भाजप हा केवळ देशाचाच नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. ज्या विचारधारेतून आम्ही आमचा प्रवास सुरू केला, त्यावरूनच दिसून येते की आम्ही राजकारण फक्त सरकार बनवण्यासाठी नाही तर देश घडवण्यासाठी करतो. काँग्रेसने प्रदीर्घ काळ राज्य केले, इतरांनीही केले गरिबी, बेरोजगारी या मूलभूत समस्यांना स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी तोंड द्यावे लागले. पंतप्रधान मोदींचे कार्य सर्वांना दिसत आहे. भारताचा आता जगात मान आहे. इतर देशांतील भारतीय रहिवाशांनी मला सांगितले की त्यांना आता देशाबद्दल आदर वाटतो. यापूर्वी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारतीयांनी काही सांगितले तर कोणी ऐकले नाही. आता, संपूर्ण जग लक्ष देऊन ऐकत आहे. असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. ते मुंबईत बोलत होते.
Maharashtra Live Breaking News;आम्ही फक्त सरकार बनवण्यासाठी नाही तर देश घडवण्यासाठी राजकारण करतो: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह - ब्रेकिंग न्यूज पेज

16:28 May 20
आम्ही फक्त सरकार बनवण्यासाठी नाही तर देश घडवण्यासाठी राजकारण करतो: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
16:12 May 20
मुंबईत कोरोना नंतर प्रथमच अवयवदानाची प्रक्रिया
मुंबईच्या जेजे रुग्णालयात गुरुवारी कोरोना साथीच्या आजारानंतर प्रथमच अवयवदानाची पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. 43 वर्षीय अधिवक्ता रीना बनसोडे यांना 15 मे रोजी न्यूरोसर्जरी विभागाचे एचओडी डॉ वर्नन वेल्हो यांच्या कडे दाखल करण्यात आले होते. 18 मे रोजी रात्री 10.38 वाजता डॉक्टरांच्या पथकाने तिला ब्रेन डेड घोषित केले. जेजे रुग्णालयाच्या समाजसेवा अधीक्षकांनी अवयवदानाबाबत रुग्णांच्या नातेवाइकांचे समुपदेशन केले. रुग्णाच्या नातेवाइकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर डॉ.पल्लवी सापळे, डीन, डॉ.संजय सुरसे, वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने तातडीने अवयवदानाची प्रक्रिया सुरू केली.
15:31 May 20
वांद्रे येथे ६० लाख रुपयांच्या अमली पदार्थांसह नायजेरियन व्यक्तीला अटक
मुंबईच्या वांद्रे भागात अमली पदार्थ विरोधी सेलने गोरेगाव येथून एका अमली पदार्थ तस्कराला अटक केली आणि त्याच्या ताब्यातून लाखो किमतीचे 400 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. अंमली पदार्थ विरोधी सेलचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला व्यक्ती आंतरराष्ट्रीय तस्कर असून त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ६० लाख रुपये किंमत असलेले ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
14:39 May 20
मुंबई-बेंगळुरू विमानाचे इंजिन बंद झाल्यामुळे हवेतच वळवले
एअर इंडियाचे मुंबई-बेंगळुरू फ्लाइट AI-639 चे इंजिन क्रमांक 2 चे बंद झाल्यामुळे हवेतच वळवण्यात आले आहे. एअर इंडिया प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देते आणि आमचा क्रू परिस्थिती हाताळण्यात पारंगत आहे. आमचे अभियांत्रिकी आणि देखभाल कर्मचारी परस्थितीवर लक्ष ठेउन आहेत. दरम्यान, विमान बदलल्यानंतर नियोजित फ्लाइट प्रवाशांसह बेंगळुरूला रवाना झाली अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
14:12 May 20
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईनच होणार
नागपूर -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आज अखेर उन्हाळी परीक्षा कोणत्या मोडमध्ये घेण्यात येईल या संदर्भात निर्णय जाहीर केला आहे. नागपूर विद्यापीठाकडून घेण्यात येणार असलेल्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा या ऑफलाईन पध्दतीनेचे घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ही माहिती दिली आहे.
14:08 May 20
केतकीला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी
ठाणे - केतकी चितळेला ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी हजर केले असता न्यायालयाने केतकीला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे केतकी २४ तारखेपर्यंत नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. त्यानंतरही अनेक ठिकाणी तिची रवानगी होण्याची शक्यता आहे.
13:52 May 20
इंद्राणीची तुरुंगातून सुटका होईल याचा आम्हाला खूप आनंद - वकील सना खान
मुंबई - सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यामुळे इंद्राणीची तुरुंगातून सुटका होईल याचा आम्हाला खूप आनंद आहे. असे त्यांच्या वकील सना रईस खान यांनी म्हटलंय. त्याना घेण्यास जाणार असल्याचेही खांन यांनी सांगितले. खटल्याच्या प्रत्येक तारखेला ती हजर राहील कारण खटला जलदगतीने चालवावा अशी आमची इच्छा आहे असेही सना रईस खान यांनी स्पष्ट केले.
