महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Live Breaking News; मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे : उद्धव ठाकरे - ठळक घडामोडी १४ मे २०२२

Maharashtra Live Breaking News
Maharashtra Live Breaking News

By

Published : May 14, 2022, 6:47 AM IST

Updated : May 14, 2022, 10:25 PM IST

22:23 May 14

तलावात बुडणाऱ्या तरुणीला वाचवण्यासाठी धावलेल्या पाच जणी बुडाल्या, एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

लातूर - तलावात बुडणाऱ्या तरुणीला वाचवण्यासाठी धावलेल्या पाच जणी बुडाल्या. लातूर जिल्ह्यातील पाच ऊसतोड कामगार महिलांचा बुडुन मृत्यू. अहमदपूर तालूक्यातील घटना. एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश.

20:43 May 14

मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे : उद्धव ठाकरे

मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. आमचे हिंदुत्व गदाधारी आहे, बाकीच्यांचे घंटाधारी आहे. तो खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष होता. ते देशाची दिशा भरकटवत आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी सभेत केला आहे.

20:30 May 14

मुंबईचे लचके तोडाल तर तुकडे तुकडे केले जातील : उध्दव ठाकरे

मुंबई काही आंदण म्हणून मिळालेली नाही, मुंबईचे लचके तोडायचा प्रयत्न कराल तर तुकडे तुकडे केले जातील असे खुले आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात मुख्यमंत्र्यांचा सभेला सुरवात झाली आहे. राज्यभरातून जमलेल्या शिवसैनिकांसमोर सभेची सुरवातच त्यांनी भाजपवर हल्ला चढवत केली आहे.

20:14 May 14

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेला सुरवात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेला सुरवात, शिवसेना नेत्यांची भाषने सुरु

19:33 May 14

केतकी चितळेवर शाई अंडे फेकले

शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट केल्याप्रकरणी पोलीसांच्या ताब्यात असलेल्या मराठी अभिनेत्री केतकी चितळेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शाई तसेच अंडी फेकल्याची घटना समोर आली आहे.

18:19 May 14

भाजपाच्या सर्व आरोपांना आजच्या सभेतून उत्तर मिळणार - अनिल परब

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज बिकेसी येथे होत आहे. या सभेतून सर्व आरोपांना उत्तरे दिली जातील, अशी प्रतिक्रिया मंत्री अनिल परब यांनी दिली.

17:22 May 14

ठाणे गुन्हे शाखेने केतकी चितळेला नवी मुंबई येथून घेतले ताब्यात

केतकीच्या विरोधात शरद पवारांवर टीका केल्या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात आहे गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे

16:03 May 14

दापोली पोलीस ठाण्याला आग कागदपत्रांचे तसेच संगणकांचे नुकसान

दापोली पोलिस ठाण्याच्या इमारतीला आज आग लागली. सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारस लागलेल्या आगीत पोलीस ठाण्यातील कागदपत्रांचे तसेच संगणकांचे नुकसान झाले आहे.

15:34 May 14

अभिनेत्री केतकी चितळेवर पुण्यातही तक्रार, गुन्हा दाखल...

अभिनेत्री केतकी चितळे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यामुळे ती अडचणीत आली आहे. मुंबई नंतर पुण्यातही राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्याविरोधार तक्रार दाखल केली असुन तीच्या विरोधात पुण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.

13:27 May 14

कस्तुरी सावेकरने केले माउंट एव्हरेस्ट सर

कोल्हापूर -कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकरने अखेर माउंट एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी करून दाखवली आहे. आज ( 14 मे ) पहाटे 6 वाजता जगातील सर्वात उंच आणि तितकेच अवघड असणारे माउंट एव्हरेस्ट तिने सर केले आहे.

11:23 May 14

मनिषा कायंदेंचे नवनीत राणा यांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई - शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी ट्विट करुन नाव न घेता खा. नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "अंगावर भगवे वस्त्र चढवले, हातात हनुमान मूर्ती घेतली म्हणजे तू हिंदूंची नेता झाली हा गैरसमज काढ बाई. ठाकरेंना हिंदुत्व शिकवण्याची हिम्मत करू नको. अन्यथा तू म्हणते तशी यापुढे १४ दिवस नाही तर १४ वर्षे......."

