Maharashtra Live Breaking News : गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंना केले अभिवादन - Maharashtra rains update
राज्यातील महत्त्वाच्या घडामोडीवर नजर टाकू या. राष्ट्रपती निवडणूक, पाऊस, गुरुपौर्मिमा या दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत.
Maharashtra live breaking
मुंबई- राज्यात मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यांत होत आहे. गुरूपौर्णिमा ( Guru Purnima ) कधी साजरी केली जाते, तिथीनुसार आषाढ महिन्यातील ( Ashadh month ) शुद्ध पौर्णिमेला ( Purnima ) ‘गुरूपौर्णिमा’ साजरी केली जात असते. या वर्षी ‘13 जुलै’ आज गुरूपौर्णिमा असून अनेक ठिकाणी मोठ्या श्रद्धेने गुरूपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात वेगाने हालचाली होत आहे. ( हे पेज दिवसभरात अपडेट होणार आहे )
- जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातील आजचा साठा खालीलप्रमाणे आहे. 18 दरवाजे पुर्ण उघडे आहेत.
पाणी पातळी | 208.880 मी |
एकूण साठा | 163.60 दलघमी. |
एकूण साठा टक्के | 42.16% |
विसर्ग | 643 क्युसेक्स / 22708 क्युसेक्स |
- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतपेटी, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्य मुंबई अंधेरी विमानतळावर दाखल झाले. तेथून ते विधानभवनाकडे रवाना झाले. राष्ट्रपती निवडणूकसाठी मतपेटी आणि इतर सीलबंद साहित्य मुंबई विमानतळावरुन विधानभवन मध्ये आणण्यात आले. विधानभवनातील स्ट्राँग रूममध्ये ते पूर्ण सुरक्षित व योग्य त्या खबरदारीसह ठेवण्यात आले आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जुलैला होणार आहे.
- गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही.... गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन... दरम्यान, शिवसेनेतील बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांनी टीका केली आहे.
Last Updated : Jul 13, 2022, 7:40 AM IST