महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Breaking News Live : पावसाशी संबंधित घटनांमुळे एकूण 76 जणांचा मृत्यू - राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग - आषाढी वारी

महाराष्ट्र लाईव्ह अपडेट
Maharashtra live update

By

Published : Jul 10, 2022, 6:11 AM IST

Updated : Jul 10, 2022, 5:07 PM IST

17:05 July 10

निर्णय देणे हा न्यायपालिकेचा अधिकार, त्यावर कोणाचाही प्रभाव पडू नये - नितीन गडकरी

नागपूर - मी अनेकदा पंतप्रधान मोदी आणि कायदा मंत्र्यांना म्हणतो की निर्णय काहीही असो, निर्णय देणे हा न्यायपालिकेचा अधिकार आहे आणि त्यावर कोणाचाही प्रभाव पडू नये - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

15:59 July 10

पावसाशी संबंधित घटनांमुळे एकूण 76 जणांचा मृत्यू - राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग

महाराष्ट्रात 1 जून 2022 पासून आतापर्यंत पावसाशी संबंधित घटनांमुळे एकूण 76 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत 76 पैकी 9 जणांचा मृत्यू झाला: राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग

838 घरांचे नुकसान झाले आहे आणि 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, आपत्ती एमजीएमटी विभाग आणि पुनर्वसन विभागाने 35 मदत शिबिरे स्थापन केली आहेत. 1 जून 2022 पासून महाराष्ट्रात पाऊस/पूर-संबंधित घटनांमध्ये 125 प्राण्यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे: राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग

14:10 July 10

कळसुबाई शिखरावर अडकलेले सर्व पर्यटक सुखरूप; सर्वांची करण्यात आली सुटका

कोले तालक्यातील आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णवंती नदीला आलेल्या पुरामुळे काल शनिवारी अनेक पर्यटक अडकले होते. पोलिस आणि स्थानिक युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

13:40 July 10

विधिमंडळ सचिवांची ठाकरे गट व शिंदे गट या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस

मुंबई - विधानसभेतील १६ आमदारांच्या निलंबनाच्या नोटीसीवर उद्या ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय सुनावणी होणार असताना त्याआधीच विधिमंडळ सचिवांनी शिंदे गटासह शिवसेनेच्या ५३ आमदारांना नोटीस बजावली आहे. शिवसेनेचे खरे आमदार कोण? शिंदे गटासोबत गेलेले आमदार, की उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले आमदार? यावरून तिढा निर्माण झाला असताना ही नोटीस बजावण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड आणि बहुमत चाचणी वेळी दोन्ही बाजूने बजावण्यात आलेले व्हीप डावल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे ही नोटीस बजावून उत्तरासाठी त्यांना ७ दिवसाची मुदत देण्यात आली आहे.

13:27 July 10

मेळघाटात दूषित पाण्यामुळे चौघांचा मृत्यू : मुख्यमंत्री सहायता निधीतून वीस लाख रुपयांची मदत

अमरावती जिल्ह्यात मेघाटातील पाच डोंगरी गावात दूषित पाणी पिल्यामुळे चार जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तसेच एकूण शंभरहून आजारी पडले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये प्रमाणे एकूण वीस लाख रुपयांची मदत पाठविली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून आलेल्या या रकमेचा धनादेश खासदार नवनीत राणा यांनी चिखलदराचे प्रभारी तहसीलदार राजगडे यांना आज सुपूर्द केला आहे

13:00 July 10

कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारणी बरखास्त, कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारणी बरखास्त

सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्याची घोषणा शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी आहे. सर्व कार्यकारणी आणि पदाधिकारी बरखास्त करण्यात आले आहेत. येत्या 31 ऑगस्टपर्यंत सर्व पक्षाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

12:48 July 10

खडकवासला धरण क्षेत्रात हंगामातील विक्रमी पाउस, पाणीसाठा 27 टक्क्यांवर, पुणेकरांची सहा महिने तहान भागणार

पुणे- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेला दमदार पाऊस कायम आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत यंदाच्या हंगामातील विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठा २७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

12:22 July 10

आरेचा लढा मुंबईसाठी आणि जीवनासाठी लढा- आदित्य ठाकरे

हा लढा मुंबईसाठी आहे, जीवनाचा लढा आहे. आम्ही जंगलासाठी आणि आमच्या आदिवासींच्या रक्षणासाठी लढलो. आम्ही इथे असताना एकही झाड उन्मळून पडले नाही, असे आरे आंदोलनात सहभागी झालेल्या आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

11:39 July 10

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सापडली रोख रक्कम आणि गणपती मूर्ती

मुंबई: भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर रोख रक्कम, नाणी, गणपती मूर्ती इत्यादींनी भरलेली बॅग सापडली. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी पहाटे 5.30-6 वाजता माझ्या घराजवळून एका संशयित व्यक्तीला जाताना पाहिले. जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा तो पळून गेला आणि बॅग सोडून गेला.