10:57 May 14

गव्हावर तत्काळ प्रभावाने निर्यात बंदी लागू

नवी दिल्ली - केंद्राने गव्हाच्या निर्यात धोरणात सुधारणा करून त्याची निर्यात बंदी केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की सरकारने गव्हाच्या निर्यातीवर “तत्काळ प्रभावाने” बंदी घातली आहे. सरकारने स्पष्ट केले की, देशाची एकूण अन्न सुरक्षा व्यवस्थापित करण्यासाठी आणि शेजारी आणि इतर असुरक्षित देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.

10:36 May 14

मुंखमंत्र्यांची सभा जंगी होणार - संजय राऊत

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आजची सभा जंगी होईल यात शंकाच नाही असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहेत . तसेचहिंदी भाषेच्या वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मत व्यक्त केले आहे. मी हिंदी भाषेचा आदर करतो आणि संसदेतही ती बोलतो. संपूर्ण देशाला ते समजले आहे. मी अमित शहा यांना एक देश, एक विधान, एक भाषा बनवण्याची विनंती करतो. प्रत्येकाने भाषेचा आदर केला पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

09:47 May 14

दिल्लीतील हनुमान मंदिरात राणा दाम्पत्य करणार आरती

नवी दिल्ली - खासदार नवनीत राणा आज दिल्लीत हनुमान मंदिरात आरती करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती आ. रवी राणा आणि काही समर्थकही जाणार आहेत. राणा दाम्पत्य नॉर्थ एव्हेन्यू येथून चालत दिल्लीतील ५००० वर्ष जुन्या हनुमान मंदिरात जातील. दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे हे मंदिर आहे. तेथे ते आरती करणार आहेत.

09:11 May 14

संयुक्त अरब अमिरातीची भारतात उत्पादन, पायाभूत सुविधा, सेवांमध्ये 100 अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक

मुंबई - UAE CEPA अनेक क्षेत्रांसाठी, विशेषतः कामगार-केंद्रित क्षेत्रांसाठी दरवाजे उघडते आहे. आम्ही महत्त्वपूर्ण गुंतवणूक होईल याच्याकडे लक्ष देऊन आहोत. UAE ने उत्पादन, पायाभूत सुविधा, सेवांमध्ये 100 अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक केली आहे. अशी माहिती केंद्रिय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली.

08:18 May 14

पोहोण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय युवकाचा मृत्यू

हिंगोली- मित्रांसमवेत पोहोण्यासाठी गेलेल्या एका 19 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना हिंगोली तालुक्यातील केसापूर शिंदे येथे घडलीय. शेख जायेब शेख युनूस असे मृत युवकाचे नाव आहे. मध्यरात्रीपर्यंत शोध घेऊन मृतदेह शोधून काढण्यात आला आहे. या प्रकरणी नरसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

07:39 May 14

राहुल गांधीचे आज प्रमुख नेत्यांना भेट सत्र

उदयपूर - काँग्रेस नेते राहुल गांधी आज सकाळी पक्षाचे सरचिटणीस, राज्य प्रभारी, पीसीसी प्रमुख आणि सीएलपी नेत्यांची राजस्थानमधील उदयपूर येथील चिंतन शिबिरात येथे भेट घेणार आहेत. महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांचीही आज ते भेट घेणार आहेत. काँग्रेसची पुढील रणनिती आखण्यासाठी हे चिंतन शिबीरमहत्वाचे मानण्यात येत आहे.

07:22 May 14

कौटुंबिक वादातून मेव्हण्याने केला भाऊजीचा निर्घृण खून

सांगली - कौटुंबिक वादातून मेव्हण्याने भाऊजीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सांगली शहरामध्ये घडली आहे. जावेद गवंडी, वय वर्ष 45 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बहिणीला वारंवार त्रास देत असल्याच्या कारणातून भावाने ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

06:39 May 14

Maharashtra Live Breaking News_14 May 2022

दिल्ली -मुंडका परिसरातील तीन मजली इमारतीला काल भीषण आग लागली होती. या आगीतील मृतांचा आकडा २७वर गेला आहे. आगीत 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या इमारतीत परफ्यूम आणि तुपाचे गोडाऊन असल्याने आग भडकलीे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले.

Last Updated : May 14, 2022, 10:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details