबस्तात सुरू

अग्निवीर एअरफोर्स भरती परीक्षा कडेकोट बंदोबस्तात सुरू झाली आहे.

11:58 July 24

भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेची बैठक आज दिल्लीत होणार बैठक

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा लवकरच दिल्लीत भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

11:55 July 24

अर्पिता मुखर्जीला आज न्यायालयात केले जाणार हजर

पश्चिम बंगालचे कॅबिनेट मंत्री आणि माजी शिक्षण पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जीला आज बँकशाल न्यायालयात हजर केले जाईल. आज ईडीकडून कोठडी मागण्यात येणार आहे. ईडीने तिच्या घरातून २० कोटी रुपये जप्त केले आहेत.

11:53 July 24

दक्षिणी नौदल कमांडच्या जवानांनी समुद्रात बुडणाऱ्याचे वाचविले प्राण

दक्षिणी नौदल कमांडच्या फास्ट इंटरसेप्टर क्राफ्टने (एफआयसी) काल रात्री कोचीमध्ये एका व्यक्तीला बुडण्यापासून वाचवले. तो वेंदुरुती पुलावरून खाली पडला होता. तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याच्यावर सीपीआर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याला सिव्हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

11:45 July 24

दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला!

दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने पुष्टी केली. रुग्ण हा 31 वर्षांचा आहे.

10:38 July 24

राष्ट्रकुल स्पर्धेत मी माझी सर्वोत्तम कामगिरी करेन- नीरज चोप्रा

राष्ट्रकुल स्पर्धेत मी माझी सर्वोत्तम कामगिरी करेन, असे भारताच्या नीरज चोप्रा याने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर बोलताना सांगितले.

10:19 July 24

नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे केले अभिनंदन

आमच्या सर्वात प्रतिष्ठित खेळाडूंपैकी एकाने केलेली एक उत्तम कामगिरी! WorldChampionships मध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरजचे अभिनंदन. भारतीय खेळांसाठी हा खास क्षण आहे. नीरजला त्याच्या आगामी यशासाठी शुभेच्छा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे.

10:13 July 24

आमच्या लाऊडस्पीकरपुढे तुमच्या पिपाण्या टिकणार नाहीत-संजय राऊत

आदित्य ठाकरेनंतर उद्धव ठाकरे राज्यात दौरा करणार आहेत. देवेंद्र फडणवीस तुमची कारस्थाने माहित आहेत. आमच्या लाऊडस्पीकरपुढे तुमच्या पिपाण्या टिकणार नाहीत. भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, तरी चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन आहे. शिंदे-भाजप हे सरकार फार टिकणार नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या जे पोटात मळमळत होते, तेच त्यांच्या ओठात आले आहे, असेही ते म्हणाले.

09:40 July 24

नीरज चोप्राच्या गावी विजयाचा आनंद साजरा

नीरज चोप्राच्या पानिपत येथील त्याच्या गावी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याचा आनंद साजरा होत आहे.

09:06 July 24

पाथरवाला उच्च पातळी बंधाऱ्यातून ५५३३ क्यूसेकने विसर्ग

जालना- पाथरवाला उच्च पातळी बंधाऱ्यातून गेट १ पुर्ण उचलण्यात आले असून ५५३३ क्यूसेकने विसर्ग शनिवारी करण्यात आला आहे. सध्या पाणी पातळी ४२०.०० मी आहे. सध्या नाशिक आणि इतर नाथसागराच्या धरण क्षेत्रात पावसाची संत धार सुरूच आसल्याने गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा ओघ सुरुच आसल्याने जायकवाडी धरण ८५ टक्केहून भरले आहे. धरणातून विसर्ग सुरुच आहे. यातून विसर्ग होणारे पाणी पुढे जालन्याच्या दिशेने येत आहे. या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पाथरवाला उच्च पातळी बंधाऱ्यातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

