भिवंडी शहर तालुक्यातील गोदाम पट्यात आगीचे सत्र सुरु आहे. आज सकाळी दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कॉर्पोरेशन या गोदाम संकुलात आय सी आय पीडिलाईट या कंपनीच्या गोदामांना भीषण आग लागली. हि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना चार तासानंतर अथक प्रयत्न करावे लागले.
Maharashtra Live Breaking News;भिवंडीत गोदामांची भीषण आग चार तासानंतर आटोक्यात ;आगीत तीन गोदाम जळून खाक - महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
18:20 May 18
भिवंडीत गोदामांची भीषण आग चार तासानंतर आटोक्यात ;आगीत तीन गोदाम जळून खाक
17:25 May 18
दहशदवादी संघटनाशी संबंध असलेल्या विधिसंघर्ष बालकाला शिक्षा
इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित एक विधिसंघर्ष बालकाला (अल्पवयीन आरोपीला ) 3 वर्ष स्पेशल होम मध्ये ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष प्राधिकृत न्यायालय औरंगाबाद येथे हा खटला चालू होता त्यात बाल न्याय मंडळ औरंगाबाद येथे अंतिम अहवाल सादर करण्यात आला होता. मागील दोन वर्षापासुन खटल्याची सुनावणी सुरू होती. पहिल्यांदाच दहशद वादी संघटनांशी संबंध असल्याने अशा पद्धतीची अल्पवयीन आरोपीला शिक्षा झाली आहे.
15:20 May 18
उच्च न्यायालयाचा भाजप आमदार जयकुमार गोरे यांना अटकेपासून अंतरिम दिलासा
मृत व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना उच्च न्यायालयाने आज अटकेपासून 9 जून पर्यंत दिलासा दिला आहे.
13:57 May 18
हैदराबाद येथील पार्थसार्थ रेड्डी यांनी साईबाबा चरणी दान केले 2 कोटी रुपये किंमतीचे 4 किलो सोने
शिर्डी -हैदराबाद येथील समाजसेवक पार्थसार्थ रेड्डी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरात सुमारे 2 कोटी रुपये किंमतीचे 4 किलो सोने दान केले. साईचरणी अनेक भक्त अशाप्रकारे दान करत असतात. हैदराबाद तसेच आंध्रप्रदेशातील अनेक भक्त साईचरणी मोठी देणगी नेहमीच देत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
13:37 May 18
मनसे सरचिटणीस नयन कदम कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या ताब्यात
मुंबई - मनसे सरचिटणीस नयन कदम याला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर नयन कदम म्हणाले की, भोंग्याचा विषय सुरू होता. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. आम्हालाही नोटीस मिळाली होती. मला 18 तारखेला अटक झाली आहे, याचे कारण काय, मला समजत नाही.
13:14 May 18
गुजरातमध्ये वापी येथे भिंत कोसळून झालेल्या अपघातात ९ जण ठार
अहमदाबाद - गुजरातमध्ये वापी येथे भिंत कोसळून झालेल्या अपघातात ९ जण ठार झालेत. तर ३० जण जखमी झाले आहेत.
11:57 May 18
केतकी चितळे गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात, पुन्हा पोलीस कस्टडीची शक्यता
ठाणे - गोरेगाव पोलिसांनी केतकी चितळेची कस्टडी मागितली होती. आज ती कस्टडी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस कोर्टाच्या ऑर्डर कॉपीची वाट बघत आहेत. तोपर्यंत केतकीला ठाणे जेलमध्ये नेण्यात येईल. ऑर्डर कॉपी मिळाल्यावर जेलमधून केतकीचा गोरेगाव पोलीस ताबा घेतील.
11:35 May 18
शिना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन
शिना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन. सुप्रीम कोर्टाचा निर्णय.
11:19 May 18
राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी एजी पेरारिवलनला सोडण्याचे आदेश
चेन्नई - राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीची आज सुटका करण्यात आली. तब्बल तीस वर्षानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी माजी पंतप्रधान प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी एजी पेरारिवलनला सोडण्याचे आदेश दिले होते.
11:09 May 18
अभिनेत्री केतकी चितळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
ठाणे - अभिनेत्री केतकी चितळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. केतकीची पोलीस कस्टडी आज संपली होती. तिला येथील कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
11:05 May 18
हार्दिक पटेल यांचा काँग्रेसचा राजीनामा
गांधीनगर - गुजरातमधील काँग्रेसनेते हार्दिक पटेल यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीमाना दिला आहे. ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे. पाटीदार नेते म्हणून अल्प काळातच हार्दिक पटेल यांनी आंदोलनातून ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांच्या राजकारणाला गती मिळाली.
09:08 May 18
बंगळुरूमध्ये अवकाळी पावसाचा कहर, अनेक भागात पाणी तुंबले
बंगळुरू - कर्नाटकमध्ये काही भागात अवकाळी पावसाने काल रात्री धुमाकूळ घातला. मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी तुंबले होते. काही ठिकाणी पाण्याचे लोंढे वाहताना दिसून आले. रात्री पाऊस पडल्याने लोकांचे मात्र जास्त हाल झाले नाहीत.
08:57 May 18
मुंबईत मोठी कारवाई युगांडाच्या नागरिकाकडून 690 ग्रॅम कोकेन जप्त
मुंबई - विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई केली. ब्रँडन सुल्पिसिअस मिगाडे युगांडा देशातून मुंबईत आला होता. पोटातून कोकेन भरलेल्या 70 कॅप्सूल तो घेऊन आला. त्याच्याकडून हे 690 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. जेजे रुग्णालयात त्याचा एक्सरे व सोनोग्राफी केल्याने पोटात हा मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या मदतीने कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. या कोकेनची किंमत किंमत तब्बल 7 कोटी रुपये आहे.
07:47 May 18
रईस अहमद असादउल्ला शेख नागपूर एटीएसच्या ताब्यात
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या जैश ए मोहम्मदचा दहशतवादी रईस अहमद असादउल्ला शेखला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपूर युनिट न ताब्यात घेतले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून रईस अहमद असादउल्ला शेखचा ताबा प्रोडक्शन वॉरंटवर घेण्यात आला आहे. रईस अहमद असादउल्ला शेखने गेल्यावर्षी जुलै महिन्यात नागपुरात येऊन डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसर तसेच इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची माहिती होती.
07:27 May 18
घोडबंदर रोडवर रसायनाने भरलेला टँकर उलटला
ठाणे - ठाण्यातील घोडबंदर रोडवर इथाइल बेंझिल अॅनिलाइन (ईबीए) रसायनाने भरलेला टँकर काल रात्री रत्नागिरीकडे जात असताना चालकाचा तोल गेल्याने उलटला. या अपघातात २ जण जखमी झाले. यानंतर ३ तासाने टँकर रस्त्यावरुन हटवण्यात आला.
07:01 May 18
Maharashtra Live Breaking News : हैदराबाद येथील पार्थसार्थ रेड्डी यांनी साईबाबा चरणी दान केले 2 कोटी रुपये किंमतीचे 4 किलो सोने
मुंबई -पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील काही भागांना रात्री अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी रस्त्यांची कामे, नालेसफाईची पाहणी केली. आपण लोकांची या कामांच्या संदर्भात मते जाणून घेण्यासाठी रात्रीच मुंबईचा फेरफटका मारल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, "रस्त्यांची कामे, नाल्याची सफाई आणि पावसाळ्यापूर्वीची कामे जलदगतीने पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच ही माझी जवळपास दशकभराची सवय आहे."