11:24 July 10

शिंदे सरकार हे पैशाच्या जोरावर आलेले सरकार

पुणे- आता आलेले शिंदे सरकार हे पैशाच्या जोरावर आलेले सरकार असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे पवार यांनी केलेला आहे.

11:21 July 10

आरेमधील मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन

मुंबई- आरेमधील मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेदेखील सहभागी झाले आहेत.

11:18 July 10

जीवनात सुख, समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

आषाढीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली. सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर,असे साकडे त्यांनी विठ्ठला चरणी घातले

11:08 July 10

कारागृहातच कैद्याला ठार करण्याचा प्रयत्न

कारागृहात तुरुंगाधिकारी आणि रक्षकांकडून कैद्यांवर किती अमानुष अत्याचार केले जातात, याचा अनुभव एका कैद्याला आला आहे. विशेष म्हणजे नाशिक राेड मध्यवर्ती कारागृहात हा भयानक प्रकार घडला असून न्यायालयाच्या आदेशाने सहा तत्कालीन तुरुंगाधिकाऱ्यांवर कैद्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11:00 July 10

बंडखोरांवर संजय राऊत यांचा निशाणा, म्हणाले..

शिवसेनेचे नेते संजय राऊत हे पत्रकार परिषदेला हजर राहिले नाहीत. मात्र, त्यांनी ट्विट करत शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी आरशात पाहणाऱ्या अस्वलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले, की जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते.. एकनाथ शिंदे व आमदारांच्या बंडानंतर गेली अनेक दिवस संजय राऊत हे बंडखोर नेत्यांवर टीका करत आहेत.

08:52 July 10

चंद्रपूर जिल्ह्यात ऑटो पाण्यात वाहून गेला पण, जवानाच्या धाडसाने पाच लोकांचा प्राण वाचला

चंद्रपूर- पुलावरून पाणी जात असताना अतिउत्साहाच्या भरात ऑटोचालकाने प्रवाशांसह ऑटो टाकला आणि त्यात तो अडकला. यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात आला होता. मात्र सुट्टीवर गावी आलेल्या जवानाच्या धाडसामुळे पाचही लोकांना वाचविण्यात यश आले. निखिल सुधाकर काळे असे या जवानाचे नाव असून तो मराठा बटालियनमध्ये सेवेत आहे. ही घटना टाकळी या गावाची आहे.

08:32 July 10

17 जुलै रोजीची एमपीएससीची प्रवेश प्रमाण पत्र प्रसिद्ध करण्याची कार्यवाही स्थगित

परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी दोन वेगवेगळ्या उपकेंद्राची प्रवेश प्रमाण पत्र दिसली. विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. 9 जुलै रोजी एमपीएससी परीक्षेचे प्रवेश प्रमाण पत्र डॉऊनलोड करताना 63 उमेदवारांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या उपकेंद्रांची प्रवेश प्रमाण पत्र झळकली. त्यामुळे सर्व विद्यार्थी गोंधळले. या प्रकारामुळे एमपीएससी कडून 17 जुलै रोजीची प्रवेश प्रमाण पत्र प्रसिद्ध करण्याची कार्यवाही तात्पुरता स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

07:40 July 10

मुरबाड - वाशिंद रस्त्यावरील पूल पुराच्या पाण्याखाली; १८ गावपाड्यांचा संर्पक तुटला

ठाणे - मुरबाड हुन वाशिंद कडे जाणारा रस्त्यावरील चिखले गावातील काळू नदीवरील पूल पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे शहापूर तालुका आणि मुरबाड तालुक्याचा सुमारे १८ गावपाड्यांचा संपर्क शनिवारी पहाटेपासून तुटला आहे. यामुळे गावाकडील शहरांकडे जाणाऱ्या चाकरमानीसह दूध, भाजी विक्रेते अडकून पडली आहे.

07:11 July 10

गडचिरोली जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती, जनजीवन विस्कळित

गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

06:19 July 10

बकरी ईदनिमित्त दिल्लीत जामा मशिदीत नमाज पठण

बकरी ईदनिमित्त दिल्लीतील जामा मशिदीत मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.

05:59 July 10

Maharashtra breaking news : कळसुबाई शिखरावर अडकलेले सर्व पर्यटक सुखरूप; सर्वांची करण्यात आली सुटका

सोलापूर-महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. पहाटे ३ वाजून १० मिनिटाच्या सुमारास विठ्ठल- रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत गेवराईच्या (ता. बीड) नवले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुरली भगवान नवले (वय ५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) यांनी शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसोबत केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे देखील सपत्नीक उपस्थित होते.

Last Updated : Jul 10, 2022, 5:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details