09:05 July 24

वाघोलीतील सराईत गुन्हेगार सागर उर्फ दादा विश्वास लोंढे तडीपार

पुणे- वाघोली भागात बेकायदेशीररीत्या गावठी दारू विकणाऱ्या सराईताला पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. आरोपी या भागात हातभट्टीची दारू विक्री करतानाच नागरिकांना त्रास देऊन दहशत निर्माण करीत होता. सागर उर्फ दादा विश्वास लोंढे (२६, रा. वाघोली) असे तडीपार करण्यात आलेल्याचे नाव आहे. लोंढे सराईत गुन्हेगार आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली बाजारतळ परिसरात तो गावठी दारू विक्री करून नागरिकांना वारंवार त्रास देत होता. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे लोकांच्या मनात कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवू नये तसेच, सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने लोंढे याच्यावर कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे यांच्यावतीने वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहीदास पवार यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार लोंढे याला एक वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

08:19 July 24

जागतिक अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरज चोप्राने मिळविले रौप्य पदक

जागतिक अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या मने पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत 88.13 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकून दुसरे स्थान मिळवले आहे.

08:10 July 24

कारगिल विजय दिवस आज होणार साजरा, राजनाथ सिंह आज जम्मूच्या दौऱ्यावर जाणार

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज 'कारगिल विजय दिवस' निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जम्मूला जाणार आहेत.

08:04 July 24

पदावरून निवृत्त होताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज देशाला संबोधित करणार

राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपत असताना रामनाथ कोविंद आज देशाला संबोधित करणार आहेत.

07:49 July 24

नीरज चोप्राची 86.37 मीटर अंतरावर भालाफेक

जागतिक अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या नीरज चोप्राने 86.37 मीटरची भालाफेक केली आहे. तर भारताचा दुसरा थ्रोअर रोहित यादवने पुरुषांच्या भालाफेकीच्या फायनलमध्ये तिसऱ्या प्रयत्नात 78.72 मीटरचा भालाफेक केली आहे.

06:57 July 24

बंगालमधील प्रत्येकाला याची माहिती होती- अधीर रंजन चौधरी

बंगालमधील प्रत्येकाला याची माहिती होती, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल नेते पार्थ चॅटर्जींच्या अटकेवर दिली होती.

06:55 July 24

झारखंडमध्ये पोलिसांनी जप्त केला मोठा शस्त्रसाठा

झारखंड राज्यातील लातेहार जिल्ह्यातील विविध भागातून पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.

06:53 July 24

मध्यप्रदेशात शाळेच्या आवारात मुलीवर बलात्कार

मध्यप्रदेशात शाळेच्या आवारातच एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपी त्या शाळेत बॉडीगार्ड म्हणून काम करतो. त्याची ओळख पटवून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती भोपाळचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सचिन अतुलकर यांनी सांगितले.

06:50 July 24

शेकडो निराधार आणि मतिमंद लोकांची मानवी तस्करीतून सुटका

नेक स्वयंसेवी संस्थांसह मानव तस्करीविरोधी पथकाने शेकडो निराधार आणि मतिमंद लोकांची कोईम्बतूर शहरातून सुटका केली आहे. हे लोक रस्त्यावर पडलेले होते.

06:49 July 24

पंजाबमध्ये ड्रग्जचे गोडाऊन जप्त

पंजाब पोलिसांनी 2 ड्रग्ज तस्करांना पकडले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले. सहारनपूरमधील त्यांचे गोडाऊनही जप्त करण्यात आल्याची माहिती रूपनगर रेंजचे डीआयजी गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी सांगितले.

06:25 July 24

Maharashtra Breaking News : ... पण एवढा मोठा घोडा होऊनही अजूनही कळत नाही ..अभिनेता शरद पोक्षे यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

मुंबई- कोरोनाच्या संकटानंतर जगाला पुन्हा आणखी विषाणुच्या संकटाला जावे लागणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस ( Tedros Adhanom Ghebreyesus ) यांनी मंकीपॉक्सबाबत जगभरातील देशांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, यावर्षी पालघरमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला होता. ( हे लाईव्ह पेज दिवसभरात अपडेट होणार आहे. )

Last Updated : Jul 24, 2022, 6:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details