महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra breaking news : तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू, दारूच्या नशेत तोल जाऊन घडला प्रकार - Maharashtra live news

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Jul 17, 2022, 6:43 AM IST

Updated : Jul 17, 2022, 1:24 PM IST

13:22 July 17

तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू, दारूच्या नशेत तोल जाऊन घडला प्रकार

सांगली - मित्रांच्या समवेत पार्टीमध्ये दारू पिल्यानंतर तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून पडून एका तरुण जागीच ठार झाला आहे. मिरजेतील पंढरपूर रोडवरील असणाऱ्या बंद पडलेल्या शोरूमच्या इमारतीवरून पडल्याने ही घटना घडली आहे. अक्षय माने असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो मिरज तालुक्यातल्या गुंडेवाडी येथील आहे.

11:40 July 17

वाद आणि मान-अपमान बाजूला ठेवून शिंदे व ठाकरेंनी एकत्र यावे- दिपाली सय्यद

मुंबई- शिवसेनेत दोन गट नसावेत. सगळ्यांनी एकत्र येण्यातच शिवसेनेचे भले आहे. संजय राऊत यांनी शांततेचा पवित्रा घ्यावा. मानापनामध्ये सगळे अडकलेत. मी जाणवले ते बोलले असे शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी म्हटले आहे.

10:52 July 17

हडपसर-बिराजदारनगरमध्ये १६ झोपड्या जळून खाक, वेळीच मदत मिळाल्याने तीन मुलांचे वाचले प्राण

पुणे - आज पहाटेच्या तीन वाजल्याच्या सुमारास पुण्यातील हडपसरमधील सं.न.८६ बिराजदारनगरमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये राहत्या घराला आग लागून 13 जणांचे संसार जळून खाक झाले आहेत. वेळीच मदत मिळाल्याने तीन लहान मुले वाचली आहेत.

09:44 July 17

जम्मू काश्मीरमध्ये दिसले ड्रोन, पोलिसांकडून शोध मोहिम

जम्मू आणि काश्मीरमधील सांबा येथील मंगू चक गावातील ग्रामस्थांनी परिसरात ड्रोन दिसल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहिमेसाठी ड्रोन तैनात केले.

09:20 July 17

शारजाह-हैदराबाद विमान कराचीकडे वळविले

इंडिगोचे शारजाह-हैदराबाद विमान पाकिस्तानच्या कराची विमानतळाकडे वळवण्यात आले. तांत्रिक त्रुटीमुळे हे विमान कराचीकडे वळविण्यात आले.

08:17 July 17

अणुस्कुरा घाटात आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पुन्हा कोसळली दरड

कोल्हापूर - राजापूर मार्ग पुन्हा ठप्प झाला आहे. दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच पुणे - राजापूर एसटी घाटातच अडकली आहे. आठवड्याभराच्या काळात दुसऱ्यांदा या घाटात दरड कोसळली आहे.

07:23 July 17

धक्कादायक! शेजारी झोपू दिले नाही म्हणून दगडाने ठेचून पत्नीची हत्या

पत्नीने शेजारी झोपू दिले नाही म्हणून पतीने दगडाने ठेचून पत्नीने हत्या केली. गुन्हा केल्यानंतर पोलिसांना शरण आलेल्या या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

07:08 July 17

उत्तराखंडमध्ये निसर्गाचे रौद्र रुप, पाहा व्हिडिओ

उत्तराखंडमध्ये पावसाळ्यात निसर्गाचे रौद्र स्वरुप पाहायला मिळत आहे. खांक्राजवळील रुद बद्रीनाथ- ऋषिकेश राष्ट्रीय महामार्ग हा मोठ्या प्रमाणात भूस्खलनामुळे बंद झाला.

07:05 July 17

देशातील कोरोना लशीच्या डोसची संख्या लवकरच २ अब्ज होणार

भारतात नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोरोना लशीच्या डोसची संख्या लवकरच २ अब्ज होणार आहे. हा मैलाचा दगड गाठण्यासाठी सुमारे 1.63 लाख आणखी डोस द्यावे लागणार आहेत.

06:40 July 17

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता प्रकाश आंबेडकरांनी जाहिर केली भूमिका

अनुसूचित जातीच्या अनेक खासदार-आमदारांनी मला फोन केला. त्यांना राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना मतदान करायचे आहे, असे सांगितले. यशवंत सिन्हा यांनी उमेदवारी मागे घेऊन त्यांना राष्ट्रपती होऊ द्यावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहे.

06:30 July 17

Maharashtra breaking news : तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू, दारूच्या नशेत तोल जाऊन घडला प्रकार

मुंबई- सध्या राज्यात शिंदे-फडणवीस ( Eknath Shinde Government ) यांचे सरकार आहे. पण, मंत्रिमंडळात केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ जे निर्णय घेते त्याला घटनात्मक वैधता नाही, असा खोचक सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut slammed Shinde gov ) यांनी राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांना विचारला आहे.

Last Updated : Jul 17, 2022, 1:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details