13:30 May 20
आरिफ अबुबकर शेख, शब्बीर अबुबकर शेख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई - न्यायालयाने दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या डी-कंपनी प्रकरणातील संशयित आरिफ अबुबकर शेख आणि शब्बीर अबुबकर शेख यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
11:47 May 20
फक्त खुन्नस काढण्यासाठी आपल्या विरोधात कलमे लावली - संदीप देशपांडे
मुंबई - महिला पोलीस अधिकाऱ्याला आपला धक्का लागलाच नाही. मनसे नेते संदीप देशपांडे यांचा पत्रकारपरिषदेत दावा. फक्त खुन्नस काढण्यासाठी आपल्या विरोधात कलमे लावली असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केलाय.
10:20 May 20
बारामतीतून अमेरिकेच्या अध्यक्षांना पाठवले आंबे, सुप्रिया सुळे यांचे ट्विट
मुंबई - जळोची, बारामती येथील जळोची,बारामती येथील रेनबो इंटरनॅशनल यांनी पाठविलेले आंबे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन ( @POTUS) यांना देण्यात येणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांना पाठविण्यात आलेल्या आंब्यामध्ये हापूस, केशर आणि गोवा मानकूर या आंब्याचा समावेश आहे. खा. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
09:55 May 20
नायजेरियन ड्रग्ज तस्कराला अटक
मुंबई - अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने गोरेगाव परिसरातून एका नायजेरियन ड्रग्ज तस्कराला अटक केली. त्याच्याकडून 400 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 60 लाख रुपये आहे. एनडीपीएस कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
09:51 May 20
जुळे भाऊ असल्याचा फायदा घेत 20 वर्षीय भावजयीवर सहा महिने अत्याचार
लातूर - जुळे भाऊ असल्याचा फायदा घेत 20 वर्षीय भावजयीवर सहा महिने अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. लातूर शहरातील एका भागात हा विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक केली आहे.
09:31 May 20
शेअर बाजारात सकाळीच तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वाढला
मुंबई - शेअर बाजारात आज सकाळीच तेजी दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 900 अंकांनी वाढला आहे. सध्या 53,697 वर; निफ्टी 16,101 वर व्यवहार करत आहे.
09:24 May 20
ज्ञानव्यापी मशिद प्रकरणी सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, सर्वेक्षण अहवाल फुटल्याची शंका
वाराणसी - सुप्रीम कोर्टात आज दुपारी 3 वाजता ज्ञानव्यापी मशिद प्रकरणी सुनावणी होणार आहे. न्यायालयात सादर केलेला पाहणी अहवाल लीक झाल्याचे मी ऐकले आहे, असे ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावर सहाय्यक न्यायालय आयुक्त अजय प्रताप सिंह यानी म्हटले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
09:14 May 20
मनसेचा आयोध्या दौरा स्थगित?
मनसेचा आयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात राज ठाकरे अधिकृत घोषणा करतील अशीही माहिती आहे.
08:17 May 20
लालू आणि राबडीदेवी यांच्या मालमत्तांवर सीबीआयचे छापे
पाटणा - पाटण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राबडी देवी तसेच त्यांची मुलगी यांच्या घरावर छापे टाकण्यात येत आहेत. यासोबतच लालू यादव यांच्या 15 ठिकाणांवर सीबीआयकडून छापे टाकण्यात येत आहेत. लालू यादव 2004 ते 2009 या काळात रेल्वेमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळातील अनियमिततेसाठी हा छापा टाकण्यात येत आहे.
08:12 May 20
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान तुरुंगाबाहेर
सीतापूर - समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी तुरुगांतून सोडण्यात आले आहे. येथील जिल्हा तुरुंगात ते होते. कोतवाली पोलीस स्टेशन रामपूर प्रकरणात त्यांची सुटका करण्यात आली आहे.
07:53 May 20
भोरमधील भाटघर धरणातं बुडालेल्या पाचही तरूणींचे मृतदेह सापडले
पुणे -भोर गावातील भाटघर धारणामध्ये काल दुपारच्या सुमारास पाच विवाहित महिला पोहोण्यासाठी पाण्यात उतरल्या होत्या. त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या पाच मृतांमध्ये चार सख्या बहिणी आहे आणि एक त्यांची वहिनी आहे. या सर्व जणींचे मृतदेह रात्री उशिरा सापडले.
07:25 May 20
बांधकामाचे साहित्य अंगावर पडून कामगार ठार
मुंबई -मालाड शिवाजी चौक येथील भुरालाल जेवेल पॅराडाईस या इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच बांधकामाचे साहित्य एका कामगारावर पडले. त्या कामगाराला उपचारासाठी जवळच्या ए आर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्या कामगाराचा मृत्यू झाल्याचे डॉ. यादव यांनी सांगितले. मृत मजुराचे नाव राज कुमार असून तो 30 वर्षाचा आहे. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
06:25 May 20
Maharashtra Live Breaking News_20 May 2022 फेक संदेशापासून सावध राहा
मुंबई - आयकर विभागाच्या नावाने सध्या काही फसवे संदेश पसरवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा पसरवल्या जाणार्या फसव्या संदेशांपासून सावधान राहण्याचे आवाहन आयकर विभागाने केले आहे. तसेच, 'कृपया तुमचे वैयक्तिक किंवा आर्थिक तपशील शेअर करू नका कारण विभाग कधीही असे तपशील विचारत नाही.' अशा प्रकारचा संदेशही आयकर विभागाने दिला आहे.